मुंबई, 17 जून : 2018 सालच्या जागतिक आरोग्य संघटना आणि नॅशनल केअर ऑफ मेडिकल हेल्थने 2018 साली केलेल्या अभ्यासानुसार कमीत कमी 6.5% भारतीय गंभीर अशा मानसिक समस्यांशी (mental health problem) लढत आहेत. जगात भारतामध्ये डिप्रेशनचं (depression) प्रमाण खूप आहे. भारतातील प्रत्येकी सहापैकी एका व्यक्तीला थेरेपीची गरज पडते. तरी आजही मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार देशात टॅबू बनून राहिला आहे.
मात्र अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (sushant singh rajput) आत्महत्या केल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबाबत चर्चा सुरू झाली. डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींनी काय करायला हवं, याबाबत अनेक जण सल्लेही देऊ लागले.
'मित्राला एखादा कॉल करायचा', 'कुणाशी तरी बोलायचं होतं', 'दुसरा मार्ग नेहमी असतो', असे बरेच पोस्ट सोशल मीडियावर पडू लागले. याचा अर्थ डिप्रेशनबाबत आणि डिप्रेशन असलेल्या व्यक्तींशी नेमकं कसं बोलावं हे अजूनही अनेकांना समजलेलं नाही हे यातून दिसून येतं, असं तज्ज्ञ म्हणालेत.
हे वाचा - सुशांतने आत्महत्येपूर्वी ट्विटरवर दिले संकेत? व्हायरल होतायेत स्क्रिनशॉट
फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमधील मानसशास्त्रज्ञ समुपदेशक गार्गी विष्णोई म्हणाल्या, "लोकांना या विषयाची फारशी माहिती नसल्याने आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. असंवेदनशील मत, वायफळ सल्ले लोकांना व्यक्त होण्यापासून परावृत्त करतात. अशी अनेक कुटुंब आहेत, जिथं या विषयावर व्यक्तही होता येत नाही आणि समाज म्हणून आपण अशा विषयांना गुप्त ठेण्यास प्रोत्साहन देतो"
डिप्रेशनशी लढा देणारे अनेक सेलिब्रिटी पुढे आले त्यांनी आपला अनुभव सांगितला आणि इतरांनीही व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहीत केलं. काही जणांना आपला अनुभव शेअर करून समाधान मिळेल तर काही जणांना ते मिळणार नाही. काही जणांना तर आपला अनुभव शब्दात मांडायचा तरी कसा हेदेखील माहिती नसावं.
हे वाचा - "सुशांतच्या आत्महत्येला सोनमही जबाबदार"; या VIDEO वरून सोनम कपूरही होतेय ट्रोल
गार्गी विष्णोई म्हणाल्या, "जी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते, तिला आपल्या मनावरील ओढं दुसऱ्यावर टाकायचं नसतं. जरी ती व्यक्ती होत असेल तरी त्यांना समोरची व्यक्ती तिची परिस्थिती समजून घेत नाही. तु इतका नकारात्मक विचार का करतोस/करतेस? तू नेहमी तुझ्या आयुष्यातील दु:खी क्षणांबाबतच का बोलत असतोस/असतेस? तुझ्याजवळ बोलण्यासारखं चांगलं काहीच नाही का? असेच प्रश्न विचारले जातातत"
मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. डिप्रेशनग्रस्त व्यक्तीला असा सल्ला देणं आपल्याला सोपं वाटत असेल मात्र तिच्यासाठी हे खूप कठीण असतं.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - "सुशांत करू शकतो तर मी का नाही", सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्यानेही घेतला गळफास