...म्हणून या देशातील अब्जाधीश सोडतायेत स्वतःचाच देश

या देशातलं तंत्रज्ञान आणि प्रगती पाहून तिथे स्थायिक होण्याचं स्वप्न आजही अनेकजण पाहतात.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 05:00 PM IST

...म्हणून या देशातील अब्जाधीश सोडतायेत स्वतःचाच देश

चीनमधील शांघाय येथे रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून काम करणाऱ्या चन तियनयॉन्गने देश सोडत माल्टाला गेला. येत्या काही वर्षात त्याचा देशात परतण्याचा कोणताही विचार नसल्याचं चनने स्पष्ट केलं आहे. देश सोडल्यानंतर त्याने सोशल मीडियावर 28 पानांचं एक लेख लिहिला. यात त्याने चीन सोडण्यामागची त्याची कारणं सविस्तर स्वरुपात लिहिली.

न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार चन तियनयॉन्गने लिहिले की, चीनची अर्थव्यवस्था ही एका अशा मोठ्या जहाजासारखी आहे जी केव्हाही बुडेल. जर योग्यवेळी सावरलं नाही तर हे जहाज कधीही बुडू शकतं आणि त्यातील प्रवाशी अडचणीत येतील. त्याने पुढे लिहिले की, माझ्या मित्रांनो जर तुम्ही हे सोडू शकता तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सोडा.

न्यू वर्ल्ड वेल्थच्या रिपोर्टनुसार अब्जाधीश देश सोडून जाण्याच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी चीन हा देश आहे. आतापर्यंत जवळपास 15 हजार अब्जाधीशांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते परदेशात जाऊन स्थायिकही झाले. यात दुसऱ्या स्थानावर रशिया हा देश आहे.

तसेच अब्जाधीशांनी ज्या देशात रहायला प्राधान्य दिलं अशा देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया अग्रेसर आहे. गेल्यावर्षी जवळपास 12 हजार अब्जाधीश ऑस्ट्रेलियात जाऊन स्थायिक झाले. तर या यादीत दुसऱ्या स्थानावर अमेरिका, तिसऱ्या स्थानावर कॅनडा, चौथ्या स्थानावर स्विर्त्झलँड तर पाचव्या स्थानावर यूएई हे देश आहेत.

रिपोर्टनुसार, अब्जाधिशांचं परदेशात स्थायिक होण्याची अनेक कारणं आहेत. यात सुरक्षा, उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा, पर्यावर आणि कमी गुन्हेगारीचा दर यामुळे अनेकजण परदेशात रहायला प्राधान्य देतात.

Loading...

जगभरातील अनेक शहरांमध्ये हजारोंपेक्षा जास्त अब्जाधीश आहेत जे स्वतःचा देश सोडून परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत. यात पहिलं दुबई, दुसरं लॉस एन्जेलिस, तिसरं मेलबर्न, चौथं मियामी आणि पाचवं न्यूयॉर्क ही शहरं येतात. या शहरांमध्ये जाऊन अब्जाधीश सर्वाधिक प्रमाणात स्थायिक झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Nov 2, 2019 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...