मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पाण्याच्या बाटल्यांवर का लिहली जाते एक्स्पायरी डेट? सीलबंद बाटल्यांचे हे गणित समजून घ्या

पाण्याच्या बाटल्यांवर का लिहली जाते एक्स्पायरी डेट? सीलबंद बाटल्यांचे हे गणित समजून घ्या

ही लक्षणं सामान्य वाटत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. यासाठी दररोज तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. तुम्ही थंडीमध्ये पाणी थंड असल्यामुळं ते योग्य प्रमाणात पिऊ शकत नसाल तर, पाणी थोडंसं कोमट करून प्यावं. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

ही लक्षणं सामान्य वाटत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. यासाठी दररोज तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. तुम्ही थंडीमध्ये पाणी थंड असल्यामुळं ते योग्य प्रमाणात पिऊ शकत नसाल तर, पाणी थोडंसं कोमट करून प्यावं. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

सीलबंद पाणी वापरताना, अनेकांना त्याबद्दलची एक गोष्ट माहीत नसते. ती म्हणजे पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट का लिहिली जाते (Why Expiry Date Printed on Plastic Bottles?). तसेच सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणीदेखील कालांतराने खराब होते का?

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 डिसेंबर : कुठेही घराबाहेर, प्रवासाला जाताना अलिकडे सर्वजण पाण्याची बाटली सोबत घेऊन जातात किंवा विकत घेतात. पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीसोबत बाळगणे सर्वांनाच सोयीचे वाटते. एक काळ असा होता की लोक घरून कूलकेक किंवा मोठ्या बाटलीत पाणी घेऊन जायचे, पण प्रवास अधिक सोपा व्हावा म्हणून लोकांनी सीलबंद पाण्याच्या बाटल्या विकत घेण्यास सुरुवात केल्याने त्याची बाजारपेठही झपाट्याने वाढू लागली. पण, सीलबंद पाणी वापरताना, अनेकांना त्याबद्दलची एक गोष्ट माहीत नसते. ती म्हणजे पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट का लिहिली जाते (Why Expiry Date Printed on Plastic Bottles?). तसेच सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणीदेखील कालांतराने खराब होते का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत आज आपण जाणून घेऊयात.

वास्तविक, सीलबंद पाण्याच्या बाटल्यांवरील एक्स्पायरी डेटचे अनेक अर्थ आहेत. एक्स्पायरी लिहिण्यामागेही एक महत्त्वाचं कारण असतं, त्याबाबत जाणून घेण्यापूर्वी तुम्ही हे माहीत करून घ्या की, ती एक्स्पायरी डेट (Expiry Date on Bottles) पाण्याची नसून बाटलीची असते.

हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल

पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट लिहिण्याची अनेक कारणे आहेत, त्यातील पहिले कारण म्हणजे सरकारी नियम. खाण्यापिण्याशी संबंधित प्रत्येक वस्तूसोबत त्याची एक्सपायरी डेट नमूद करणे आवश्यक असते, हे तुम्हाला माहीत असेलच. पाणी देखील या श्रेणीत येते, म्हणून त्याची एक्स्पायरी डेट दिली जाते, त्यानंतर त्याचा परिणाम पाण्यावर होत नाही तर बाटलीवर होतो.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

प्लास्टिकपासून धोका

बाटलीवर होणारा परिणाम खूप गंभीर असू शकतो. पाण्याच्या या प्लास्टिकच्या बाटल्यांची किंमत कमी राखण्यासाठी त्यांची गुणवत्ता कमी केली जाते. त्यामुळे या बाटल्यांमध्ये ठेवलेले पाणी जास्त काळ चांगले राहू शकत नाही. कारण या प्लॅस्टिकच्या बाटल्या धूर किंवा गरम तापमानात जास्त काळ ठेवल्या तर त्यामधून हानिकारक प्लास्टिकचे कण आणि रसायने बाहेर पडतात आणि पाण्यात मिसळतात. यापैकी एक रसायन, बायफेनिल ए (biphenyl A ), स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवते तर पुरुषांमध्ये वंध्यत्व वाढवू शकते. यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट लिहिली जाते. यावरून आपल्या हे देखील लक्षात येईल की सिंगल युज पाण्याची बाटली पुन्हा-पुन्हा वापरणे किती धोकादायक असू शकते.

First published:

Tags: Drink water, Plastic