Home /News /lifestyle /

बोलताना एखादी गोष्ट तुम्हीही विसरता? मग ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची

बोलताना एखादी गोष्ट तुम्हीही विसरता? मग ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची

थोडक्यात काय तर, हा काही विसरभोळेपणा नाही. यामध्ये काळजीचं किंवा घाबरण्याचं काहीच कारण नाही.

    मुंबई, 25 जून : बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला काही सांगायचं असतं; मात्र ते आपण विसरतो (Forgetting). अशा वेळी आपल्याला असा प्रश्न पडतो, की अरेच्चा, हे असं का होतंय? बऱ्याचदा आपल्या बाबतीतही असं घडत असेल. आपण एखाद्याला काही तरी सांगणार असतो; पण बोलणं सुरू करण्यापूर्वीच नेमकं काय सांगायचं तेच विसरतो. एखाद्या कामासाठी खोलीत जातो आणि कोणत्या कामासाठी आलोय हे विसरतो. त्यामुळे अनेक प्रश्न मनात घोळू लागतात; पण त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. हे पूर्णपणे सामान्य लक्षण आहे. चला तर जाणून घेऊ या, की हे अचानक कसं होतं. सोप्या शब्दात, शास्त्रज्ञ या परिस्थितीला दुहेरी कार्याचा परिणाम (Dual Tasking) म्हणतात. ड्युएल टास्किंग म्हणजे एकाच वेळी दोन वेगवेगळी कामं करणं. जेव्हा माणसाचं वय लहान असतं तेव्हा त्याचं मनही मोठ्यांप्रमाणे धावत नाही. अशा स्थितीत त्याला दोन गोष्टी करणं अवघड असतं. एखादी व्यक्ती जसजशी मोठी होते तसतसं त्याच्यासाठी दुहेरी कार्य करणं सोपं होतं. मनुष्याचा मेंदू हा अनेक शक्तिशाली संगणकांपेक्षा हुशार आहे. परंतु त्याच्या मर्यादादेखील आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा तो एका वेळी अनेक कामं करतो, तेव्हा काही क्षणांसाठी अनावश्यक गोष्टी विसरत असतो. बोलत असताना आपण रस्ता ओलांडू शकतो किंवा गाणं ऐकता ऐकता गणिताचे प्रश्न सोडवू शकतो. म्हणजे गाणी ऐकणं आणि गणित सोडवणं अशा दोन गोष्टी मेंदू एकाच वेळी करत असतो. बरेच जण एकाच वेळी दोनपेक्षा जास्त गोष्टी करतातही; पण अशा परिस्थितीत काही गोष्टी विसरायला होतात. ऐकावं ते नवल! 8 ग्रॅम कमी झालं समोश्याचं वजन म्हणून प्रशासनाने सील केलं दुकान अनावश्यक गोष्टी विसरल्या जातात आपण काही बोलण्यापूर्वी दोन कामं करत असू, तर आपलं मन त्या कामामध्ये अधिक गुंतून जाईल आणि काही क्षणांसाठी ती गोष्ट विसरेल. असंही होऊ शकतं, की तुम्ही काही बोलण्याचा विचार केला असेल; पण तुम्ही दुसऱ्याचं ऐकत असाल, अशा परिस्थितीत तुम्ही जे बोलायचं ते विसरता. खोलीत जाऊन काम विसरणं हेही यामुळेच घडतं. जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी मनात चालू असतात, तेव्हा खोलीत जाऊन जे काम करायचं होतं ते विसरणं, यामागचं कारणही तेच आहे. (Why humans forget what they were going to say) थोडक्यात काय तर, हा काही विसरभोळेपणा नाही. यामध्ये काळजीचं किंवा घाबरण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे काही क्षण आराम करा आणि नंतर दीर्घ श्वास घ्या. काही वेळाने तुम्हाला विसरलेल्या गोष्टी आपोआप आठवतील.
    First published:

    पुढील बातम्या