मुंबई, 21 फेब्रुवारी: माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र म्हणून साजरा केला जाते. या दिवशी अनेक जण व्रत किंवा उपवास करतात. यासोबतच भगवान शंकराची आराधना केली जाते. बेलाची पान आणि जलाभिषेक केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात सूर्य उत्तरायण प्रवासाचा प्रारंभ करतो. त्यामुळे या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानलं जातं. पुराणांमध्ये महाशिवारत्रीला अधिक महत्त्व आहे. 12 शिवरात्रींपैकी येणाऱ्या या महाशिवरात्रीचं महत्त्व विशेष आहे. शुक्रवारी 21 फेब्रुवारीला महशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त
तिथी- 21 फेब्रुवारी, वार- शुक्रवार
चतुर्थी तिथी प्रारंभ- संध्याकाळी 5.20 मिनिटं ते 22 फेब्रुवारी संध्याकाळी 7.02 मिनिटं
रात्र प्रहरातील पूजेचा मुहूर्त- संध्याकाळी 6.41 मिनिटं रात्री 12 वा. 52 मिनिटं.
महाशिवरात्र हा उत्सव साजरा करण्यामागंचं काय आहे कारण?
महाशिवरात्र साजरी का केली जाते असा अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला जातो. यामागे अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी सर्वात प्रचलित असणाऱ्या तीन अख्यायिका आज आम्ही सांगणार आहोत.
पहिली अख्यायिका आहे की महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता.
दुसरी अख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी 64 जागांवर शिवलिंग उत्पन्न झालं. त्यापैकी 12 ठिकाणं ही भारतात आहेत. ज्याला आपण 12 ज्योतिर्लिंग असं म्हणतो.
पुराणानुसार या दिवशी भगवान शंकर पहिल्यांदा प्रकट झाले होते. ज्योतिर्लिंगाच्या रुपात त्यांनी भगवान शंकर सृष्टीवर प्रकट झाले असंही मानलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.