मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कंडोम वापरात भारत मागे का? NFHS नं प्रकाशित केला धक्कादायक रिपोर्ट

कंडोम वापरात भारत मागे का? NFHS नं प्रकाशित केला धक्कादायक रिपोर्ट

आपल्या देशात कंडोमचा वापर कमी का आहे? कंडोम वापरात जागतिक पातळीवर भारताचं स्थान कुठे आहे? अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कंडोमॉलॉजी रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

आपल्या देशात कंडोमचा वापर कमी का आहे? कंडोम वापरात जागतिक पातळीवर भारताचं स्थान कुठे आहे? अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कंडोमॉलॉजी रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

आपल्या देशात कंडोमचा वापर कमी का आहे? कंडोम वापरात जागतिक पातळीवर भारताचं स्थान कुठे आहे? अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कंडोमॉलॉजी रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

  मुंबई 28 मे: तरुणांच्या शाश्वत विकासाकरिता त्यांचं लैंगिक आरोग्य (Sexual & Reproductive Health) चांगलं असण्याची गरज आहे. त्याची नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी कंडोम अलायन्सने भारतातला पहिला कंडोमॉलॉजी रिपोर्ट सादर केला आहे. कंडोम निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसह त्या उद्योगाशी संबंधित असलेल्या अन्य घटकांनी एकत्र येऊन कंडोम अलायन्सची (Condom Alliance) निर्मिती केली आहे. कंडोम वापरण्यामागचं ग्राहकाचं मानसशास्त्र म्हणजे कंडोमॉलॉजी (Condomology). कंडोम वापरण्यामागची ग्राहकाची भूमिका, तो वापरायचा की नाही याबद्दलची त्याची भूमिका, त्याबद्दलचे समज-गैरसमज आदींचा वेध कंडोमॉलॉजी रिपोर्टमध्ये घेण्यात आला आहे.

  50 टक्के लोकसंख्या 24 वर्षांखालची असलेल्या आणि 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालची असलेल्या देशात 20 ते 24 या वयोगटातले 78 टक्के पुरुष त्यांच्या लैंगिक जोडीदाराबरोबर गर्भनिरोधक साधनाचा (Contraceptives) म्हणजेच कंडोमचा वापर करत नाहीत. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-4मध्ये (NFHS-4) हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. लैंगिक आरोग्याबद्दलची जागरूकता निर्माण करणं किती आवश्यक आहे, हे यावरून कळतं. तरुणांच्या शाश्वत विकासाचं उद्दिष्ट गाठण्यामध्ये अनियोजित गर्भारपण, असुरक्षित गर्भपात आणि लैंगिक संसर्ग पसरण्याचं वाढतं प्रमाण हे अडथळे आहेत.

  फक्त एका डोसमध्येच करणार कोरोनाचा खात्मा; Johnson and johnson च्या single shot लशीला मंजुरी

  आपल्या देशात कंडोमचा वापर कमी का आहे? कंडोम वापरात जागतिक पातळीवर भारताचं स्थान कुठे आहे? अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कंडोमॉलॉजी रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कॅज्युअल डेटिंग अॅप्सही आली आहेत. तरीही तरुण अद्याप वर्षानुवर्षांच्या सामाजिक बंधनांत अडकले असून, सुरक्षित लैंगिक संबंध आणि गर्भनिरोधक साधनं यांची अचूक आणि आवश्यक असलेली माहिती मिळवण्याचं प्रमाण कमी आहे.

  विवाहपूर्व लैंगिक संबंधांमध्ये कंडोम वापरणाऱ्या तरुण स्त्रियांचं प्रमाण केवळ सात टक्के असून, तरुण पुरुषांचं प्रमाण 27 टक्के आहे. 2011मध्ये पॉप्युलेशन कौन्सिलने भारतातल्या विवाहपूर्व संबंधांमध्ये (Pre-marital Sex) कंडोमचा वापर या विषयावर केलेल्या सर्वेक्षणात असं आढळलं, की केवळ तीन टक्के स्त्रिया आणि 13 टक्के पुरुष कायम कंडोमचा वापर करतात.

  भयंकर! सौंदर्याच्या नादात जीवाशी खेळ; नाजूक पायांसाठी नस कापून घेतायेत तरुणी

  गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्यासंदर्भात सरकारी, तसंच अन्य संस्थाही वारंवार जागरूकता मोहिमा राबवत असतात. तरीही कंडोमच्या बाजारपेठेचा वार्षिक वृद्धीदर गेल्या काही वर्षांत केवळ दोन टक्के एवढाच राहिला आहे. 1994 ते 2019 या कालावधीत पुरुषांच्या कंडोमवापरावर अवलंबून असलेल्या स्त्रियांच्या संख्येत 64 दशलक्षवरून 189 दशलक्षपर्यंत वाढ झाली आहे.

  नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-4मध्ये नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, भारतातला कंडोम वापर केवळ 5.6 टक्के आहे. तो जागतिक स्थितीपेक्षा खूप कमी आहे.

  'मी कंडोम वापरण्याची गरज का आहे? कंडोम वापरण्याचा निर्णय योग्य आहे का? कंडोम कसा मिळवू?' अशा प्रश्नांच्या आधारे कंडोमॉलॉजी रिपोर्टमध्ये अडचणी आणि मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

  कंडोम अलायन्सचे सदस्य रवी भटनागर म्हणाले, 'परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व घटकांना हा रिपोर्ट जागृत करतो आणि आवश्यक असलेली वर्तनसुधारणा पुढे आणतो. पौगंडावस्थेतल्या मुलांना शिक्षण देण्याची अंमलबजावणी, केमिस्टना कंडोम खरेदी-विक्रीच्या व्यवहारांदरम्यान संवेदनशीलता पाळण्याचं प्रशिक्षण, कंडोमच्या जाहिरातींवर असलेले निर्बंध हटवणं अशा खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. कंडोम वापरण्याचा योग्य निर्णय घेण्यात तरुणांना येत असलेल्या मानसिक आणि सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी समाजाने तातडीने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.'

  टीटीके प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस लिमिटेडचे (TTK Protective Devices) उपाध्यक्ष आणि कंडोम अलायन्सचे सदस्य बालाजी यांनीही या सुरात सूर मिसळला. 'गेलं वर्षात मानवजात म्हणून आपल्या आरोग्याला महत्त्व देणारे निर्णय घेण्याचं महत्त्व समजलं आहे. लैंगिक आरोग्याबद्दलचे चांगले व योग्य निर्णय घेण्यात तरुणांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचीही हीच योग्य वेळ आहे. हा रिपोर्ट त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. संबंधित घटकांमध्ये याबद्दल चर्चा होऊन सुरक्षित लैंगिक संबंध, गर्भनिरोधक घटक आदींबद्दलची चर्चा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे.'

  First published:
  top videos

   Tags: Health