Home /News /lifestyle /

एकाला पाहून दुसऱ्याला का येते जांभई? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

एकाला पाहून दुसऱ्याला का येते जांभई? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जांभईचा संबंध फक्त झोपेशी किंवा कंटाळा येण्याशी नाही तर जांभई येण्यामागे अनेक मजेशीर कारणं (yawning science) आहेत.

    नवी दिल्ली, 26 मे : माणसाच्या शरीराच्या अनेक गरजा असतात. यातील काही गरजा शरीर विविधप्रकारे नैसर्गिकरित्या पूर्ण करत असतं. यातीलच एक प्रकार म्हणजे जांभई. जांभई (Yawning) आल्यानंतर आपल्याला थोडं बरं वाटतं. सामान्यत: जांभई आली की झोप आली किंवा कंटाळा आला असं आपण म्हणतो. तसंच एखाद्याला जांभई आली तर त्याच्या सभोवताली असलेल्या लोकांनादेखील हळूहळू जांभई (Contagious Yawning Behaviour) येऊ लागते. असं का होतं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जांभईचा संबंध फक्त झोपेशी किंवा कंटाळा येण्याशी नाही तर जांभई येण्यामागे अनेक मजेशीर कारणं (yawning science) आहेत. जांभई का येते आणि त्यामागे काय कारण आहे यावर अनेक वैज्ञानिक संशोधनं (science behind Yawning) करण्यात आली आहेत. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या एका रिपोर्टनुसार जांभईचा संबंध आपल्या मेंदूशी असतो. या रिपोर्टनुसार काम करत असताना तापलेला मेंदू थंड (Yawning for Cold brain) करण्यासाठी जांभई येते. जांभई आल्यामुळे शरीराचं तापमान स्थिर होतं. हिवाळ्यात ऑक्सिजनची जास्त गरज असते आणि त्यामुळे जांभई जास्त प्रमाणात येते. एकाला पाहून दुसऱ्याला का येते जांभई? म्युनिकमधील सायकियाट्रिक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलने (Psychiatric University Hospital) 2004 मध्ये केलेल्या संशोधनानुसार जांभईमुळे संसर्ग पसरतो. सुमारे 300 लोकांवर हे संशोधन (Research) करण्यात आले. यातील 50 टक्के लोक असे होते ज्यांना दुसऱ्याला पाहून जांभई आली. हे संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या दाव्यानुसार जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याला जांभई देताना पाहते तेव्हा तिची मिरर न्यूरॉन सिस्टम (Mirror Neuron System) अॅक्टिव्ह होते आणि ती नक्कल करण्यास प्रवृत्त होते. यामुळेच एकाला पाहून दुसऱ्याला जांभई आल्यासारखे वाटू लागते. एवढंच नाही तर नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असाही दावा करण्यात आला आहे की ज्या लोकांचा मेंदू जास्त काम करतो, ते खूप वेळ जांभई देतात. थकवा येण्यापेक्षा याचा संबंध मेंदूला थंड करण्याशी अधिक आहे. ओळखीच्या व्यक्तीला पाहिल्यावरच येते जांभई अ‍ॅनिमल बिहेवियर (Animal Behaviour) नावाच्या जर्नलमध्ये प्राध्यापक अँड्र्यू सी. गॅलप (Pro. Andrew C. Gallup) यांचे नुकतेच एक संशोधन प्रकाशित झाले. या संशोधनात गॅलप यांनी दावा केला आहे की, एकमेकांना पाहून येणारी जांभई फक्त अशा गटांमध्ये येते जे लोक सामाजिकदृष्ट्या एकमेकांना ओळखतात. 2020 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की, जेव्हा हत्तींसोबत राहणाऱ्या माहुताला जांभई आली, तेव्हा त्याच्या हत्तीलादेखील जांभई आली. कारण तो हत्ती सतत माहुतासोबत असायचा म्हणजे तो सामाजिकदृष्ट्या माहुताशी जोडला गेला होता. ही प्रक्रिया बाल्यावस्थेनंतर सुरू होते, जेव्हा मुलांचा मेंदू सामाजिकदृष्ट्या सक्रिय होतो.
    First published:

    पुढील बातम्या