मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बारीक डोळ्यांचे चिनी ते बटबटीत डोळ्यांचे आफ्रिकी.. लोकांच्या डोळ्यांमध्ये का दिसते विविधता?

बारीक डोळ्यांचे चिनी ते बटबटीत डोळ्यांचे आफ्रिकी.. लोकांच्या डोळ्यांमध्ये का दिसते विविधता?

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Why people have different eye shapes: चीन ते आफ्रिकेपर्यंत लोकांच्या डोळ्यांच्या आकारात खूप फरक आहे. पण, असा फरक का आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

मुंबई, 14 फेब्रुवारी : 'डोळा' (Eye) या अवयवाशिवाय मानवी शरीर (Human Body) अपूर्ण आहे. डोळ्यांच्या मदतीनं आपण समोरील दृश्यं (Visuals) पाहू शकतो. आपल्या अवतीभोवती नेमकं काय सुरू आहे, हे समजण्यासाठी सर्वांत जास्त मदत डोळ्यांची होते. सर्वांच्या डोळ्यांचं कार्य सारखचं असलं तरी त्यांचा आकार मात्र वेगवेगळा असतो, ही बाब कदाचित तुमच्या निदर्शनास आलेली असेल. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांचा आकार (Shape of Eyes) काहीसा वेगळा असतो. भौगोलिक स्थितीचा (Geographical Conditions) विचार केला तर जगभरातील लोकांच्या डोळ्यांच्या आकारांमध्ये कमालीची विविधता दिसते. चीनपासून (China) ते आफ्रिकेपर्यंत (Africa) लोकांच्या डोळ्यांत खूप फरक दिसतो. हा फरक इतका जास्त आहे की एखादी व्यक्ती चीनची आहे, जपानची (Japan) आहे की आफ्रिकेची आहे हे फक्त डोळे पाहूनही ओळखता येतं. विविध देशांतील माणसांच्या डोळ्यांमध्ये इतका फरक का आहे? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

मानवी डोळ्यांच्या आकाराबाबत आतापर्यंत शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या थिअरी (Theory) मांडलेल्या आहेत. एका थिअरीनुसार, डोळ्याच्या वरील पापणीच्या (Upper Eyelid) भागात असलेल्या त्वचेखाली साठलेल्या चरबीमुळं डोळ्यांचा आकार निश्चित होतो. तर, दुसऱ्या एका थिअरीमध्ये, अल्ट्राव्हायोलेट किरणांना (Ultraviolet Rays) डोळ्यांचा आकार निश्चित करण्याचं श्रेय दिलं जातं. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार डोळ्यांचा आकार बदलण्यात अल्ट्राव्हायोलेट किरणं मोठी भूमिका बजावतात. सायन्स फोकस (Science Focus) या मॅगझिनमधील अहवालानुसार, पूर्व आशिआई, आग्नेय आशिया (Southeast Asia), पॉलिनेशियन (पॅसिफिक महासागरातील बेटांवरील रहिवासी) आणि मूळ अमेरिकेतील लोकांच्या डोळ्यांमध्ये असणार फरक स्पष्टपणे दिसून येतो. काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास डोळ्यांच्या वरच्या पापणीच्या भागामुळे त्यांच्या संरचनेत फरक दिसून येतो. कुठल्या व्यक्तीचे डोळे कसे असावेत ही बाब पापणीचा भाग ठरवतो.

वाढत्या वयासोबत नाश्त्यात घ्यायला हवेत हे हेल्दी फूड्स, नेहमी राहाल Powerful

एका थिअरीनुसार, आपले पूर्वज कुठल्या हवामानात (Weather) राहिले यावरदेखील आपल्या डोळ्यांचा आकार अवलंबून असतो. उदाहरणार्थ, थंड आणि उष्ण ठिकाणी जन्मलेल्या व्यक्तींच्या डोळ्यांवर हवामानाचा थेट परिणाम झाल्याचं रिसर्चमध्ये निदर्शनास आलं आहे. थंडी, अल्ट्राव्हायोलेट किरणं आणि वाळवंटातील उष्णतेचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो, त्यामुळे त्यांचा आकार बदलतो, असं तज्ज्ञ सांगतात. हवामानाचा परिणाम फक्त डोळ्यांच्या आकारावरच नाही तर शरीरातील इतर अवयवांवरदेखील होतो. शरीरावर परिणाम करणारे हे जीन्स (Genes) प्रत्येक पिढीकडून पुढील पिढीकडे ट्रान्सफर होतात.

वरील कारणांमुळे विविध देशांतील व्यक्तींच्या डोळ्यांचे आकार वेगळे असतात. त्याचा वापर करून कधीकधी आपण त्यांचं मूळ स्थान कोणतं असेल याचा अंदाज बांधू शकतो.

First published:

Tags: China