Home /News /lifestyle /

भारत बायोटेकला मोठा झटका! WHO ने लसीचा आंतरराष्ट्रीय पुरवठा थांबवला, काय आहे कारण

भारत बायोटेकला मोठा झटका! WHO ने लसीचा आंतरराष्ट्रीय पुरवठा थांबवला, काय आहे कारण

Covaxin: कोवॅक्सीन निलंबित करण्याची घोषणा EUL तपासणीनंतर करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओच्या टीमने 14 मार्च ते 22 मार्च 2022 पर्यंत भारत बायोटेकच्या प्लांटची तपासणी केली होती.

    नवी दिल्ली, 03 एप्रिल : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोवॅक्सिनच्या आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर बंदी घातली आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (जीएमपी) म्हणजेच चांगल्या उत्पादन पद्धतीच्या अभावामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. कोवॅक्सीन ही भारतातील पहिली स्वदेशी कोरोना लस आहे. ही लस बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने एक दिवस आधी घोषणा केली होती की, ते लसीचे उत्पादन कमी करणार आहेत, त्यानंतर WHO चा हा निर्णय आला आहे. WHO ने 2 एप्रिल रोजी या घोषणेबाबत एक निवेदन प्रसारित केलं. त्यानुसार, WHO ने म्हटले आहे की, लस घेणारे देश या लसीविरुद्ध योग्य कारवाई करू शकतात. कोवॅक्सीन निलंबित करण्याची घोषणा EUL तपासणीनंतर करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओच्या टीमने 14 मार्च ते 22 मार्च 2022 पर्यंत भारत बायोटेकच्या प्लांटची तपासणी केली होती. सुधारणा करण्याची सूचना - गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी WHO ने कोवॅक्सीनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. लसीमध्ये जीएमपीची कमतरता काय आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. WHO ने सांगितले की, 'भारत बायोटेक GMP च्या उणिवा दूर करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) आणि WHO यांना सादर करण्यासाठी एक सुधारात्मक आणि प्रतिबंधात्मक कृती योजना तयार करत आहे. अंतरिम आणि सावधगिरीचा उपाय म्हणून, भारताने निर्यातीसाठी कोवॅक्सिनचे उत्पादन स्थगित करण्याची आपली वचनबद्धता दर्शविली आहे. हे वाचा - शुगर कंट्रोलसाठी या पानांचा काढा आहे गुणकारी; अशा पद्धतीनं बनवा घरच्या घरी लस सुरक्षिततेबाबत WHO ने लसीच्या सुरक्षिततेवर आणि FKC वर कोणतेही प्रश्न उपस्थित केलेले नाहीत ही दिलासादायक बाब आहे. भारत बायोटेकने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, गेल्या एक वर्षात कंपनीने सार्वजनिक आरोग्याचा विचार करून सातत्याने काम केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत आता अपग्रेड होण्याची गरज आहे. कंपनी आता प्रलंबित सुविधा देखभाल, प्रक्रिया आणि सुविधा ऑप्टिमायझेशन गोष्टींवर लक्ष केंद्रित करेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine

    पुढील बातम्या