वाढत्या वजनाचं टेन्शन; मोड आलेल्या धान्य-कडधान्यांचं करा सेवन

वाढत्या वजनाचं टेन्शन; मोड आलेल्या धान्य-कडधान्यांचं करा सेवन

मोड आलेल्या पदार्थांचे (sprouted food) पोषक गुणधर्म वाढतात.

  • Last Updated: Jul 23, 2020 09:46 PM IST
  • Share this:

मोड आलेली धान्ये अधिक आरोग्यदायी आणि पोषक द्रव्यांनी समृद्ध असतात. रोजच्या आहारात मोड आलेली धान्य का खावीत हे जाणून घेणे रंजक ठरेल. यात शंकाच नाही की ते आरोग्यासाठी चांगले आहेत पण ते का चांगले आहेत हे कळले तर मात्र तुम्ही ते कधीच टाळणार नाही. myupchar.com च्या डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांचे सांगणे आहे की मोड आलेल्या धान्याचे सेवन सकाळच्या न्याहारीत करणे उत्तम असते. त्यात जीवनसत्व ए, सी, बी2, बी5 आणि के असते. लोह, पोटॅशियम, कॅल्शियम , मॅग्नेशियम, फॉस्फरस मॅगनीजचे प्रमाणही खूप असते. त्यात फोलेट, तंतुमय पदार्थ, ओमेगा-3 फॅटी अॅसिडही असते. विशेष म्हणजे मोड आलेले धान्य म्हणजे स्वस्त आणि चांगला आहार आहे. घरातील डाळी, धान्ये, शेंगदाणे यांना पाण्यात भिजवून मोड आणता येतात. मोड आणण्यासाठी हरभरे, मूग, गहू, सोयाबीन, शेंगदाणे, मका यांचा उपयोग केला जातो.

मोड आलेले धान्य खाण्याचे फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढणे

रोगप्रतिकारक शक्ती किती आवश्यक आहे हे कोविड-19 च्या साथीने सगळ्यांनाच समजायला लागले आहे. myupchar.com च्या डॉ. आकांक्षा मिश्रा सांगतात की, "शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात आहार महत्वाची भूमिका निभावते. मोड आलेली धान्ये ए आणि सी जीवनसत्वयुक्त असतात. या दोन्ही सूक्ष्म पोषक द्रव्याने रोगप्रतिकारकता वाढते. सी जीवनसत्व पांढऱ्या पेशींना विषाणू आणि जीवाणूशी लढण्यास सक्षम करते आणि त्यांना निष्प्रभ करते. ए जीवनसत्वपण एक चांगली शक्तिशाली अँटी- ऑक्सिडंट आहे त्याने प्रतिकारशक्ती चांगली राहते.

वजन नियंत्रणात ठेवते

मोड आलेली धान्ये तंतुमय पदार्थांनी समृद्ध असतात. त्यामुळे पोट भरलेले राहते आणि मग अतिरिक्त कॅलरी शरीरात जात नाहीत आणि वजन नियंत्रणात राहते.

पचनासाठी उत्तम

मोड आलेल्या धान्यात अनेक पाचक रस असतात त्याने ते सहज पचतात. पचनाची समस्या असणाऱ्या लोकांना मोड आलेली धान्य खाण्याने खूप फायदा होतो. मोड आल्यानंतर त्यातील कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीन अधिक पाचक आणि पौष्टिक होतात.

रक्तक्षयात उपयोग होतो

शरीरातील रक्ताची कमतरता किंवा लोहाची कमतरता असेल तर रक्तक्षय होतो. त्यामुळी शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. लोहाच्या कमतरतेपासून सुटका हवी असेल तर रोज मोड आलेली धान्ये खावीत.

डोळ्यांसाठी फायदा

ए जीवनसत्वयुक्त आहार डोळ्यांसाठी फायद्याचा असतो. मोतिबिंदू आणि वयपरत्वे पडद्याची होणारी हानी त्यामुळे होतो. हे डोळ्याचे बुबुळ साफ ठेवते आणि नजर चांगली होते.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - आरोग्यदायी आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 23, 2020, 9:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading