#sareeTwitter सोशल मीडियावरच्या साडीप्रेमात प्रियांका गांधीही झाल्या सहभागी, शेअर केला लग्नातला फोटो

#sareeTwitter सोशल मीडियावरच्या साडीप्रेमात प्रियांका गांधीही झाल्या सहभागी, शेअर केला लग्नातला फोटो

अचानक सोशल मीडियावर साडीतले फोटो का शेअर व्हायला लागले आहेत?

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर अचानक मुली साडीतले फोटो अपलोड करायला लागल्या आहेत. तुमच्या परिचयाच्या स्त्रियांनीही असे फोटो ट्वीट केलेले तुम्ही पाहिले असतील. सोशल मीडियाला... विशेषतः ट्विटरला अचानक साडीविषयी प्रेम का वाटायला लागलं हे स्पष्ट झालं नाही, पण साडी हा भारतीय पेहराव किती सुंदर, नजाकतदार आहे याची प्रचिती देण्यासाठी अनेक जणी आपापले फोटो शेअर आहेत. प्रियांका गांधींनीही Priyanka Gandhi आपलं साडीवरचं प्रेम शेअर केलं आहे.  जगभरातून भारतीय साडी किती elegant आहे यावर चर्चा सुरू झाली आहे, कारण अनेक सेलेब्रिटींनी साडीचे फोटो #sareeTwitter #SareeSwag या हॅशटॅगसह शेअर केले आहेत. या सेलिब्रिटींमध्ये हिंदी, मराठी चित्रपटातल्या अभिनेत्री तसंच सोशल मीडिया सेलेब्रिटींसह राजकारण्यांचाही समावेश आहे.

प्रियांका गांधींनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या लग्नातला फोटो अपलोड केला आहे. लग्नाच्या दिवशी सकाळी पूजेच्या वेळी नेसलेली साडी, असा त्यांनी उल्लेख केला आहे. हा 22 वर्षांपूर्वीचा फोटो असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

 

नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही आपलं साडीवरचं प्रेम व्यक्त करण्याचा आनंद लपवता आलेला नाही. भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनीही साडी स्वॅग शेअर केला आहे. याशिवाय अभिनेत्री नगमा, यामी गौतम यांनीही साडीतले फोटो  #SareeSwag  हॅशटॅगसह शेअर केले आहेत.

मध्यंतरी सगळीकडे 100 Saree-pledge असा ट्रेंड होता. हे एक प्रकारचं चॅलेंज होतं. प्रत्येकीनं वर्षभरात किमान 100 साड्या नेसायच्या आणि त्याचे फोटो शेअर करायचे. भारताबाहेर राहणाऱ्या मराठी तरुणींनी हे चॅलेंज सुरू केलं होतं हे विशेष. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर साडीचं प्रेम दिसू लागलं आहे. यामागची स्टोरी अजून उलगडायची आहे, पण तोपर्यंत साडीतला आपला फोटो शेअर करायचा मोह कोणी सोडू इच्छित नाही.

ट्विटरच्या या ट्रेंडमध्ये पुरुषांना, नवऱ्यांना सहभागी होता येईल का? असं मजेदार ट्वीट करत गौरव गोगोई या आसाममधल्या काँग्रेस खासदारानं आपल्या पत्नीचा साडीतला फोटो शेअर केला आहे.

सुझॅन बर्नेट या जर्मन अभिनेत्रीही साडीप्रेम व्यक्त केलं आहे. सुझॅननं काही भारतीय चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.

आणखी कोणी कोणी साडीतले फोटो ट्वीट केले आहेत पाहा...

 

इमारतीच्या ढिगारातून महिलेला बाहेर काढतानाचा LIVE VIDEO

First published: July 17, 2019, 1:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading