मुंबई,07 मार्च: अनेक लोक आपल्या केसांना हेअर स्पा करण्याविषयी बोलत असतात. पण या स्पा मुळे नेमक काय होतं असे अनेक प्रश्न पडतात. हेअर स्पा का करायचा याची उत्तर अनेकांकडे नसतात. हेअर स्पा करण्यासाठी खरं तर करण्याआधी तुम्ही त्याचे फायदे माहीत करून घेणं गरजेचं आहे. हेअर स्पाला एक प्रकरे डी-स्ट्रेस थेरपी मानलं जातं. महिन्यातून एकदा हेअर स्पा केल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. री-हाइड्रेटिंग थेरेपी केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी मदत करते. हेअर स्पा करण्यासाठी थोडा जास्त खर्च येत असला तरी देखील स्पामुळे तुमची केस गळती कमी होते तसंच कोंडादेखील कमी होतो.
केसांची मुळं मजबूत होतात
हेअर स्पामुळे तुमच्या केसांची मुळं मजबूत होतात. जर तुमचे केस गळत असतील, घट्ट बांधल्यावर तुम्हाला त्रास होत असेल तर हेअर स्पा करणं गरजेचं आहे. तुमचे केस जास्त गळत असतील तर त्यासाठी हेअर स्पा अधिक फायद्याचं ठरेल. स्पा केल्यानंतर तुमच्या केसांना पोषण मिळतं.
मुळांना उत्तम प्रकारे तेल मिळत
हेअर स्पा थेरेपीमध्ये तुमच्या डोक्याला मालिश केल जातं. यामुळे ब्लड सर्क्युलेशन नीट होतं. यामुळे तुमच्या केसांची वाढ योग्यप्रकारे होते. तुमच्या केसांना ऑक्सिजन देण्याच काम देखील केलं जात.
केसांची मुळं स्वच्छ होतात
हेअर स्पाच्या मदतीने केसांच्या मुळांची योग्य प्रकारे सफाई केली जाते. तुमच्या केसातील छोटी छिद्रं आणि धुळीचे कण देखील साफ केले जातात. केसांच्या वाढीसाठी हेअर स्पा महत्त्वाचा आहे.
तणावमुक्ती मिळते
हेअर स्पा केल्यानंतर तणावमुक्त आणि फ्रेश वाटतं. स्पानंतर तुमच्या केसांच्या समस्या दूर होतात. हेअर स्पा करणाऱ्यांना हलकं वाटतं.
हे वाचा:काय आहे शिल्पा शेट्टीच्या फिगरच रहस्य? रोज जेवणात असतात हे पदार्थ
इन्स्टंट एनर्जी हवी मग चहा-कॉफी सोडा, फक्त जिने चढा-उतरा