Home /News /lifestyle /

Psychologists | जगभरात मानसशास्त्रज्ञांची मागणी का वाढत आहे? 'ही' आहेत कारणे

Psychologists | जगभरात मानसशास्त्रज्ञांची मागणी का वाढत आहे? 'ही' आहेत कारणे

गेल्या काही वर्षांत जगभरात मानसशास्त्रज्ञांची (Psychologists) मागणी झपाट्याने वाढत आहे. हा योगायोग आहे की कोविड-19 (Covid-19) साथीमुळे लोकांमध्ये मानसिक समस्या वाढत आहेत. मात्र, औषध आणि शिक्षणाव्यतिरिक्त, उद्योग (Industries), क्रीडा, राजकारण, मनोरंजन इत्यादीसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये मानसशास्त्रीय तज्ञांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 जानेवारी : भारतासह जगभरात मानसशास्त्राला (Psychology) जेवढे महत्त्व द्यायला हवे, तेवढे दिले जात नाही. मात्र, अलीकडच्या काळात जगभरात मानसशास्त्रज्ञांची मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. याचं कारण म्हणजे कोविड-19 साथीच्या आजारामुळे शारीरिक आरोग्याच (Health) नाही, तर त्याचे अनेक मानसिक दुष्परिणामही (Mental Health) दिसून येत आहेत. दुसरीकडे सध्याच्या आधुनिक जीवनात असलेली अनिश्चितताही मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे. कदाचित यामुळेच अलिकडच्या वर्षांत मानसशास्त्रज्ञांची भूमिका जगात खूप वाढलेली दिसते. मानसशास्त्रज्ञ देखील जगातील अनेक क्षेत्रात हस्तक्षेप करत आहेत. याचे कारण या ट्रेंडमध्येच दिसून येते. अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने वाढणारी मागणी सरकार, मीडिया, राजकारण, कॉर्पोरेट जग, कारखाने, चित्रपट सेट्स, टेक स्टार्टअप्स अशा अनेक ठिकाणी मानसशास्त्र तज्ञ आता मोठ्या भूमिकेत दिसत आहेत. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका लेखात, मानसशास्त्रज्ञ आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ जस्टिन अँडरसन, ज्यांनी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक आणि ऑलिम्पिक खेळाडूंसोबत काम केले आहे, असे म्हटले आहे की पारंपारिक खेळाडू देखील मानसोपचारचा सल्ला घेऊ लागले आहेत. मानसशास्त्राची व्याप्ती विस्तारतेय तणाव कमी करण्याचे महत्त्व जगभरातील अनेक उद्योगांमध्ये ओळखले गेले आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. आता मानसशास्त्रीय प्रशिक्षण अनेक प्रकारच्या क्षमतांवर भर देत आहे, ज्यांची उद्योगांमध्ये मागणी वाढत आहे. याशिवाय डेटा विश्लेषणातून बहु-अनुशासनात्मक कार्यकारी टीम तयार करणे यासारख्या जबाबदाऱ्या देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात येऊ लागल्या आहेत. आता ते दिवस गेले जेव्हा मानसशास्त्र केवळ वैद्यकीय माध्यमांत वापरले जात होते. इक्विटी विविधता आणि समावेश (EDI) मानसशास्त्रज्ञांना सर्वात जास्त मागणी असलेले क्षेत्र म्हणजे “समानता, विविधता आणि समावेश” म्हणजेच “इक्विटी, डायव्हर्सिटी आणि इन्क्लूजन” (EDI). गेल्या पाच ते सहा वर्षांत विविध संस्थांमधील ईडीआय भूमिका 71 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या सर्वांमध्ये मानसशास्त्रज्ञ नाहीत, परंतु मानसशास्त्रीय पार्श्वभूमी असलेले तज्ञ हे खूप मौल्यवान असल्याचे सिद्ध झाले आहे. OMG! व्यायाम आणि डाएटशिवायही कमी करा वजन;15 उपयुक्त टिप्समुळे तुमचं आयुष्य बदलेल कार्यालयातील वातावरण समजून घेणे महत्त्वाचे कार्यालयीन वातावरणात टीम कशी काम करते, ऑफिस पॉलिटिक्सचा काय परिणाम होतो आणि व्यक्तिमत्त्वाचा कसा प्रभाव पडतो हे समजून घेणे आता खूप महत्त्वाचे आहे. असे मत फ्लोरिडा येथील औद्योगिक आणि संस्थात्मक मानसशास्त्रज्ञ डॉ. किझी पार्क्स यांनी मांडले आहे. आता संस्थाही प्रक्रियेकडे अधिक लक्ष देत आहेत. ईडीआयचे महत्त्व लक्षात घेता, मानसशास्त्रज्ञांची मागणी वाढली आहे. कारण या विषयातील तज्ञांसोबच ते या तज्ञ संस्था आणि संस्थांना इतर अनेक मार्गांनी मदत करू शकतात. सार्वजनिक जीवनातही अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ सार्वजनिक जीवनात देखील नवीन भूमिका घेत आहेत. ओबामा ते बायडेन प्रशासनापर्यंत विविध सल्लागार पदांवर मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, सिंथिया अॅन टेल्ससारख्या मानसशास्त्रज्ञांना कोस्टा रिकामध्ये अमेरिकेचे राजदूत नेमण्यात आले आहे. इतकेच नाही तर अमेरिकन काँग्रेसमध्ये मानसशास्त्रज्ञांची संख्याही वाढली आहे. यात मोठ्या टेक कंपन्याही मागे नाहीत आज मानसशास्त्रज्ञ अनेक क्षेत्रात काम करत आहेत ज्यात मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक सारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करत आहेत. त्याच वेळी, नवीन स्टार्ट-अपमध्ये मानसशास्त्राची पार्श्वभूमी असलेले लोक अधिक दिसतात. टेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांची लोकप्रियता तपासण्यासाठी, त्यांना लोकप्रिय करण्यासाठी आणि लोकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करत आहेत. Botox म्हणजे नेमकं काय करतात? या ट्रीटमेंटने खरंच वय कमी दिसतं का? मनोरंजन क्षेत्रातही मागणी याशिवाय मनोरंजन क्षेत्रातही मानसशास्त्रज्ञांची मागणी वाढत आहे. मीडिया, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्स इ. त्यांच्या स्पेशलायझेशन प्रोग्राम्स आणि प्रोजेक्ट्समध्ये मानसशास्त्रज्ञ आणत आहेत. मनोरंजन क्षेत्रातही पटकथा लेखन ते कलाकारापपर्यंत मनोविज्ञान पार्श्वभूमी उपयुक्त मानली जाते. निर्मात्यांनी त्यांच्या कलाकारांच्या मानसिक आरोग्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मागणी सुरू केली आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Health, Health Tips, Mental health

    पुढील बातम्या