S M L

आपण आहारात मीठ का खातो ?

काहींच्या मते मीठ खाल्ल्याने मधूमेह होतो, तर कोणाला वाटतं मीठ शरीरासाठी चांगलं आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर आपला घसा मोकळा होतो. पण मंडळी...

Renuka Dhaybar | Updated On: May 28, 2018 02:16 PM IST

आपण आहारात मीठ का खातो ?

मुंबई, ता. 28 मे : मीठ, एका असा पदार्थ ज्याने आपल्या जेवणाला चव येते. अगदी म्हटलं तर रामायण आणि महाभारतापासून मिठाला मोठं महत्त्व आहे. आताही जेवण अळणी लागलं किंवा जास्त तिखट लागलं तर आपण सर्रास जेवनात जास्तीचं मीठ घालतो.

काहींच्या मते मीठ खाल्ल्याने मधूमेह होतो, तर कोणाला वाटतं मीठ शरीरासाठी चांगलं आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर आपला घसा मोकळा होतो. पण मंडळी या मिठाचे आणखी असे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत ते आपल्याला बहुतेक वेळा माहित नसतात.

त्यामुळे जाणून घेऊयात मिठाचे काही खास फायदे.


- मीठ आपल्या मांसपेशियांसाठी अतिशय गुणकारी आहे. मिठाने आपल्या मांसपेशियांना बळकटी मिळते.

- आपल्या रोजच्या आहारात मिठाचं प्रमाण समान ठेवल्याने शरीरात सोडीयम आणि पोटॅशियम तयार होण्यास मदत होते.

- आपल्या आहारात मीठाचे सेवन केल्याने कॅल्शियम आणि आयोडीनची कमतरता भासत नाही.

Loading...
Loading...

- मिठामुळे थायरॉईड सारख्या समस्यांपासून आपण लांब राहतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहार मिठात मोठा वाटा आहे.

- हो, आता जर तुम्ही डाएट करत असाल तर रोज ५ ग्रॅम मीठ आहारात वापरायला विसरू नका.

- मिठाने रक्तदाबावर नियंत्रण राहते.

- मिठाच्या योग्य वापराने त्वचेवरील आजार बरे होण्यास मदत होते.

- दररोज आयोडीनयुक्त मीठ आहारात वापरले तर ते शरीरासाठी उत्तम आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2018 02:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close