Home /News /lifestyle /

तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवता का? मग सेलेब्रिटी शेफ काय सांगतात एकदा पाहाच

तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवता का? मग सेलेब्रिटी शेफ काय सांगतात एकदा पाहाच

Eggs in fridge : अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने नेमका काय परिणाम होतो हे सेलिब्रिटी शेफने सांगितलं आहे.

मुंबई, 17 जानेवारी : 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' हे वाक्य तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल. लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी अंडी (Eggs) लाभदायक मानली जातात. अंडी हा अनेकांचा सर्वांत आवडता पदार्थ असतो. नेहमीच अनेकांच्या घरात अंड्यांपासून पदार्थ बनवले जातात. बहुतेकांच्या नाश्त्यात ब्रेड आणि ऑम्लेट (Bread and Omelette) किंवा उकडलेलं अंडं (Boiled egg) असतंच. यासाठी अंडी घरात आणून ठेवली जातात, जेणेकरून अंडी खरेदी करण्यासाठी पुन्हा-पुन्हा बाहेर जावं लागणार नाही. काही जण अंडी फ्रिजमध्ये ठेवतात (Eggs in fridge); मात्र असं करणं चुकीचं असल्याचं सेलेब्रिटी शेफ म्हणतात. ब्रिटिश सेलेब्रिटी शेफ जेम्स मार्टिन 'धिस मॉर्निंग किचन' या शोमध्ये सहभागी झाले होते. अंडी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, असा सल्ला त्यांनी या शोमध्ये दिला आहे. यामागे एक विशेष कारण असल्याचं त्यांनी सांगितलं. अंड्यावर अनेक लहान-लहान छिद्रं असतात. अंडी फ्रीजमध्ये ठेवल्यास या छिद्रांमधून फ्रीजमधल्या इतर उत्पादनांचा वास आणि चव अंडी आपोआप शोषून घेतात. यामुळे अंड्यांची चव पूर्णपणे बदलते. त्यामुळे अंड्यांचा खरा आस्वाद घ्यायचा असेल, तर अंडी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका, असा सल्ला शेफ जेम्स मार्टिन यांनी या शोमध्ये दिल्याचं वृत्त आज तकने दिलं आहे. हे वाचा - सकाळी ठीक आहे, पण रात्रीही गरम पाणी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील तुम्ही या संदर्भात एक प्रयोगही करून पाहू शकता. काही अंडी फ्रीजमध्ये ठेवा आणि काही बाहेर. यानंतर दोन्ही अंड्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवा आणि त्यांचा स्वाद घ्या. तुम्हाला दोन्ही पदार्थांची चव वेगवेगळी लागेल. बाहेर ठेवलेल्या अंड्यापासून बनलेले पदार्थ अधिक चविष्ट असल्याचं जाणवेल. म्हणून अंडी रेफ्रिजरेटरच्या बाहेर सामान्य तापमान असलेल्या ठिकाणी ठेवा. अंडी स्वच्छ करणंही गरजेचं अंडी वापरण्यापूर्वी ती पूर्णपणे स्वच्छ केली पाहिजेत. अनेक जण थेट बाजारातून अंडी आणतात आणि उकडायला ठेवतात किंवा त्यापासून पदार्थ तयार करतात. त्यामुळे अंड्यातले टाकाऊ पदार्थदेखील पाण्यात जातात. अंडी सोलल्यानंतर ते टाकाऊ पदार्थ अंड्याला चिकटतात. तसंच कच्चं अंडं फोडल्यानंतर बाहेरच्या आवरणावर असलेले जंतू त्यात मिसळू शकतात. हे वाचा - Sleeping Disorder : 20 वर्षं लागत नव्हती शांत झोप; अखेर 'हा' उपचार ठरला प्रभावी म्हणून अंडी वापरण्यापूर्वी नेहमी हलक्या हातांनी कोमट किंवा थंड पाण्याने धुवून घ्यावीत. अंडी कधीच फ्रीजमध्ये ठेवू नयेत आणि स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी. अंडी खाण्याचे फायदे तब्येत सुधारण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अंडी पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. तसंच त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. अंडी हा प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. अंडी खाल्याने हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो. तसंच डोळ्यांसाठीदेखील अंडी खाणं चांगलं असते. अंड्यांचं सेवन केल्याने गुड कोलेस्टेरॉल वाढतं. तसंच शरीरात अमिनो अॅसिड्स तयार होतात. वजन कमी करण्यासाठीदेखील अंडी उपयुक्त आहेत.
First published:

Tags: Food, Lifestyle

पुढील बातम्या