Home /News /lifestyle /

आजी, आईचं ऐका! Menstrual Periods मध्ये 3 दिवस डोकं धुवू नका; यामागे वैज्ञानिक कारणही आहे

आजी, आईचं ऐका! Menstrual Periods मध्ये 3 दिवस डोकं धुवू नका; यामागे वैज्ञानिक कारणही आहे

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मासिक पाळीच्या (Menstrual Periods) काही नियमांना वैज्ञानिक आधार आहे. त्यापैकीच एक म्हणजे या दिवसांमध्ये केस न धुणं.

मुंबई, 29 डिसेंबर : मासिक पाळीसंदर्भात (Menstrual Periods) अनेक नियम समाजामध्ये पाहायला मिळतात. काही नियम महिलांच्या फायद्याचे आहेत, तर काही अंधविश्वासावर टिकलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलेला मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती असणं आवश्यक आहे. आपण पाहतो, की प्रत्येक घरामध्ये महिलेला किंवा मुलीला मासिक पाळी आल्यानंतर चार दिवस डोकं न धुण्यास (Hair Wash in Periods) आई किंवा आजीकडून सांगितलं जातं. पण सध्याच्या काळात अनेक महिला हे नियम पाळत नाहीत. वास्तविक हा नियम महिलांच्या आरोग्यासाठी योग्य असल्याचं दिसतं. मासिक पाळीमध्ये काही महिलांना रक्तस्रावातून गुठळ्या पडतात. त्यामुळे पोटदुखी आणि संसर्गाचा त्रास होतो. त्रासापासून सुटका मिळावी म्हणून महिला यावर औषध घेतात; मात्र अनेकदा औषधं घेतल्यानंतरसुद्धा ही समस्या सुटत नाही. अशा वेळी DNC करण्याची वेळ येते. रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या वेळीच कमी झाली नाही, तर कर्करोगही होऊ शकतो. रक्तस्राव व्यवस्थित व्हावा, यासाठी काही पथ्यं पाळणं गरजेचं असतं. त्यातलंच एक पथ्य म्हणजे त्या चार दिवसांत डोकं न धुणं हे होय. हे वाचा - तुमच्या मुलांचं असं हसणं हसण्यावर घेऊ नका; ही बाललीला नव्हे तर भयंकर आजार मासिक पाळीच्या दिवसात मोकळेपणे रक्तस्राव (Open Bleeding) होणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीरातलं अशुद्ध रक्त चांगल्या प्रकारे बाहेर पडते. असा रक्तस्राव होण्यासाठी शरीर उबदार असणं गरजेचं आहे. प्रत्येकीचं मासिक पाळीचं चक्र (Menstruation Cycle) वेगळं असतं. काहींना तीन दिवस, काहींना पाच दिवस तर काहींना सात दिवस रक्तस्राव होतो. या सगळ्यात पहिले तीन दिवस खूप महत्त्वाचे असतात. यादरम्यान डोकं धुतलं, तर शरीराचं तापमान कमी होतं आणि अशा स्थितीत रक्तस्राव मुक्तपणे होत नाही आणि स्त्रीला त्रास सहन करावा लागतो. हे वाचा - आता मूल नको म्हणून वारंवार गर्भनिरोधक गोळ्या घेताय तर सावधान! भविष्यात मोठा धोका टीव्ही 9 हिंदीच्या रिपोर्टनुसार मासिक पाळीत मुक्तपणे रक्तस्राव व्हावा म्हणून पहिल्या तीन दिवसात डोकं धुवू नये. मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसांतच आपलं डोकं धुवावं. किमान तीन दिवस तरी डोकं धुतलं जाणार नाही, याची काळजी घ्या. तसंच तिसऱ्या दिवशी डोकं धुणार असाल तर कोमट पाण्याचा वापर करावा. यामुळे अस्वस्थता कमी होते आणि रक्तप्रवाह सुधारतो. याशिवाय, वेदना कमी होतात आणि शरीराला आरामही मिळतो. डोकं धुवायचं नाही म्हणजे स्वच्छता ठेवायची नाही, असं समजू नये. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण, मासिक पाळीच्या काळात स्वच्छता न राखल्यास इन्फेक्शनची समस्याही निर्माण होऊ शकते.
First published:

Tags: Health, Lifestyle, Periods, Woman

पुढील बातम्या