Home /News /lifestyle /

महिलांनी का करू नये साष्टांग नमस्कार? निव्वळ अंधश्रद्धा की यामागे आहे वैज्ञानिक कारण?

महिलांनी का करू नये साष्टांग नमस्कार? निव्वळ अंधश्रद्धा की यामागे आहे वैज्ञानिक कारण?

पंतप्रधान मोदी साष्टांग नमस्कार करताना

पंतप्रधान मोदी साष्टांग नमस्कार करताना

स्त्रिया साष्टांग नमस्कारही करत नाही. यामागे केवळ अंधश्रद्धा (Superstition) नाहीये तर वैज्ञानिक कारणदेखील आहे (Scientific Reason). शास्त्रानुसार स्त्रिया साष्टांग नमस्कार घालत नाहीत.

    मुंबई, 30 जून : आपल्याकडे काही अशा गोष्टी आहेत ज्या पूर्वीच्या काळापासून ठरवल्या गेलेल्या आहेत. एखादी गोष्ट पुरुषांनी करावी किंवा स्त्रियांनी करू नये. अशाही काही गोष्टी ठरवल्या गेलेल्या हेत. उदाहरणार्थ पूजेतला नारळ स्त्रिया फोडत नाहीत. त्याचप्रमाणे स्त्रिया साष्टांग नमस्कारही करत नाही. यामागे केवळ अंधश्रद्धा (Superstition) नाहीये तर वैज्ञानिक कारणदेखील आहे (Scientific Reason). आज आम्ही तुम्हाला स्त्रिया साष्टांग नमस्कार का करत नाही यामागचे वैज्ञानिक कारण सांगणार आहोत. का केला जातो साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार करणे म्हणजे देवापुढे किंवा एखाद्या व्यक्तीपुढे नतमस्तक होणे. असे केल्याने आपण त्या व्यक्तीचे वर्चस्व आणि देवाचे मोठेपण स्वीकारत असतो. हे चांगल्या अर्थाने केले जाते. आपण देवापुढे नतमस्तक होतो. कारण आपण आपल्या आयुष्यातील सुखासाठी, यशासाठी देवाचे ऋणी असतो. आणि याचे आभार मानन्यासाठी आपण देवाला साष्टांग नमस्कार घालतो. पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार स्त्रिया का करत नाहीत साष्टांग नमस्कार शास्त्रानुसार महिलांनी साष्टांग नमस्कार का करू नयेत (Why shouldn't women bow down) याबद्दल हरजिंदगी या वेबसाईटवर माहिती देण्यात अली आहे. त्यानुसार, अक्षर योग संशोधन आणि विकास केंद्राचे संस्थापक आणि योग तज्ज्ञ हिमालय सिद्ध अक्षर (Himalaya Siddha Akshar) यांनी सांगितले की, महिला फक्त पंचांग नमस्कार करतात. अष्टांग नमस्कार नाही. पंचांग नमस्कार जेव्हा स्त्रीने गुडघे टेकून तळहात जोडणे किंवा समोरच्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे. Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम शास्त्रानुसार स्त्रिया साष्टांग नमस्कार घालत नाहीत. कारण स्त्रियांचा गर्भ आणि हृदय जमिनीला स्पर्श करू नये. हृदय हा स्त्रीच्या शरीराचा एक भाग आहे. जो स्वतः मध्ये असलेल्या गर्भाचे पोषण करतो आणि गर्भात गर्भाचे म्हणजेच बाळाचे जीवन आहे. त्यामुळे ते जमिनीच्या संपर्कात येऊ नये. जेणेकरून कोणत्याही प्रकार चा संसर्ग किंवा त्रास स्त्रीला होऊ नये. असे यामागचे वैज्ञानिक कारण आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या