Home /News /lifestyle /

घड्याळात साडे एक वाजले असे म्हणण्या ऐवजी दीड वाजला असं का म्हणतात?

घड्याळात साडे एक वाजले असे म्हणण्या ऐवजी दीड वाजला असं का म्हणतात?

watch

watch

घड्याळात साडे एक वाजले असे म्हणण्या ऐवजी दीड वाजला(Why 1:30 Called Dedh and 2:30 Called Dhai) असं का म्हणतात? जाणून घ्या...

  नवी दिल्ली, 30 नोव्हेेबर: लहान मुलं जेव्हा घड्याळ (Watch) बघायला शिकतात, तेव्हा त्यांच्याकडून सामान्यतः 2 चुका होतात. यात पहिली गोष्ट म्हणजे घड्याळातले काटे ओळखताना ते गोंधळतात आणि मोठ्या काट्याला तास काटा तर छोट्या काट्याला मिनिट काटा म्हणतात. दुसरी चूक म्हणजे 10.30, 11.30, 12.30 यास ते अनुक्रमे साडेदहा, साडेअकरा आणि साडेबारा म्हणतात. परंतु, 1.30 आणि 2.30 वाजले असता ते साडेएक आणि साडेदोन म्हणतात. या दोन्ही वेळांना अनुक्रमे दीड (Dedh) आणि अडीच म्हणतात, हे त्यांना ठाऊक नसतं. तुमच्या घरातल्या लहान मुलांनीही अशी चूक केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तुम्ही काय उत्तर दिलं? खरं तर साडेदहा, साडेअकरा वाजले असं आपण म्हणतो, मग साडेएक आणि साडेदोन वाजले असं का म्हणत नाही? यामागं नेमकं कोणतं कारण आहे? भारतीय कालमापन प्रणालीत साडे (Sade), पावणे (Paune), सव्वा (Sava) आणि अडीच असं म्हणणं प्रचलित आहे.

  पूर्वी अपूर्णांकाचे पाढेही शिकवले जात

  हे सगळे भारतातले मूळचे गणितातले (Mathematics) शब्द आहेत. हे शब्द अपूर्णांकात गोष्ट स्पष्ट करतात. भारतात वजन (Weight) आणि वेळ (Time) या गोष्टी अपूर्णांकातही सांगण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो. भोपाळ समाचार वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या काळात मुलांना 2,3,4,5 असे पूर्णांकांचे पाढे शिकवले जातात. पूर्वीच्या काळी पावकी, निमकी, सवायकी, पाऊणकी, दीडकी आणि अडीचकी असे अपूर्णांकांचे पाढेही शिकवले जायचे. ज्योतिषशास्त्रातदेखील या अपूर्णांकांचा वापर केला जातो. ¼ म्हणजे पाव, ½ म्हणजे अर्धा, ¾ म्हणजे पावणे, प्लस ¼ म्हणजे सव्वा या शब्दांचा वापर केला जातो. या शब्दांचा वापर घड्याळासाठीदेखील केला जाऊ लागला. वेळेची बचत आणि सुलभता हे त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणता येईल. साडेएक म्हणण्यापेक्षा दीड म्हणणं, 4 वाजून 15 मिनिटं म्हणण्याऐवजी सव्वाचार म्हणणं, 4 वाजण्यास 15 मिनिटं बाकी म्हणण्याऐवजी पावणेचार म्हणणं पटकन म्हणण्यासारखं आणि सोपं आहे. त्यामुळे या गणितीय शब्दांचा वापर घड्याळासाठी केला जाऊ लागला. घड्याळाप्रमाणे वजनासाठीसुद्धा हे शब्द वापरले जाऊ लागले. वजनात एक पाव किंवा पावशेर याचा अर्थ 250 ग्रॅम आहे. या व्यतिरिक्त दीड किलो, अडीच किलो, सव्वा किलो यांसारख्या शब्दांचा वापर वस्तू मोजण्यासाठी केला जातो. हिंदीत हेच शब्द डेढ, ढाई, सवा, पौने अशा प्रकारे वापरले जातात.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  पुढील बातम्या