मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Ganesh Chaturthi : आज घेऊ नये चंद्रदर्शन; चुकून चंद्राला पाहिलंच तर काय करायचं?

Ganesh Chaturthi : आज घेऊ नये चंद्रदर्शन; चुकून चंद्राला पाहिलंच तर काय करायचं?

गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्राला पाहिलं तर दोषापासून मुक्त राहण्याचा उपायही आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्राला पाहिलं तर दोषापासून मुक्त राहण्याचा उपायही आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्राला पाहिलं तर दोषापासून मुक्त राहण्याचा उपायही आहे.

    मुंबई, 10 सप्टेंबर : दर वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला विघ्नहर्त्या श्री गणेशाचं आगमन घरोघरी होतं. गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) दिवस हा जसा श्री गणरायाच्या आगमनाचा असतो, तसाच तो आणखी एका कारणासाठीही विशेष असतो. या दिवशी चंद्रदर्शन (Do not see Moon on Ganesh Chaturthi) घेऊ नये, असं शास्त्रात सांगितलं आहे.

    गणेश चतुर्थीला जी व्यक्ती चंद्रदर्शन करते, त्या व्यक्तीवर भविष्यात चोरीचा खोटा आळ येतो किंवा आरोप  होतो, असं मानलं जातं. पण समजा चुकून चंद्रावर नजर पडलीच, तर मग काय करायचं. शास्त्रात यावरही उपाय सांगितलेला आहे (What to do if see Moon on Ganesh Chaturthi).

    गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन का निषिद्ध आहे, याबाबतची कथा प्रसिद्ध आहे. गणपतीला हत्तीचं मस्तक बसवण्यात आल्यानंतर गणपतीनं पृथ्वीप्रदक्षिणा केली. या प्रदक्षिणेनंतर त्याला आद्यपूजेचा मान देण्यात आला. या वेळी सर्व देव-देवतांनी गणपतीची पूजा केली; मात्र आपल्या रंगरूपाचा गर्व असल्याने चंद्राने गणपतीची पूजा केली नाही. ही बाब जेव्हा गणपतीच्या लक्षात आली तेव्हा गणपती संतप्त झाला आणि त्याने चंद्राला 'तू आजपासून काळा होशील,' असा शाप दिला. नंतर चंद्राला आपली चूक लक्षात आली आणि त्यानं देवाधिदेव भगवान गणपतीची क्षमा मागितली. त्यावर गणरायाला चंद्राची दया आली आणि त्याने सांगितलं, की 'सूर्याची किरणं तुझ्यावर पडताच तुझी आभा आणि सौंदर्य परत येईल.' तेव्हापासून गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानलं गेलं आहे.

    हे वाचा - फक्त गणेश चतुर्थीलाच गणपतीला वाहतात तुळस; यामागचं कारण माहीत आहे का?

    गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानलं गेलं आहे. तरीही तुम्हाला अनवधानाने चंद्रदर्शन घडलं, तर घाबरून जाण्याचं मुळीच कारण नाही. कारण एक असा मंत्र आहे, की ज्याचा श्रद्धेनं आणि मनोभावे जप केला तर चंद्रदोषाचा कोणाताही परिणाम तुमच्यावर होणार नाही. ज्या कोणाला खोट्या आरोपांखाली फसवण्यात आलं आहे, त्यांच्यासाठी हा मंत्र अत्यंत लाभदायी आहे.

    सिंह:प्रसेन मण्वधीत्सिंहो जाम्बवता हतः।

    सुकुमार मा रोदिस्तव ह्येषः स्यमन्तकः।।

    हे वाचा - Ganesh chaturthi : गणेशपूजेत का वाहिल्या जातात 21 पत्री? फक्त धार्मिक नाही यामागे आहे वैज्ञानिक कारण

    या मंत्राचा दररोज एक माळ जप केल्यास या मंत्राच्या प्रभावानं खोट्या आरोपातून मुक्त होण्यास मदत होते. त्यामुळे चुकून या दिवशी चंद्रदर्शन घडलं तर घाबरून न जाता या मंत्राचा जप करून तुम्ही दोषापासून मुक्त होऊ शकता.

    First published:
    top videos

      Tags: Culture and tradition, Ganesh chaturthi