Home /News /lifestyle /

पायात घालणाऱ्या स्लीपरला 'हवाई चप्पल' का म्हणतात? जाणून घ्या यामागील कारण

पायात घालणाऱ्या स्लीपरला 'हवाई चप्पल' का म्हणतात? जाणून घ्या यामागील कारण

हवेत उडणाऱ्या जहाजाला एरोप्लेन किंवा हिंदीत हवाई जहाज असं म्हटलं जातं. पण पायात घातल्या जाणाऱ्या चपलांना किंवा स्लिपरला हवाई चप्पल (Hawaii Chappal) का म्हणतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

    नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : कोणत्याही वस्तूच्या नावामागं इतिहास (History) आणि काही कारणं दडलेली असतात. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट असं नाव हे त्या गोष्टीमागील इतिहास आणि वैशिष्टयानुसार दिलं गेलेलं असतं. ही बाब केवळ माणसांनाच लागू होत नाही, तर वस्तूचं नामकरण देखील याच आधारावर केलं जातं. आता विमानाचं (Aeroplane) उदाहरण पाहा ना, हवेत उडणाऱ्या जहाजाला एरोप्लेन किंवा हिंदीत हवाई जहाज असं म्हटलं जातं. पण पायात घातल्या जाणाऱ्या चपलांना किंवा स्लिपरला हवाई चप्पल (Hawaii Chappal) का म्हणतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? हवाई चप्पल घातल्यानंतर माणूस नक्कीच हवेत उडू लागत नाही. परंतु, हवाई चप्पल घातल्यानंतर पायांना आरामशीर आणि हलकं वाटतं. या कारणामुळं या नावाला हवाई शब्दाची जोड देण्यात आली आहे. परंतु, हा युक्तिवाद बरोबर नाही. वास्तविक हवाई चप्पल हे नाव त्याच्या निर्मिती किंवा उत्पत्तीशी संबंधित आहे. अनेक इतिहास तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेत (America) हवाई (Hawaii) नावाचं बेट (Island) आहे. या बेटावर एक वैशिष्टयपूर्ण असा वृक्ष (Tree) आढळतो. हा वृक्ष `टी `नावानं ओळखला जातो. या झाडापासून एक विशेष रबरासारखं फॅब्रिक (Fabric) तयार केलं जातं. हे फॅब्रिक अतिशय लवचिक असतं. या फॅब्रिकपासून चप्पल तयार केली जाते. त्यामुळे त्यास हवाई चप्पल असं म्हणतात. हे ही वाचा-विचित्र! एकाच छताखाली, पण राहतात वेगवेगळे; या जोडप्यानं घरातच उभारलीय भिंत हवाई चप्पलचा इतिहास जपानशी (Japan) देखील जोडला गेलेला आहे. आपण जी चप्पल घालतो त्याची रचना पूर्वी जपानमध्ये वापरण्यात येणाऱ्या चपलेसारखी होती. तिला जोरी असं म्हणतात. अमेरिकेतील हवाई बेटावर काम करण्यासाठी जपानमधून मजूर पाठवले जात. हे मजूर जपानी चप्पल घालून हवाई बेटावर गेले होते. तिथं या चपलांची निर्मिती टी वृक्षापासून मिळालेल्या रबरासारख्या मटेरियल पासून केली गेली. या चपलांचा वापर दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकी सैनिकांनी केला होता. अशा पध्दतीनं जगभरात ही चप्पल हवाई चप्पल म्हणून प्रसिद्ध झाली. चपलांच्या इतिहासाविषयी बोलायचं झालं तर हवाई चपलेचा इतिहास खूप जुना आहे. अनेक देशांमधून प्रवास करत ही चप्पल भारतात दाखल झाली. भारतात (India) ही चप्पल आणण्याचं श्रेय बाटा (Bata) कंपनीला जातं. यापूर्वी ब्राझीलमध्ये (Brazil) हवाईनाज कंपनीनं वैशिष्ट्यपूर्ण चप्पल तयार करून जगभरात प्रसिद्धी मिळवली होती. परंतु, त्यापूर्वीच भारतात बाटानं याची सुरुवात केली होती. आजही बाटाचं नाव भारतातील अव्वल चप्पल उत्पादक कंपन्यांच्या यादीत टॉपला आहे.
    First published:

    Tags: America, History

    पुढील बातम्या