... तर बाळाच्या Diaper rash कडे दुर्लक्ष नको; तात्काळ डॉक्टरांना दाखवा

... तर बाळाच्या Diaper rash कडे दुर्लक्ष नको; तात्काळ डॉक्टरांना दाखवा

बाळाचे Diaper rash दूर करण्याचे घरगुती उपाय आहेत, मात्र त्यासह इतर लक्षणं दिसत असतील तर मात्र डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे.

  • Last Updated: Dec 4, 2020 05:17 PM IST
  • Share this:

बाळांची त्वचा अतिशय संवेदनशील आणि नाजूक असते. जेव्हा बाळाला डायपर घातलं जातं तेव्हा यामुळे खाज सुटणे आणि डायपर रॅश म्हणून ओळखल्या जाणार्‍या लाल पुरळ उद्भवू शकतात. ज्या ठिकाणी डायपर वापरतात त्या ठिकाणी लाल रंगाच्या चट्टट्यांमुळे त्यांना खूप त्रास होतो. यामुळे बळ नेहमीच अस्वस्थ राहते.  बाळाचं नितंब, मांडी आणि गुप्तांगांची त्वचा लाल आणि सुजलेली दिसते. त्वचेची जळजळ आणि वेदना जर मुलास अस्वस्थ करत असतील तर डायपर बदलताना त्याला अधिक त्रास होतो आणि बाळ खूप रडते. त्वचेवर थोडासा केलेला स्पर्श देखील बाळासाठी वेदनादायी असतो.

myupchar.comचे डॉ. गगन अग्रवाल यांनी सांगितलं की, डायपर रॅश होण्याची समस्या जास्त काळ ओलसरपणा राहणं, डायपर वारंवार बदलणं, अतिसार, डायपर झाकण्यासाठी प्लॅस्टिकच्या पँटचा वापर केल्यामुळे होतो. घट्ट फिटिंग असलेले डायपर आणि कपड्यांना घासण्यामुळे देखील त्वचेवर पुरळ उठू शकतात. एवढंच नव्हे तर मुलांमध्ये घन आहार घेतल्यानं त्यांचं स्टूल बदलतं. ज्यामुळे लाल पुरळ होण्याची शक्यता वाढते. स्तनपान देणाऱ्या आईच्या खाण्याच्या सवयीमुळेदेखील बाळाला लाल पुरळ होऊ शकतात. डायपर, डिस्पोजेबल वाइप्स, मुलांचे कपडे धुण्याचा साबण आणि डिटर्जंट्सच्या ब्रँडमधील बदलांमुळे देखील या समस्येची शक्यता वाढते. बाळाची पावडर, तेल किंवा लोशनमध्ये बदल देखील या स्थितीस कारणीभूत ठरू शकते.

घरगुती उपचार आहेत प्रभावी

myupchar.comचे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की घरगुती उपचारांनी डायपर मुळे झालेली पुरळ सहज बरी करता येते.

बाळाच्या त्वचेवर नारळ तेलानं मालिश करा. बाळाच्या पृष्ठभागावर मालिश करण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईल वापरू शकता.

डायपर पुरळ रोखण्यासाठी दुधाचा चांगला उपयोग होऊ शकतो. दुधामध्ये स्वच्छ कपडा बुडवा आणि बाळाच्या पुरळ आलेल्या भागावर लावा. यामुळे सूज दूर होईल.

दही देखील एक क्रीम म्हणून वापरलं जाऊ शकतं.

पुरळांवर व्हॅसलिन जेलही हळूहळू लावलं जाऊ शकते, यामुळे पुरळ नष्ट होऊन वेदना कमी होईल.

कोरफड देखील एक अतिशय प्रभावी घरगुती उपचार आहे जो त्वचेवर जलद उपचार करेल. कोरफडची पानं चाकूच्या सहाय्याने दोन भागामध्ये कापून जेल काढून घ्या. डायपर लावलेले क्षेत्र स्वच्छ आणि कोरडे करून, नंतर यावर कोरफड लावा.

येथे बेकिंग सोडादेखील वापरला जाऊ शकतो. कोमट पाण्यामध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घाला आणि हे पाणी मुलाच्या वेदनादायक डायपर पुरळ शांत करण्यासाठी वापरा.

डॉक्टरांना कधी दाखवावे

वास्तविक घरगुती उपचारांमुळे काही दिवसांत मुलांना आराम मिळतो, परंतु तसे न झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. बर्‍याच प्रकरणांमध्ये डायपर रॅशच्या वाढीमुळे संसर्ग होतो ज्यास बरे होण्यासाठी औषधांची आवश्यकता असते. या व्यतिरिक्त जर ताप, फोड किंवा मुरुमासह त्यातून पू निघत असेल तर डायपर पुरळ शरीराच्या त्वचेच्या इतर भागामध्ये पसरू शकते, असे आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर मुलास फंगल इन्फेक्शन असेल तर डॉक्टर अँटीफंगल क्रीम लावण्याचा सल्ला देतात. जिवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविक औषध दिली जाऊ शकतात.

या गोष्टी लक्षात ठेवा

मुलांना जास्त टाईट डायपर घालू नका आणि एक माप अधिक मोठाच डायपर घ्या. ठराविक वेळेत डायपर बदला आणि डायपर बदलल्यानंतर कूल्हे व गुद्द्वार क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ करा. बाळाची त्वचा सुकवण्यासाठी स्वच्छ टॉवेल वापरा. नेहमी डायपर घालणं टाळा. कपड्याने बनविलेले डायपर गरम पाण्याने धुवा. वापरलेले अस्वच्छ डायपर बदलल्यानंतर हात धुवा.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख – डायपररॅश: लक्षणे, कारणे, उपचार ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीयमाहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेतस्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठीआरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 4, 2020, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading