कोरोनाग्रस्त पेशंटला हाय फ्लो ऑक्सिजनची गरज का आणि केव्हा भासते? जाणून घ्या

कोरोनाग्रस्त पेशंटला हाय फ्लो ऑक्सिजनची गरज का आणि केव्हा भासते? जाणून घ्या

सध्या बहुतांश रुग्णांना हायफ्लो ऑक्सिजनची (High Flow Oxygen) गरज भासत असल्याचे दिसून आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 एप्रिल : कोरोनाने (Corona) संपूर्ण देशात कहर केला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तसेच मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील चिंता वाढवणारा आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आल्याचे दिसते. परिणामी ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर बेड आदींचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची फरपट होत आहे.

सरकार आणि प्रशासन त्यांच्यापरीने प्रयत्न करीत असून बेडसची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. दिल्लीतही (Delhi)कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने रुग्णालयांची स्थिती देखील वाईट झाली आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये आता कसेतरी 100 पेक्षा कमी आयसीयू बेड शिल्लक असून ऑक्सिजनचा (Oxygen) मोठा तुटवडा भासत आहे, त्यामुळे आम्ही तातडीने केंद्र सरकारकडे मदत मागितल्याचे दिल्ली सरकारने सांगितले आहे. बहुतांश रुग्णांना हायफ्लो ऑक्सिजनची (High Flow Oxygen) गरज भासत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये हायफ्लो ऑक्सिजनची सोय करण्याची तसेच हायफ्लो ऑक्सिजन बेडस उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या सर्व स्थितीच्या पार्श्वभूमीवर हायफ्लो ऑक्सिजन म्हणजे काय,रुग्णांना त्याची गरज का भासत आहे,हे जाणून घेणं गरजेचं आहे.

हे ही वाचा-कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय

लेडी हॉर्डींग रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सोप्या शब्दांत सांगायचं तर कोरोनाचा विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे फुफ्फुसांची श्वास घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रुग्ण पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन घेऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णांची प्रकृती अधिक बिघडून गंभीर होऊ शकते. त्यामुळे ही ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी रुग्णाला बाहेरुन ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. यात अतिगंभीर असलेल्या रुग्णाच्या शरीराला आक्सिजन (Oxygen)पुरवठा व्हावा यासाठी हाय फ्लो ऑक्सिजन दिला जातो. रुग्णांमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन 90 ते 95 दरम्यान असणे आवश्यक असते. मात्र यापेक्षा अधिक मात्रा झाल्यास रुग्णाचे महत्वाचे अवयव निकामी होऊ शकतात. हायफ्लो ऑक्सिजनचा वापर हा सामान्य पध्दतीने दिल्या जाणाऱ्या ऑक्सिजन पेक्षा अधिक असतो. हायफ्लो ऑक्सिजन यंत्रणेव्दारे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन रुग्णाच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. मास्कच्या माध्यमातून फुफ्फुसात प्रतिमिनिट 5 ते 6 लिटर आक्सिजन पोहोचतो. मात्र हाय फ्लो ऑक्सिजन यंत्रणेच्या माध्यमातून 20 ते 50 लिटर ऑक्सिजन दर मिनिटाला रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये पोहोचतो. हे काम व्हेंटिलेटर देखील करतो. परंतु हाय फ्लो नोजलच्या (High Flow Nozzle)माध्यमातून हे काम सोप्या पध्दतीने होते. हायफ्लो ऑक्सिजन देणे सुरु असताना रुग्ण अन्नपदार्थांचे सेवन करु शकतो तसेच तो बोलू देखील शकतो.

First published: April 20, 2021, 7:34 AM IST

ताज्या बातम्या