संजय दत्तला झालेला फुफ्फुस कॅन्सरचा तिसरा टप्पा किती धोकादायक आहे वाचा

संजय दत्तला झालेला फुफ्फुस कॅन्सरचा तिसरा टप्पा किती धोकादायक आहे वाचा

अभिनेता संजय दत्तला (sanjay dutt) फुफ्फुसांचा कॅन्सर (lung cancer) आहे. त्याला तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सरचं निदान आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीचा त्याचा फोटोही व्हारयल झाला होतो. ज्यामध्ये त्याची अवस्था कशी झाली आहे, ती दिसून आली.

  • Last Updated: Sep 28, 2020 05:02 PM IST
  • Share this:

कर्करोगाचे (cancer) मुख्य कारण काय आहेत याबद्दल आजपर्यंत बरीच संशोधनं झाली आहेत. आजपर्यंत कर्करोगाचं कोणतंही ठोस कारण आढळलं नाही. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कर्करोग (lung cacer). फुफ्फुसाचा कर्करोग बहुधा धूम्रपान, गुटखा सेवन किंवा ड्रग्ज घेतल्यामुळे होतो. शिवाय आनुवंशिक कारणांमुळेही होतो मात्र हे निश्चितपणे सांगू शकत नाही.

फुफ्फुसाचा कर्करोग कसा होतो आणि त्याच्या प्रत्येक टप्प्याबद्दल जाणून घेऊया.

कसा होतो कर्करोग

आपल्या शरीरात पेशी तयार होणं आणि नष्ट होणं ही प्रक्रिया चालू असते. नवीन पेशी जुन्या पेशी पुनर्स्थित करतात. दररोज शरीरात सुमारे 40 हजार पेशी मरतात. ज्या पेशी नष्ट होतात त्याच प्रमाणात नवीन पेशी तयार होतात. या प्रक्रियेच्या दरम्यान निरनिराळ्या कारणांमुळे एका पेशीची निरंतर वाढ होते. शरीर त्या पेशीच्या यादृच्छिक वाढीस थांबवू शकत नाही. हेच कारण आहे की भविष्यात हे पेशी कर्करोगाचे रूप घेते.

फुफ्फुसांच्या कर्करोगाचा तिसरा टप्पा म्हणजे काय

कोणत्याही प्रकारच्या कर्करोगात, स्टेज -3 हा टप्पा असा असतो ज्यात कर्करोगाचे परिणाम शरीराच्या इतर भागांवर देखील होऊ लागतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाबद्दल बघायला गेलो तर स्टेज 3 म्हणजे कर्करोग  शरीराच्या एका भागामध्ये विकसित होतो आणि शरीराच्या इतर भागात पसरतो. याचा अर्थ असा होतो की फुफ्फुसांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग विकसित होतो आणि शरीराच्या इतर अवयवांना ग्रासतो.

फुफ्फुसांचा कर्करोगाचा चौथा टप्पा खूप धोकादायक

फुफ्फुसांच्या कर्करोगाचा चौथा टप्पा सर्वात धोकादायक आणि प्राणघातक मानला जातो. या स्थितीत पोहोचण्यापूर्वी जर फुफ्फुसांचा कर्करोग नियंत्रित केला गेला तर या आजारावर मात करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

फुफ्फुस कर्करोगाचा सर्वात जास्त धोका कुणाला?

फुफ्फुसांचा कर्करोग बहुधा वृद्ध लोकांना होतो. 40 वर्षांखालील लोकांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. आधीच फुफ्फुस खराब व्हायला लागले असतील तर फुफ्फुसांचा कर्करोग वाढतो.

ही खबरदारी घ्या

धूम्रपान किंवा मद्यपान फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णाने मुळीच करू नये. त्याशिवाय डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्राणायाम केला पाहिजे. सुरुवातीच्या काळात हलका श्वास घेऊन प्राणायाम करावा.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - कॅन्सर: लक्षणे, कारणे, उपचार, औषध...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 28, 2020, 5:02 PM IST

ताज्या बातम्या