• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Wisdom teeth : प्रौढ झाल्यावरच का येते अक्कलदाढ?

Wisdom teeth : प्रौढ झाल्यावरच का येते अक्कलदाढ?

बहुतेक दात आपल्याला बालपणातच येतात मग अक्कलदाढ (Wisdom teeth) इतक्या उशिरा का येते?

  • Share this:
मुंबई, 17 ऑक्टोबर : माणूस हा माकडांपासून विकसित झाला आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळेच आपल्यामध्ये आणि चिम्पांझीं माकडांमध्ये बऱ्याच प्रमाणात साम्य आढळते. एक शेपूट आणि अक्कल सोडली, तर तसा दोघांच्या शरीररचनेमध्ये मोठा फरक नसतो. पण आता वैज्ञानिकांनी मानव आणि चिम्पांझींमध्ये आणखी एक गोष्ट वेगळी असल्याचे सांगितले आहे. आपल्या आणि चिम्पांझींच्या केवळ अकलेत नाही, तर अक्कलदाढेमध्येही (Research on Wisdom teeth) फरक असतो. माणसाला एका ठराविक वयानंतर अक्कल दाढ (Wisdom teeth research) येते, तर चिम्पांझींमध्ये अगदी कमी वयातच दातांचा पूर्णपणे विकास होतो. अमेरिकेतील अरिझोना युनिव्हर्सिटीच्या (Arizona University wisdom teeth research) संशोधकांनी याबाबत रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे. अक्कलदाढेची वाढ आणि मानवजातीचा इतिहास (Mankind History and wisdom teeth) या दोन्हीमध्ये गूढ समानता आहे, असं या संशोधनाच्या प्रमुख लेखिका आणि मानवविज्ञानतज्ज्ञ हेल्स्का ग्लोवाका यांनी म्हटले आहे. याबाबत संशोधन करताना त्यांनी विद्यापीठातील त्यांचे सहकारी आणि इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन ओरिजिन्समध्ये पॅलेंटॉलॉजिकल आंथ्रपॉलॉजिस्ट असणारे गॅरी श्वार्टज यांची मदत घेतली. या दोघांनी तब्बल 21 प्रजातींच्या प्रायमेट्सचा अभ्यास केला. प्रायमेट्स म्हणजे वानर गटातील प्राणी. या सर्वांच्या कवटींचे आणि दातांचे थ्रीडी मॉडेल तयार करून संशोधन केल्यानंतर त्यातून समजलं, की अक्कलदाढेची वाढ आणि कवटीचे (Human Skulls) बायोमेकॅनिक्स या दोन्हीचा गाढ संबंध आहे. हे वाचा - डोळ्यांखाली सूज आल्यानं तुमचा चेहरा थकल्यासारखा दिसतो; हे घरगुती उपाय येतील कामी माणसाच्या दातांची वाढ (Human teeth development) ही वयाच्या तीन टप्प्यांमध्ये होते. 6 वर्षे, 12 वर्षे आणि 18 वर्षे अशा तीन टप्प्यांमध्ये ही वाढ होते. तर दुसऱ्या प्रायमेट्समध्ये ही वाढ अगदी कमी वयात होते. चिम्पांझींमध्ये (Wisdom teeth in Chimpanzee) वयाच्या 3, 6 आणि 12व्या वर्षी दातांची वाढ होते. यलो बबून नावाच्या प्रजातीमध्ये तर केवळ एका वर्षातच दातांची पूर्णपणे वाढ होऊन जाते. तर, रीसिस मकाक नावाच्या एका प्रजातीमध्ये सहा वर्षांमध्येच दातांची पूर्णपणे वाढ होऊन जाते. अन्न चावण्यासाठी दातांचा उपयोग होतो हे आपल्याला माहिती आहे. पण या प्रक्रियेत केवळ दातांचा सहभाग नसतो. विविध मांसपेशी आणि हाडांचीही यात महत्त्वाची भूमिका असते. यांच्या मदतीनेच दातांवर आपण पुरेसा दबाव देऊ शकतो. आपला चेहरा इतर प्रायमेट्सच्या तुलनेत छोटा आहे, तसेच आपली जीवनशैलीही अगदी संथ आहे. यासोबतच आपण जंगलासारख्या असुरक्षित ठिकाणी राहत नाही. या सर्व कारणांमुळेच आपली अक्कलदाढ सर्वांत उशिरा (Human wisdom teeth) येण्यास सुरूवात झाली आहे. हे वाचा - गरम पाण्याचे फायदे सर्वांनाच माहिताहेत; या गोष्टी घालून पिणं ठरेल अधिक उपयोगी सर्वच प्रायमेट्समध्ये अक्कलदाढ ही दोन टेम्पोरोमॅडिब्युलर दंतसांध्यांच्या अगदी समोर येते. हे दंतसांधे मानवी कवटी आणि जबड्याला (Human Jaws) जोडणाऱ्या ठिकाणी असतात. अशा वेळी अन्न चावण्यासाठी लावण्यात येणारे बल आणि दातांमध्ये समन्वय असणं गरजेचं असतं. लांब जबड्यांच्या प्रजातींमध्ये दातांच्या वापरासाठी मांसपेशींचा योग्य असा विकास लवकर होतो. मानवांच्या बाबतीत असं होत नाही, त्यामुळेच आपली अक्कलदाढ येण्यास इतर प्रायमेट्सच्या तुलनेत अधिक वेळ लागतो. या संशोधनातून मानवी जबड्यांच्या (Human Development) विकासाबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती ग्लोवाका यांनी दिली आहे. सायन्स ॲडव्हान्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
First published: