जास्त गोड खाणंही एक व्यसन; अशी आहेत या व्यसनाची लक्षणं

जास्त गोड खाणंही एक व्यसन; अशी आहेत या व्यसनाची लक्षणं

जेव्हा व्यक्ती साखर किंवा गोड खाणं बंद करते तेव्हा तिच्यावर तसाच प्रभाव पडतो, जसं ड्रग्ज व्यसन असलेल्यांवर होतो.

  • Last Updated: Jul 15, 2020 06:32 PM IST
  • Share this:

जेव्हा वजन कमी करायचे असते तेव्हा पण आहारची विशेष काळजी घ्यायला हवी. वजन वाढण्याचे मुख्य कारण साखर आहे. विशेषतः पोट वाढण्याचे. जर कुणा तज्ज्ञाला तुम्ही वजन कमी करण्याविषयी विचाराल तर ते सगळ्यात आधी आहारातील साखर कमी करण्याचा सल्ला देतील. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला सांगतात की, साखरेच्या सेवनाने लठ्ठपणा, मधुमेह, डिमेन्शिया हृदय रोगसांधे, अल्जाइमर, सांधेदुखी, किडनी हे आजार होतात. साखर खाणे म्हणजे एक प्रकारे मादक पदार्थांचे सेवन आहे. जेव्हा व्यक्ती साखर खाणे बंद करते तेव्हा तिच्यावर तसाच प्रभाव पडतो, जसा ड्रगचे व्यसन करणाऱ्यांवर होतो. साखर बंद केल्यानंतर डोकेदुखी, चिडचिडेपणा, थकवा अशी लक्षणे दिसून येतात. काही लोकांना पचनाची समस्या पण होऊ शकते. तरीही काळानुरूप शरीर बदल स्वीकारते. शरीराच्या प्रक्रियांमध्ये कुठलाच बदल होत नाही.

असे कमी करा साखरेचे सेवन

आपल्या जीवनशैलीशी संबंधित सवयींना समजून घेताना साखर कुठल्या प्रकारे आपल्या शरीरात जाऊन शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवते ते पाहायला हवे. केवळ खूप मिठाई खाण्याने साखरेचे प्रमाण वाढत नाही तर व्यायामाचा अभाव, गतिहीन जीवनशैली, असंतुलित आहार हे पण साखर वाढवण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे साखरेचं सेवन कसं कमी करायचं आणि रक्तशर्करा कशी नियंत्रणात ठेवायची, हे समजून घेणं गरजेचं आहे.

विचारपूर्वक खा

चविष्ट पदार्थ खाण्याचा आनंद लुटतांना ते किती प्रमाणात खायचे याचे भान असणे गरजेचे आहे. जेवताना लहान ताटाचा उपयोग करा. काय खायचे आणि किती खायचे यावर लक्ष असू द्या. myupchar.com चे एम्स मधील डॉ. अनुराग शाही यांनी सांगितलं, रक्तातील साखरेचे किंवा ग्लुकोजचे प्रमाण वाढले व्यक्तीला मधुमेह होतो. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी तर जेवण विभागून घ्यायला हवे, आणि गोड अजिबात खाऊ नये.

आहाराचे नियोजन करा

भरपूर नाश्ता केला तर पोट खूप वेळ भरलेले राहते. नाश्त्यात तंतुमय पदार्थ आणि पोषक पदार्थांचा समावेश असायला हवा. दुपारचे जेवण हे प्रथिनयुक्त असावे. ब्रेड, बटाटे, सॉस, पांढरे तांदूळ असे अति कार्ब वाले पदार्थ दिवसा खाणे टाळावे. आपले फ्रीज हिरव्या पालेभाज्या आणि फळांनी भरलेले असावे.

भरपूर पाणी प्या

आपल्या आहारातून गोड पेय जसे सोडा, बाजारात मिळणारे ज्युस पिणं टाळा. त्याऐवजी भरपूर पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी एक लीटर पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले राहते, पोटातील विषारी पदार्थ साफ होतात. रोज किमान 3 लीटर पाणी प्यायला पाहिजे.

व्यायामाऐवजी नाच करा

जर व्यायाम करायला कठीण वाटत असेल तर मनमोकळेपणे नाचा. त्याने शरीरातील अतिरिक्त कॅलेरी बर्न होतात. मिठाई आणि तुपातील पदार्थ खाल्ल्यानंतर स्वस्थ राहण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

हुशारीने निवड करा

नेहमीच आरोग्याला उत्तम ठेवणारे पर्याय निवडा. जास्त खाण्याचा प्रयत्न करू नका आणि काही गोड खावेसे वाटलेच तर सुकामेवा, फळे, दही खा.

डिटॉक्सिफिकेशनचे तंत्र वापरा : चहा किंवा कॉफीऐवजी ग्रीन टी प्या त्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडायला मदत होते. दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पिऊन करा.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मधुमेह माहिती: लक्षणे, कारणे, उपचार...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 15, 2020, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading