"WHO नं सांगितलं कोरोना लशीत विष मिसळा", राष्ट्राध्यक्षांचा खळबळजनक दावा

कोरोना लशीत (CORONA VACCINE) विष मिसळण्यासाठी WHO नं पैसेही ऑफर केल्याचा दावा राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.

  • Share this:

अँटानानॅरिवो, 07 डिसेंबर :  एकिकडे कोरोना लस (corona vaccine) लवकरच उपलब्ध होण्याची आशा आहे तर दुसरीकडे कोरोना लशीत (covid 19 vaccine) विष मिसळण्यासाठी प्रयत्न होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनंच कोरोना लशीत विष (toxin in corona vaccine) मिसळायला सांगितलं आहे, असा मोठा दावा मादागास्करच्या  (Madagascar) राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.

मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोइलिना यांनी सांगितलं, जागतिक आरोग्य संघटनेनं त्यांच्या कोरोना लशीत विषारी घटक मिसळण्यासाठी 20,000,000 डॉलर्स ऑफर केले आहेत. युरोपियन लोकांनी त्यांची रेमेडी हॅक केल्याचंही डब्ल्यूएचओनं सांगितल्याचं ते म्हणाले.

obrempongnana.wordpress.com च्या वृत्तानुसार  राष्ट्राध्यक्ष एंड्री राजोइलिना म्हणाले, "आमचा देश मेडागास्करनं कोरोनाव्हायरस विरोधातील उपचार शोधले आहेत. मात्र युरोपियन लोकांनी माझ्या आफ्रिका देशातील मित्रांना मारण्यासाठी यामध्ये विषारी घटक मिसळण्यास सांगितलं. यासाठी लाचही देण्याचा प्रयत्न केला. 20,000,000 डॉलर्सचा प्रस्ताव ठेवला आहे. लोकांनी सावध राहायला हवं. जागतिक आरोग्य संघटना आमची मदत करेल म्हणून आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो, मात्र ते आमची मदत करत नाही आहेत"

हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर आता अज्ञात आजाराचं संकट; झपाट्यानं वाढत आहेत रुग्ण

"युरोपियन लोकांनी आमची रेमेडी हॅक केली आहे आणि त्यामध्ये ते विषारी पदार्थ मिसळत आहेत. मी सर्व आफ्रिकन नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी त्यांच्या कोरोना लशीचा वापर करू नये, कारण ही लस कोरोनावर उपचार करत नाही तर जीव घेते आहे.  आमच्या लशीचा रंग पिवळा आहे. त्यामुळे हिरव्या रंगाची लस असल्यास त्याचा वापर करू नका", असं आवाहन राजोइलिना यांनी केलं आहे.

Published by: Priya Lad
First published: December 7, 2020, 5:50 PM IST

ताज्या बातम्या