मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्ही दिवसभर बातम्या आणि सोशल मीडियावर व्यस्त आहात का, WHO ने दिला इशारा

तुम्ही दिवसभर बातम्या आणि सोशल मीडियावर व्यस्त आहात का, WHO ने दिला इशारा

जगातील सर्वात मोठ्या आरोग्य (WHO) संस्थेने म्हटले आहे की ज्या लोकांना बातम्यांचे अहवाल आणि सोशल मीडिया (social Media) फीड्स पाहून अस्वस्थ वाटते त्यांनी या गोष्टींचा विचार करण्यासाठी दररोज थोडा वेळ द्यावा.

न्यूयॉर्क, 26 फेब्रुवारी : सध्याच्या काळात तुमच्या आसपास पाहिलं तर लक्षात येईल की प्रत्येकजण मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला आहे. दिवसेंदिवस सोशल मीडियावर (Social Media) जास्त वेळ घालवण्याचा ट्रेंड वाढत आहे. काही लोक तर दिवसभर बातम्या पाहत राहतात. तुम्हीही असे करत असाल तर काळजी घ्या. असे करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लोकांना तसे करण्यापासून सावध केले आहे. WHO काय म्हणाले जाणून घ्या.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, बातम्या आणि सोशल मीडिया फीड जास्त वेळ पाहणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही त्यांचा जास्त वापर करू नये. लोकांनी विश्रांती घेणे (ब्रेक घेणे) आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या गोष्टींमुळे त्यांना आनंद मिळतो त्यात त्यांनी स्वतःला व्यस्त ठेवावे. यामध्ये संगीत ऐकणे, वाचन, चालणे आणि आध्यात्मिक गोष्टींचा समावेश होतो.

जगातील सर्वात मोठ्या आरोग्य एजन्सीने म्हटले आहे की ज्या लोकांना बातम्यांचे अहवाल आणि सोशल मीडिया फीड्स पाहून अस्वस्थ वाटते त्यांनी या गोष्टींवर विचार करण्यासाठी दररोज थोडा वेळ द्यावा. दिवसात कधीतरी तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर त्या वेळी त्या गोष्टीवरून लक्ष हटवून ठरवलेल्या वेळी त्या गोष्टीचा विचार करावा.

तुमचा आवाज तर बदलला नाहीये ना? या लक्षणांकडे चुकुनही करू नका दुर्लक्ष

डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की 'मॅनेजिंग युवर व्हरायटी टेक्निक'चे अनेक फायदे आहेत. असे करण्याचे अनेक फायदे असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे दिवसभरात कमी चिंता जाणवते आणि जेव्हा तुम्ही विशिष्ट वेळी काळजी करायला जाता तेव्हा बरे वाटते.

गेल्या दोन वर्षांपासून अधिक नकारात्मक बातम्या येत आहेत. कोरोना साथीच्या सुरुवातीपासून आपण रोग, उपचार, रुग्णालय, मृत्यू इत्यादींबद्दल ऐकत आहोत. अशा फीड्स सोशल मीडियावरही जास्त येतात. दुसरीकडे रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रात्रंदिवस बातम्यांमध्ये निराशाजनक आणि हताश करणाऱ्या बातम्या येत आहेत. त्याचा आपल्या मनावर वाईट परिणाम होत आहे.

First published:

Tags: Smartphone, Social media