मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सुशांतच्या आत्महत्येला कोण जबाबदार? मानसोपचार तज्ज्ञांचं काय आहे मत

सुशांतच्या आत्महत्येला कोण जबाबदार? मानसोपचार तज्ज्ञांचं काय आहे मत

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) डिप्रेशनमध्ये (depression) होता असं सांगितलं जातं आहे.

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) डिप्रेशनमध्ये (depression) होता असं सांगितलं जातं आहे.

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) डिप्रेशनमध्ये (depression) होता असं सांगितलं जातं आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 16 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गेल्या काही महिन्यांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता, शिवाय त्याने औषधंही घेणं बंद केलं होतं. अशी माहिती समोर आली आहे. मात्र सुशांत डिप्रेशनमध्ये जाऊन त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत होती? याला कोण जबाबदार होतं? याचा तपास आता सुरू झाला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने यासाठी बॉलीवूडकरांना जबाबदार धरलं आहे. कुस्तीपटू बबिता फोगटनेही करण जोहरचं नाव घेत त्याच्यावर आरोप केलेत. तसंच सुशांतच्या आत्महत्येची बातमी समजताच ट्वीटवरदेखील अशाच काहीशा प्रतिक्रिया उमटू लागल्यात. मात्र यामागे नेमकी काय कारणं असू शकतात, याबाबत मानसोपचार तज्ज्ञांचं मत काय आहे ते हिंदी न्यूज 18 ने जाणून घेतलं. दिल्ली युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्रज्ञ डॉ. नवीन कुमार सांगतात, "सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रील लाइफ आणि रिअल लाइफ यांच्यातील विरोधाभासाचा चेहरा समोर आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लोकांमध्ये सकारात्मक विचार कमी येऊ लागलेत.महत्त्वाकांक्षा आणि दिखावा खूप वाढला आहे. लोकं एका मर्यादित क्षेत्रात राहू लागले. नवीन मित्र बनत नाहीत आणि जुने मित्र काही कारणांमुळे दूर होऊ लागलेत. लोकं टेक्नॉलॉजीला चिकटून राहू लागलेत. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकने लोकांना अंतर्मुखी बनवलं आहे. लोकं गाव, समाज, कुटुंबापासून दूर राहू लागलेत" हे वाचा - 'सुशांतची आत्महत्या नव्हे मर्डर', करण जोहरचं नाव घेत कंगनानंतर बबिताचाही आरोप सुशांत काही दिवसांपूर्वी आपल्या बहिणीसह बोलला होता. आपली तब्येत ठिक नसल्याचं त्याने तिला सांगितलं होतं. सुशांतचे मित्र आणि त्याच्या घरातील नोकरांनीही त्याचा व्यवहार काही दिवसांपासून बदलला होता, अशी माहिती दिली. मात्र कुणी त्यांच्या समस्या समजून घेतल्या नाही. "जर कुणाला डिप्रेशन असेल आणि त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्या व्यक्तीला काही समस्या असतील तर तिला एकटं सोडू नये. नवनव्या गोष्टी त्याच्यासमोर ठेवा, जुन्या गोष्टी विसरण्यास भाग पाडा. डिप्रेशनने ग्रस्त असल्यास आपल्या समस्या जवळच्या मित्रांना सांगा. आपल्या बालपणाच्या मित्रांसह, कुटुंबातील सदस्यांसह बोलणं सध्या खूप गरजेचं आहे", असा सल्ला डॉ. नवीन कुमार यांनी दिला. हे वाचा - सुशांतच्या मदतनीसाच्या जबाबातून झाला मोठा उलगडा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भाष्कर मुखर्जी न्यूज 18 हिंदीशी बोलताना म्हणाले, "डिप्रेशन आपल्या समजात अंडर रिपोर्टेड आहे. कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊननंतर तो आणखी वाढला आहे. कुटुंबांमध्ये भांडणं वाढली आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून डिप्रेशनचे रुग्ण पहिल्यापेक्षा जास्त येत आहे. चार महिन्यात भारतात कोरोनाव्हायरसमुळे होणारे मृत्यू वगळता जे मृत्यू झालेत त्यामध्ये आत्महत्येची प्रकरणं 30 टक्के वाढलीत. महिनाभरत कित्येक रुग्ण बरे झालेत मात्र त्यांना पुन्हा गंभीर समस्या उद्भवू लागल्यात. 50 टक्के प्रकरणं तर आमच्याकडे येत आहेत. माझ्या चार रुग्णांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे" हे वाचा - सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, बॉलिवूडवरील आरोपाचीही होणार चौकशी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टर्स लॉकडाऊन आणि त्यादरम्यान होणाऱ्या आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न याबाबत रिसर्च करत आहेत. देशातील काही मानसोपचार तज्ज्ञांची टीमदेखील कोविड-19 च्या परिणामांचा अभ्यास करत आहेत. एम्सच्या एका डॉक्टरने सांगितलं, 'प्राथमिक रिपोर्टनुसार लॉकडाऊनमध्ये भारतातील नागरिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे, डिप्रेशनची प्रकरणं वाढली आहेत. एका अभ्यासानुसार प्रत्येकी सहापैकी एक भारतीय डिप्रेशनमध्ये आहे. फिल्ममध्ये काम करणारी लोकं जास्त एक्सप्रेसिव्ह, क्रिएटिव्ह असतात. त्यांना जास्त विचार करावा लागतो, त्यामुळे ही लोकं डिप्रेशनच्या विळख्यात जास्त आहेत. जीवनशैली आणि कामाचे तास यामुळेदेखील असं होतं' संकलन, संपादन - प्रिया लाड
First published:

Tags: Sushant sing rajput

पुढील बातम्या