मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /थंडीच्या दिवसात का पसरतं दाट धुकं? जाणून घ्या शास्त्रीय कारण

थंडीच्या दिवसात का पसरतं दाट धुकं? जाणून घ्या शास्त्रीय कारण

धुकं आणि धुरकं यातील फरक काय?

धुकं आणि धुरकं यातील फरक काय?

धुकं आणि धुरकं यातील फरक काय?

    नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : अजूनही विचित्र हवामानामुळे अनेक ठिकाणी अधूनमधून पाऊस पडतो आहे. तरीही सध्याचा काळ हिवाळ्याचा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात धुक्‍याची (Fog) चादर आसमंतात पसरल्यासारखी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते. अनेक ठिकणी धुकेच धुके पसरल्याचं दिसतं.

    त्यामुळे टेकड्या, शहरातल्या उंच इमारती आणि महामार्ग दाट धुक्‍यात हरवून जातात. दाट धुक्यामुळे गाडी चालवताना समोरचं काहीच दिसेनासं होतं. त्यामुळे वाहनांचा वेगही मंदावतो. दाट धुक्‍यामुळे विमान, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो. शेकडो विमानांची उड्डाणं रद्द करावी लागू शकतात. पहाटे धुकं खूप जास्त प्रमाणामध्ये असते. हिवाळ्यात एवढं धुकं का पडतं? धुक्याशी संबंधित काही खास गोष्टी (Fog causes in winter) जाणून घेऊ या. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

    हवेचं तापमान आणि दवबिंदू यांच्यातला फरक हा 2.5 डिग्री सेल्सियसपेक्षा (4.5 Degree Fahrenheit) कमी झाल्यानंतर धुकं पडतं. हवेत असलेली पाण्याची वाफ पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतरित होते, तेव्हा धुकं तयार होऊ लागतं. आपल्या सभोवतालच्या हवेत असलेल्या पाण्याच्या वाफेला आपण आर्द्रता म्हणतो. हिवाळ्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या उबदार हवेतली पाण्याची वाफ (Water vapor) वर असलेल्या थंड हवेमध्ये मिसळून गोठली जाते. या प्रक्रियेला द्रवीकरण म्हटलं जातं. जेव्हा हवेत जास्त द्रवीकरण होते, तेव्हा ते जड होतं आणि त्याचं रूपांतर पाण्याच्या लहान थेंबांमध्ये होतं.

    पाण्याच्या बाष्पाचा एक प्रकार म्हणजे धुकं होय. हवा काही ठराविक प्रमाणामध्ये वायू अवस्थेत किंवा वाफ स्वरूपात जल धारण करू शकते. जास्तीत जास्त पाणी हवेच्या स्वरूपात राहतं. हवेतल्या पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास हवा अधिक ओलसर होते. हवेतलं पाणी विरघळून ते वायूपासून द्रवरूपात बदलते. या प्रकियेमुळे धुकं निर्माण होतं.

    हे ही वाचा-हिवाळ्यात तुमच्या आवडत्या पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी, फॉलो करा हे 5 उपाय

    सभोवतालच्या थंड हवेशी संपर्क आल्यानंतर ते धुरात रूपांतरित होतं. यालाच हवामानशास्त्रज्ञ धुक्याची निर्मिती असंही म्हणतात. औद्योगिकीकरण झालेल्या भागात धुकं अधिक दाट झाल्याचं पाहायला मिळतं. याला धुरकं अर्थात 'स्मॉग' (Smog) असे म्हटलं जातं. धूर आणि धुकं यांचे मिश्रण म्हणजे स्मॉग. यासोबतच कारखान्यांच्या धुरापासून निर्माण होणाऱ्या ढगाला स्मॉग म्हटलं जातं. धुकं असलेल्या ठिकाणी जागोजागी दवबिंदूदेखील पाहायला मिळतात. धुकं जास्त काळ दिसत नाही. सूर्योदयानंतर ते काही काळच टिकतं. प्रदेशातल्या तापमानावर धुक्याचं अस्तित्व अवलंबून असतं. हिवाळ्यात ढगाळ वातावरण असेल तर धुकं पसरण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि धुक्‍याचं साम्राज्य पाहायला मिळतं.

    First published:

    Tags: Winter