Breast मध्ये गाठ जाणवतेय का? कॅन्सरसारख्या गंभीर आजारांसह 5 समस्येची लक्षणं

Breast मध्ये गाठ जाणवतेय का? कॅन्सरसारख्या गंभीर आजारांसह 5 समस्येची लक्षणं

ब्रेस्टमधील (breast) बहुतेक गाठी कॅन्सरच्या नसतात मात्र त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्बवू शकतो.

  • Last Updated: Oct 19, 2020 02:12 PM IST
  • Share this:

सध्या कॅन्सरसारख्या आजारांचं प्रमाण वाढत आहे. महिलांचं म्हणाल तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. स्तनांमध्ये गाठ हे ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांपैकी एक आहे. त्यामुळे स्तनांमध्ये गाठ जाणवली की अनेक महिलांना चिंता सतावते. आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर तर नाही ना, असा प्रश्न मनात येतो. ब्रेस्टमध्ये असणारी गाठ ही कॅन्सरची असू शकते. मात्र त्याची इतरही कारण असू शकतात.

myupchar.com शी संबंधित डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, जेव्हा असामान्य मार्गांनी स्तनांचे ऊतक निर्माण होऊ लागतात तेव्हा स्तनांमध्ये गाठी तयार होण्यास सुरुवात होते. महिलांना या गाठींमध्ये वेदना जाणवतात. या प्रकारच्या गाठी कर्करोगाच्या गाठी असू शकतात. त्याच वेळी काही गाठी दुखत नाहीत पण स्तनांमध्ये राहतात, ते कमी घातक असतात. बहुतेक स्तनांच्या गाठी कर्करोगाच्या नसतात मात्र त्यामुळे कर्करोगाचा धोका उद्बवू शकतो.

स्तनात फोड

स्तनामध्ये फोड निर्माण होण्याचं कारण जीवाणू आहेत. यामध्ये स्तनांच्या सभोवतालची त्वचा लालसर होते. स्तनपान करणार्‍या महिलांमध्ये स्तनात फोड निर्मितीची शक्यता जास्त असते.

अल्सर

अल्सर आकारात अगदी लहान असतं. जे अल्ट्रासाऊंड केल्यावर दिसतं. मोठ्या आकाराचे अल्सर इतर ऊतींवर दबाव आणू शकतात, ज्यामुळे अडचण वाढू शकते.

इन्ट्राडक्टल पेपिलोमा

इन्ट्राएक्टल पेपिलोमा चामखीळसारखं वाढतं. हे स्तन नलिकांमध्ये, स्तनाग्राखाली विकसित होतात. कधीकधी यामधून रक्त देखील येतं. तरुण स्त्रियांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.

लिपोमा आणि चरबी नेक्रोसिस

जेव्हा स्तनातील चरबीच्या ऊती खराब होण्यास सुरुवात होते आणि ते तुटतात त्याला चरबी नेक्रोसिस नावाचा गाठी म्हणतात. लिपोमा ही एक प्रकारची मऊ, कर्करोगमुक्त गाठ आहे जी जळजळत नाही.

ग्रंथी-अर्बुद

ग्रंथी अर्बुद हीदेखील एक प्रकारची गाठ आहे. स्तनाच्या बाह्य त्वचेच्या ऊतींमध्ये हा हळुवार वाढणारा ट्युमर आहे. यात महिलांना सौम्य वेदना होऊ शकतात. म्हणून याकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यावर लगेच उपचार केले पाहिजे. अन्यथा नंतर अधिक समस्या उद्भवू शकतात.

स्तनाचा कर्करोगाची गाठ

स्तनाच्या कर्करोगाची गाठ निर्माण झाल्यास स्त्रिया खूप अस्वस्थ होतात. या प्रकारच्या गाठींचा निश्चित आकार नसतो. सुरुवातीच्या काळात स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगात सहसा वेदना होत नाहीत. हे स्तनाच्या कोणत्याही भागात उद्भवू शकतात.

संप्रेरक बदल हे एक मोठे कारण असू शकते

myupchar.com शी संबंधित डॉ. विशाल मकवाना यांच्या म्हणण्यानुसार, महिलांमध्ये संप्रेरक बदल कायमच होत असतात. स्त्रियांमध्ये मासिक पाळीत होणार्‍या संप्रेरक बदलांमुळे स्तनातील बदल होतात. ज्या प्रकारे शरीरात संप्रेरक कमी जास्त होत राहतात त्याच कारणास्तव स्तनांच्या आकारात बदल होतात आणि या बदलांमुळे गाठी तयार होतात. काही गाठी आपोआपच बऱ्या होतात. पण तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. जर काळजी घेतली नाही तर या गाठी गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकतात.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग)

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 19, 2020, 2:12 PM IST

ताज्या बातम्या