मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कितीही ठरवलं तरी तुम्ही पॉर्न पाहण्यापासून स्वतःला का रोखू शकत नाही माहिती आहे?

कितीही ठरवलं तरी तुम्ही पॉर्न पाहण्यापासून स्वतःला का रोखू शकत नाही माहिती आहे?

लोक पॉर्न (Porn) का पाहतात याची मुख्यं कारण काय आहेत पाहा.

लोक पॉर्न (Porn) का पाहतात याची मुख्यं कारण काय आहेत पाहा.

लोक पॉर्न (Porn) का पाहतात याची मुख्यं कारण काय आहेत पाहा.

  मुंबई, 28 मे : पॉर्न (Porn) पाहण्यात अनेकांना रस असतो. स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे पॉर्नोग्राफी पाहणं अनेकांना सहज शक्य झालं आहे. पॉर्न पाहणं चांगलं की वाईट याबद्दल अनेक चर्चा होत असतात. त्यावर बंदी घालण्याची मागणीही होत असते दरम्यान, यावर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधनही (Research) होत असतं. सायकॉलॉजी टुडे (Psychology Today) नियतकालिकाच्या मार्च महिन्याच्या अंकातही याबद्दलच्या संशोधनाविषयीचा लेख प्रसिद्ध झाला आहे. 'सायकॉलॉजी ऑफ अॅडिक्टिव्ह बिहेव्हियर एक्झामिन्स द रिझन पीपल वॉच पोर्नोग्राफी' या शीर्षकाचा तो लेख बोथे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिला आहे. लोक पोर्नोग्राफी (Pornography) का पाहतात, याच्या कारणांचा वेध घेऊन त्याबद्दल त्या लेखात लिहिण्यात आलं आहे.

  अनेक लोक आपला तणाव (Stress) कमी करण्यासाठी, नकारात्मक भावनांमधून बाहेर येण्यासाठी, आपल्या समस्यांचा विसर पडण्यासाठी आणि वास्तव जगापासून दूर जाऊन फँटसीच्या (Fantasy) जगात रममाण होण्यासाठी पॉर्न पाहतात, असं या लेखात लिहिलं आहे.

  या संशोधनात एक नवा निदर्शकही तयार करण्यात आला आहे. पोर्नोग्राफी यूझ मोटिव्हेशन स्केल (Pornography Use Motivation Scale - PUMS) असं त्याचं नाव आहे. म्हणजे पोर्नोग्राफी पाहून उत्साह, प्रेरणा मिळण्याचं प्रमाण, असा याचा अर्थ. त्यात अनेक कारणांचा समावेश करण्यात आला आहे.

  हे वाचा - कोरोनामुळे लैंगिक जीवनावर होतोय परिणाम? संशोधन काय सांगतं वाचा..

  - कंटाळा घालवण्यासाठी लोक पॉर्न पाहतात. पॉर्न पाहून कंटाळा जातो आणि वेळही जातो.

  - भावनात्मक व्याकुळता किंवा दमन हेही पॉर्न पाहण्याचं कारण आहे. काही लोक आपला वाईट असलेला मूड (Moods) चांगला करण्यासाठी पॉर्न पाहतात.

  - काही लोकांनी असं सांगितलं, की वास्तव जीवनात ज्याचा अनुभव घेऊ शकत नाही, तो अनुभव घेण्यासाठी ते पॉर्न पाहतात.

  - पॉर्न पाहण्याचं एक प्रमुख कारण यातून पुढे आलं, ते म्हणजे लैंगिक समाधान (Sexual Satisfaction) नसणं. ज्यांना लैंगिक जीवनात समाधान मिळत नाही, ते पॉर्न पाहून आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तसंच काही जण स्वतःच्या लैंगिक इच्छांबद्दल चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठीही पॉर्न पाहतात, असं लक्षात आलं आहे.

  - काही लोक जिज्ञासा म्हणून, काही नव्या गोष्टी शिकण्यासाठी म्हणून पॉर्न पाहतात.

  - काही लोक हस्तमैथुन (Masturbation) करताना साह्य होण्यासाठी पॉर्न पाहतात.

  - पॉर्न पाहिल्यामुळे तणाव कमी झाल्यासारखं वाटतं. तणाव दूर करण्याच्या सर्वोत्तम मार्गांपैकी पॉर्न पाहणं हा एक मार्ग असल्याने आपण पॉर्न पाहत असल्याचं लोकांनी सांगितलं.

  - लैंगिक सुख, लैंगिक जिज्ञासा आणि फँटसी या तीन गोष्टींमुळे पॉर्न पाहण्यासाठी प्रेरणा मिळते, असंही या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

  - प्रॉब्लेमॅटिक पोर्नोग्राफी कंझम्प्शन स्केल (Problematic Pornography Consumption Scale - PPCS) या एका निदर्शकानुसारही काही निरीक्षणं नोंदवण्यात आली. पोर्नोग्राफी पाहण्यातून झालेल्या समस्यांची नोंद त्यात करण्यात आली.

  हे वाचा - ऑनलाइन डेटिंग करणाऱ्याला भेटण्यासाठी 'ती' चक्क जेलपर्यंत पोहोचली...

  पॉर्न पाहिल्यानंतर नकारात्मक भावनांतून सुटका झाल्याचं काही जणांनी सांगितलं. मात्र अनेकांनी पॉर्न न पाहण्याचा निश्चय केला, तरी ते त्यावर निश्चयावर फार काळ ठाम राहू शकले नाहीत. तसंच, पॉर्न पाहण्याची सवय लागल्यावर स्वतःमधलं सर्वोत्तम बाहेर पडणं कठीण होऊन बसल्याचंही अनेकांनी सांगितलं. म्हणजेच आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला अधिकाधिक पॉर्न पाहण्याची इच्छा त्यांच्यात उत्पन्न झाली. काही लोकांना इच्छा होऊनही पॉर्न पाहता आलं नाही, तेव्हा ते जास्त उत्तेजित झाल्याचं आढळलं.

  First published:
  top videos

   Tags: Lifestyle, Porn sites, Porn video, Sex, Sexual health