Home /News /lifestyle /

महिलांच्या जीन्सचे खिसे लहान का असतात? फॅशन डिझायनरनी सांगितलं कारण

महिलांच्या जीन्सचे खिसे लहान का असतात? फॅशन डिझायनरनी सांगितलं कारण

जीन्सची पॅंट (Jeans Pant) आता बहुतांश सर्वांच्याच कपड्यांमधील अविभाज्य घटक असते. कोणी जीन्स वापरत नाही असं फार क्वचित आढळतं. स्त्री असो वा पुरुष, सर्व जण जीन्स वापरतात. जिन्सची ही फॅशन (Fashion) आता आपल्याकडे चांगलीच रुजली असून, गेल्या काही काळापासून जीन्सची जागा कोणीही घेऊ शकलेलं नाही.

पुढे वाचा ...
मुंबई, 5 जानेवारी : जीन्सची पॅंट (Jeans Pant) आता बहुतांश सर्वांच्याच कपड्यांमधील अविभाज्य घटक असते. कोणी जीन्स वापरत नाही असं फार क्वचित आढळतं. स्त्री असो वा पुरुष, सर्व जण जीन्स वापरतात. जिन्सची ही फॅशन (Fashion) आता आपल्याकडे चांगलीच रुजली असून, गेल्या काही काळापासून जीन्सची जागा कोणीही घेऊ शकलेलं नाही. आरामदायी पोशाख म्हणून मुली, महिलाही अगदी सर्रास जीन्स घालतात. मुलींच्या जीन्सचे वेगवेगळे प्रकार आता बाजारात दिसतात; मात्र एक गोष्ट कायम दिसते ती म्हणजे मुलींच्या जीन्सचा खिसा (Jeans Pocket in Smaller size) मुलांच्या जीन्सच्या खिशापेक्षा नेहमी लहान असतो. यामुळे मुलींना मुलांप्रमाणे जीन्सच्या खिशात मोबाइल, पाकीट, गाडीची किल्ली अशा वस्तू ठेवता येत नाहीत. याबाबत अनेकदा चर्चा होत असते; मात्र गेल्या अनेक वर्षांत यात काही बदल झालेला दिसून येत नाही. आजकालच्या समानतेच्या जगात महिला आणि पुरुष दोघांसाठी जीन्स तयार करणाऱ्या कंपन्या महिलांच्या जीन्सच्या खिशाबाबत दुजाभाव का करतात हे गौडबंगालच आहे. याचं उत्तर एका फॅशन डिझायनरकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जवळपास 10 वर्षांहून अधिक काळ फॅशन डिझाइन या क्षेत्रात असलेल्या एमिली केलर (Emily Keller) यांनी यामागचं रहस्य उलगडून सांगितलं आहे. यामागची तीन प्रमुख कारणं त्यांनी सांगितली. यातलं पहिलं कारण म्हणजे पैसे वाचवणं, दुसरं म्हणजे फॅशन ट्रेंड आणि तिसरं म्हणजे खिशाचा भाग स्ट्रेच होण्याची भीती.
यातलं पहिलं कारण अधिक महत्त्वाचं आहे. कारण मुलींच्या जीन्सचे खिसे लहान ठेवण्यातूनदेखील कंपन्यांना भरपूर नफा होतो. त्यामुळे अनेक नामांकित कंपन्यादेखील महिलांच्या जीन्सला लहानसा खिसा देऊन कॉस्ट कटिंग (Cost Cutting) करतात आणि पैसे वाचवतात. त्यासाठी कारण मात्र फॅशनचं दिलं जातं; मात्र मुख्य उद्देश कपडा वाचवणं हा असतो. या लहानशा खिशामुळे जीन्सकरिता लागणारं कापड मोठ्या प्रमाणात वाचतं. त्यामुळे कंपन्यांना चांगलाच फायदा होतो.
दुसरं कारण म्हणजे फॅशन ट्रेंड. आजच्या फॅशन ट्रेंडनुसार (Fashion Trend) महिलांच्या जीन्स बॉडी फिट (Body Fit) असतात. त्यामुळे खिसा दिला तर कपड्याची जाडी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांच्या जीन्सचे खिसे लहान ठेवण्यात येत असल्याचं फॅशन डिझायनर एमिली केलर यांनी सांगितलं; मात्र खिसा अतिशय लहान असल्यानं मुलींना, महिलांना खिशात काही वस्तू ठेवण्याची सुविधा मिळत नाही.
खिसा लहान ठेवण्यामागचं तिसरं कारण म्हणजे खिशाचा भाग स्ट्रेच (Strech) होण्याची भीती. महिलांच्या जीन्सला मोठा खिसा केला गेला, तर ते कापड खूपच स्ट्रेच होतं आणि ते चांगलं दिसत नाही. त्यामुळे खिसा लहान ठेवला जातो, असं एमिली केलर यांनी स्पष्ट केलं. याशिवाय अन्य काही कारणंही असू शकतात; मात्र ही तीन मुख्य कारणं आहेत. त्यामुळे आजही महिलांच्या जीन्सचे खिसे लहानच असतात.
First published:

Tags: Woman

पुढील बातम्या