मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दारू-बिअरची विक्री होत असूनही या दुकानांना भारतात Wine Shop का म्हणतात?

दारू-बिअरची विक्री होत असूनही या दुकानांना भारतात Wine Shop का म्हणतात?

दारूवर नियंत्रण - 
योग्य प्रमाणात अल्कोहोल घेत असाल तर तुमचे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

दारूवर नियंत्रण - योग्य प्रमाणात अल्कोहोल घेत असाल तर तुमचे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

सर्वसामान्यपणे दारू विक्रीच्या दुकानावर वाइन शॉप (Wine Shop) असं लिहिलेलं असतं. या दुकानात वाइन, लीकरचे विविध प्रकार मिळतात, पण तरीही त्याला वाइन शॉप म्हटलं जातं.

मुंबई, 05 मार्च: एखाद्या वस्तूचं नाव हे तिचं वैशिष्ट्य सांगत असतं. अर्थात हे सांगण्यामागं काही कारणं आहे. आपण बाजारात जातो तेव्हा दुकानावर लावलेल्या बोर्डवरील नावांवरून त्या दुकानात नेमक्या कोणत्या वस्तू विक्रीसाठी आहेत, हे समजतं. उदाहरण द्यायचं झालं तर बोर्डावर मिठाई असं लिहिलेल्या दुकानात साहजिकच विविध प्रकारची मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असते. दुकानाच्या बोर्डावर पेढे, बर्फी आदी केवळ ठराविक पदार्थांचा उल्लेख असतो. अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि सौंदर्य प्रसाधनं विक्री करणाऱ्या दुकानाच्या बोर्डवर बऱ्याचदा सुपर मार्केट असं लिहिलेलं असतं. तसंच काहीसं दारू विक्रीच्या (Liquor sales) दुकानाबाबत आहे.

खरं तर कोणतंही व्यसन (Addiction) आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारक असतं. पण तरीही मद्यपान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अल्कोहोल, वाइन (Wine) खरेदीसाठी जेव्हा कुणी दुकानात जातं. तेव्हा त्या दुकानावरील बोर्डाकडं नकळत लक्ष जातं. सर्वसामान्यपणे दारू विक्रीच्या दुकानावर वाइन शॉप (Wine Shop) असं लिहिलेलं असतं. या दुकानात वाइन, लीकरचे विविध प्रकार मिळतात, पण तरीही त्याला वाइन शॉप म्हटलं जातं. यामागे ट्रेंड हे एक प्रमुख कारण सांगितलं जातं. या व्यतिरिक्त यामागं अजूनही काही कारणं आहेत.

हे वाचा-71 वर्षीय आजीचं 17 वर्षीय कोवळ्या मुलावर प्रेम; लेकाच्या मृत्यूनंतर लगेच लग्न

देशात फ्युएल स्टेशनवर (Fuel Stations) पेट्रोल आणि डिझेल असं दोन्ही मिळतं. पण तरीही फ्युएल स्टेशनला पेट्रोल पंप म्हटलं जातं. कारण बहुतांश लोक पेट्रोलचा वापर अधिक करतात. दारू दुकानाच्या बोर्डवर वाइन शॉप लिहिण्यामागं असचं काहीसं कारण आहे. खरं तर वाइन शॉपमध्ये वाइनसह विविध प्रकारची दारू मिळते. पण वाइन शॉप हा शब्द प्रचलित झाला आहे. दारूच्या दुकानाला वाइन शॉप म्हणण्यामागं विशेष तथ्य नाही. पूर्वीच्या काळी राजेशाहीत वाइनचा वापर जास्त होता. त्यावेळी दारू म्हणून केवळ वाईन प्यायली जात असे, असे म्हटले जाते. त्यामुळे ती अधिक लोकप्रिय होती. तसंच वाइन तयार करणं खूप सोपं होतं. वाइनची निर्मिती कोणत्याही मशिनरीच्या वापराविना करता येत होती. तसंच ती डिस्टिलरी दारूच्या (Distillery liquor) श्रेणीतही येत नव्हती. बऱ्याच काळानंतर दारूचा वापर सुरू झाला.

हे वाचा-...अन् कॅफिन पावडर ठरली 'विष'! सप्लिमेंट ड्रिंक पिताच तरुणाचा मृत्यू

दारू ही वाइनच्या नावाने ओळखली जाऊ लागल्यानंतर दुकानांमध्येही तिचा वापर सुरू झाला आणि तिच पद्धत पुढे रुढ झाली. त्यामुळे दारू विक्रीच्या दुकानाला वाइन शॉप म्हणण्यामागे केवळ ट्रेंड आणि बोलण्यात रुढ झालेला शब्द ही कारणं आहेत असं म्हणता येईल.

(Disclaimer- या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Liquor stock