मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कॉफी प्यायल्यानंतर लगेचच शौचाला का जावंसं वाटतं? अखेर मिळालं उत्तर

कॉफी प्यायल्यानंतर लगेचच शौचाला का जावंसं वाटतं? अखेर मिळालं उत्तर

coffee

coffee

कॉफी (Coffee) हे जगभरातल्या लाखो जणांचं आवडतं पेय आहे. एक कप कॉफी प्यायल्यानंतर काही जणांना एनर्जी मिळते, तर काहींना पोट साफ (digestion) होण्यासाठी कॉफी पिणं अत्यावश्यक असतं.

     नवी दिल्ली, 7 डिसेंबर: कॉफी (Coffee) हे जगभरातल्या लाखो जणांचं आवडतं पेय आहे. अनेक जणांचा दिवस कॉफीनं सुरू होतो. एक कप कॉफी प्यायल्यानंतर काही जणांना एनर्जी मिळते, तर काहींना पोट साफ (digestion) होण्यासाठी कॉफी पिणं अत्यावश्यक असतं. मात्र कॉफी प्यायल्यानंतर ताबडतोब पचनसंस्थेवर कसा परिणाम होतो हे मात्र अजूनही गूढच आहे.

    याबद्दल डॉ. रॉबर्ट मार्टिनडेल यांचा एक रिपोर्ट ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रकाशित झाला आहे. डॉ. रॉबर्ट हे ओरेगॉन हेल्थ सर्व्हिसेस अँड सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये हॉस्पिटल न्यूट्रिशन सर्व्हिसेसचे वैद्यकीय संचालकही आहेत. कॉफीमध्ये अन्ननलिकेचं दुसरं टोक अगदी काही मिनिटांमध्येच उत्तेजित करण्याची क्षमता असते. कॉफी पोटात गेल्याबरोबर मेंदूला संदेश जातो. यामुळे मोठ्या आतड्याचा सर्वांत मोठा भाग उत्तेजित होतो आणि आता आतड्यात काही गोष्टी खाली सरकायला लागल्यानं आम्हाला रिकामं होण्याची गरज आहे, असं या संदेशाचं स्वरूप असतं, असंही डॉ. रॉबर्ट यांनी म्हटलं आहे.

    कॉफी प्यायल्यानंतर लगेचच शौचाला जावंसं वाटत असलं, तरीही कॉफीला आतड्यांमधून (Intestine) प्रवास करायला एक तास तरी लागतो. कारण हे पेय छोटं आतडं (Small Intestine) मोठं आतडं असा सगळा प्रवास करतं. पोट, (Stomach), मेंदू (Brain) आणि मोठं आतडं यांच्यात होणारा हा संवाद म्हणजे खाण्याच्या क्रियेनंतरचा सर्वसाधारण प्रतिसाद आहे. या प्रक्रियेला गॅस्ट्रोकॉलिक रिफ्लेक्स (gastrocolic reflex) असं म्हणतात, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

    कॉफी प्यायल्यानंतर लगेचच शौचाला जाणाऱ्यांचं प्रमाण सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा किती तरी अधिक आहे असं डॉ. रॉबर्ट याचं म्हणणं आहे. त्यांच्या पेशंट्सपैकी जवळपास 60 टक्के जणांना तरी कॉफी प्यायल्यानंतर लगेचच हा परिणाम जाणवतो. यात स्त्री-पुरुष अशा सगळ्यांचाच समावेश आहे, असंही डॉ. रॉबर्ट यांनी सांगितलं.

    गेल्या वर्षी न्यूट्रिएन्ट्स जर्नलमध्येही एक संशोधन प्रकाशित झालं आहे. कॉफीमध्ये असलेल्या अनेक रसायनांमुळे (केमिकल्समुळे) तिच्यात मेंदू आणि आतड्यांमधल्या संवादावर परिणाम करण्याची क्षमता असते, असं या संशोधनात म्हटलं होतं. रोस्टेड कॉफीमध्ये हजारो बायोॲक्टिव्ह घटक असतात. कॉफी घेतल्याबरोबर लगेचच शौचास जावंसं वाटत असेल तर त्यासाठी पचनसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारे आपले काही हॉर्मोन्सही कारणीभूत असतात. गॅस्ट्रिन किंवा कोलेसिस्टोकायनिन ही दोन्ही हॉर्मोन्स यामध्ये महत्त्वाची असतात. कॉफी प्यायल्यानंतर ही दोन्ही हॉर्मोन्स लगेचच कार्यक्षम होतात. त्यामुळेच कॉफी प्यायल्यानंतर लगेचच शौचाला जावंसं वाटू शकतं.

    First published:
    top videos

      Tags: Coffee, Health, Health Tips