मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

डोळ्यावर झोप असते, पण अंथरुणावर पडलं की येत नाही; हे का होतं वाचा...

डोळ्यावर झोप असते, पण अंथरुणावर पडलं की येत नाही; हे का होतं वाचा...

दिवसभराच्या दगदगीनंतर थकवा एवढा असतो की डोळ्यावर झापड येते, पण आडवं पडल्यावर मात्र नीट झोप लागत नाही. असं तुमच्याही बाबतीत होतं का? सावधान! वेळीच सांभाळा

दिवसभराच्या दगदगीनंतर थकवा एवढा असतो की डोळ्यावर झापड येते, पण आडवं पडल्यावर मात्र नीट झोप लागत नाही. असं तुमच्याही बाबतीत होतं का? सावधान! वेळीच सांभाळा

दिवसभराच्या दगदगीनंतर थकवा एवढा असतो की डोळ्यावर झापड येते, पण आडवं पडल्यावर मात्र नीट झोप लागत नाही. असं तुमच्याही बाबतीत होतं का? सावधान! वेळीच सांभाळा

दिल्ली, 23 ऑक्टोबर:  मोबाइलमुळे आपल्या सर्वांच्याच झोपेचं खोबरं (Sleep Disorder) झालं आहे हे आपल्यालाही माहिती आहे. झोपताना ‘फक्त पाचच मिनिटं अजून’ म्हणून घेतलेला फोन आपण पुढे दोन तास तरी सोडत नाही. अगदी भरपूर झोप आली असली, तरी हा फोन किंवा टीव्ही आपल्याला बराच वेळ जागं ठेवतो. झोपेची गरज असतानाही आपण असं का करतो, याचं उत्तर वैज्ञानिकांना एका संशोधनात मिळालं आहे. डेली मेलने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, स्लीप फाउंडेशनने (Sleep Foundation) याचा अभ्यास केला आहे. कितीही थकलेले असले, तरी लोक झोपण्याऐवजी मोबाइल, टीव्ही (Sleeping problems because of mobile) अशा गोष्टींकडे लक्ष देतात आणि लवकर झोपायचं टाळतात हे या संशोधनात दिसून आले. बाहेर आठ तासांहून अधिक काम करूनही लोक झोपणं टाळून मोबाइलवर (Why do people spend time on phone instead of sleeping) राहणं का पसंत करतात याचं उत्तर शोधण्याचा संशोधकांनी प्रयत्न केला. यात त्यांना दिसून आलं, की बाहेरील ताण-तणावापासून सुटका (Sleep disorder reason) मिळवण्यासाठी लोक टीव्ही, सोशल मीडिया किंवा पुस्तकांचा आधार घेतात. त्यांच्या शरीराला झोपेची गरज असते; मात्र तरीही ते हे इतर पर्याय वापरतात. बाहेरील तणावाचा सूड म्हणून लोक असं करत असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं. यासोबतच, आरोग्याप्रति कमी असलेली जागरूकता, सोशल मीडियावर भरपूर वेळ ‘अॅक्टिव्ह’ राहण्याची असलेली सवय आणि अनावश्यक ‘नाइट आउट’ची (Night out) सवय या तीन गोष्टींमुळेही लोक झोपणं टाळत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. कित्येक लोक कामाच्या ताणामुळे रात्री उशिरा झोपतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिससाठी लवकर उठतात. त्यामुळे त्यांची झोप अपुरी होते. या सवयीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर (Lack of Sleep problems) दूरगामी गंभीर परिणाम दिसू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे डिप्रेशन, ताण, रक्तदाब असे गंभीर आजार होऊ शकतात, असं स्लीप फाउंडेशनने म्हटलं आहे. तुम्हाला पडणारी अशी स्वप्ने विनाकारणच नसतात; स्वप्नांच्या दुनियेतील वास्तव काय? या आजारांपासून वाचण्यासाठी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. दररोज पुरेशी झोप होण्यासाठी (Tips to prevent sleep disorder) तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी उशिरा कॉफी किंवा दारू पिणं टाळावं. यासोबतच नियमित योग आणि व्यायाम करणं, झोपण्याची आणि उठण्याची निश्चित वेळ ठरवणं, मोबाइल-टीव्ही-पुस्तक अशा गोष्टींसाठी वेगळा वेळ काढणे अशा गोष्टी करू शकता. VIDEO - तिला ऐकू येत होता विचित्र आवाज आणि तीव्र खाज; कानात पाहताच डॉक्टरही शॉक आपल्याला दररोज सुमारे सात ते आठ तासांची झोप घेणं गरजेचं असते. त्यापेक्षा कमी झोप होत असेल, तर तुम्ही वर दिलेले उपाय करून पाहू शकता. यानंतरही तुम्हाला झोपेची समस्या जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही उत्तम.
First published:

Tags: Mental health, Sleep

पुढील बातम्या