मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अरे बापरे! 7 कारणांमुळे रात्री वाढते ब्लड शुगर; तुम्ही करत नाहीत ना ‘या’ चुका

अरे बापरे! 7 कारणांमुळे रात्री वाढते ब्लड शुगर; तुम्ही करत नाहीत ना ‘या’ चुका

महिन्यातले 15 दिवस मायग्रेन होत असेल तर, डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रॉनिक मायग्रेन प्रिवेन्शन मेडिकेशन घ्यावं. बोटुलिनम टॉक्सिन इंजेक्शननेही फरक पडतो.

महिन्यातले 15 दिवस मायग्रेन होत असेल तर, डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रॉनिक मायग्रेन प्रिवेन्शन मेडिकेशन घ्यावं. बोटुलिनम टॉक्सिन इंजेक्शननेही फरक पडतो.

डायबेटिज (Diabetes)हा असा आजार आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम (Body Effect) होतो. मुख्य म्हणजे या एका आजाराने अवयावांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

नवी दिल्ली,03 ऑगस्ट : आजच्या काळात मधुमेह एक गंभीर समस्या (Problem) बनली आहे. मधुमेह कधीच पूर्णपणे बरा करणं शक्य नाही पण, नियंत्रणात (Control) ठेवला जाऊ शकतो. आपल्याच देशात नाही तर, जगभरात डायबेटीज (Diabetes) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. डायबेटिज (Diabetes)हा असा आजार आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम (Body Effect) होतं. या एका आजाराने अवयावांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. डायबेटीजच्या रुग्णांना औषधांबरोबर (Medicine) बरीच पथ्यही पाळावी लागतात. या रूग्णांना त्यांच्या आहाराची (Diet) खुप काळजी घ्यावी लागते.

या आजारात शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागेल. नॉर्मल ब्लड शुगरचं प्रमाणच माहिती नसल्यामुळे आपण खुपदा दुर्लक्ष करतो मात्र, एका ठराविक वयानंतर ब्लड शुगर चेक करत राहण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात.

आरोग्य तज्ज्ञांच्यामते डायबिटीसच्या रुग्णांमध्ये रात्रीच्यावेळी ब्लड शुगर वाढत (Blood Sugar level Increase at Night ) असते. शरीरात जास्त प्रमाणामध्ये शुगर वाढली तर हायडायबिटीस होतो. अशा वेळेस शुगर लेवल कमी करणं कठीण होऊन बसतं.

(जास्त कॉफी पिऊ नका...अन्यथा होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार)

आरोग्य तज्ज्ञांच्यामते दिवसभरामध्ये ब्लड शुगर लेव्हल बदलत असते. याशिवाय दिवसभरामध्ये कोणता आहार घेतो. त्यावर देखील ब्लड शुगर लेव्हल अवलंबून असते. ब्लड शुगर लेव्हल उपाशीपोटी 130 mg/dL आणि जेवल्यानंतर एक तासानंतर 180 mg/dL आणि रॅन्डम टेस्टिंगमध्ये 200 mg/dL असेल तर, याला हायपरग्लायसेमिया म्हटलं जातं.

(अंड रोज खावं खरं; पण ऑम्लेट नव्हे तर असं खा; या वेळी खाल्लंत तर आहे फायदा)

तज्ज्ञांच्यामते रात्रीच्या वेळी 7 कारणामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत असते.

रात्री कार्बोहायड्रेट्स घेणं

रात्रीच्या जेवणामध्ये स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते.

आजारपण किंवा जखम

कोणत्याही प्रकारचा ट्रॉमा हायपमेटाबोलिक रिस्पॉन्स आणखीन वाढवतो आणि यामुळे ब्लड शुगर लेवल वाढण्याची शक्यता असते.

(पावसाळ्यात खावं की नाही दही; पाहा काय सांगतात डॉक्टर)

व्यायामाचा अभाव

व्यायाम करताना आपलं शरीर इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करतं पण, व्यायाम न करणाऱ्या लोकांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढताना दिसते.

इन्सुलिनची कमतरता

शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये इन्सुलिनची निर्मिती न झाल्यास आणि डायबेटिसच्या रुग्णाने इन्सुलिनचं इंजेक्शन न घेतल्यास रात्री ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.

(घराजवळछी घाण उद्याच करा साफ; कोरोनापाठोपाठ हे आजार पसरण्याचा आहे धोका)

मासिक पाळीच्या काळात

मासिक पाळीच्या काळामध्ये शरीरामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन पाझरत असतात. यामुळे हार्मोन इन्सुलिनचे प्रॉडक्शन कमी करतात. त्यामुळे मेटाबोलिजम आणि ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो.

गर्भधारणा

प्रेग्नेंसीच्या काळामध्ये महिलांमध्ये हार्मोनल लेव्हल बदलत असते. अशा वेळेस ब्लड शुगर लेव्हल देखील कमी जास्त होत राहते.

(वाढत्या वयात उत्साह टिकून राहण्यासाठी रोज खा ही Enery booster)

स्ट्रेस

आता तणाव ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र, वाढत्या तणावाचा परिणाम शरीरावर होत असतो. यामुळे कार्टिसोल हार्मोन्स शरीरात वाढतो. ज्यामुळे इन्सुलीन कमी होतं. परिणामी ब्लड शुगर लेव्हल वाढते.

First published:

Tags: Diabetes, Health Tips, Lifestyle