मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुम्ही कधी पहिल्याच नजरेत कुणाच्या प्रेमात पडला? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

तुम्ही कधी पहिल्याच नजरेत कुणाच्या प्रेमात पडला? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

पहिल्या प्रेमामागे जसं भावनिक कारण असतं, तसंच शास्त्रीय कारण देखील असतं.

पहिल्या प्रेमामागे जसं भावनिक कारण असतं, तसंच शास्त्रीय कारण देखील असतं.

पहिल्या प्रेमामागे जसं भावनिक कारण असतं, तसंच शास्त्रीय कारण देखील असतं.

  मुंबई, 06 डिसेंबर : खरंतर प्रेम (Love) ही अतिशय सहजसुलभ भावना असते. जीवनात प्रत्येक जण कधी ना कधी प्रेमात पडतो. परंतु, तारुण्याच्या उंबरठ्यावरचं किंवा तारुण्यातलं प्रेम कधीच विसरता येत नाही. तुम्हीही पहिल्या नजरेत कोणच्या तरी प्रेमात पडला असाल. तुमच्या जीवनात एखादी व्यक्ती नक्कीच आली असेल, की तिला प्रथमदर्शनी पाहताच, तिचं बोलणं ऐकून किंवा तिच्या अदांकडे आकर्षित होऊन तुम्ही तिच्या प्रेमात पडले असणार आहे, अशा व्यक्तीला पाहून तुम्हाला कदाचित असंही वाटलं असेल, की जणू तुम्ही एकमेकांना वर्षानुवर्ष ओळखता. यालाच पहिलं प्रेम (First Love) म्हणतात. माणसाला असं प्रेम कधी, कसं आणि केव्हा होतं यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. संशोधकांनी या भावनेबाबत सखोल संशोधन (Research) केलं असून, त्यातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत.

  पहिल्या प्रेमामागे जसं भावनिक कारण असतं, तसंच शास्त्रीय कारण देखील असतं. यामुळे तुम्ही अनोळखी व्यक्तीकडे नकळत आकर्षित होता. याबाबत शास्त्रज्ञांनी एक संशोधन केलं. हे संशोधन नेचर ह्युमन बिहेवियर (Nature Human Behavior) या नियतकालिकात प्रसिद्ध झालं आहे. या संशोधनात 18 ते 38 वयोगटातल्या 142 व्यक्तींना समाविष्ट करण्यात आलं होतं.

  10 हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या `या` स्मार्टफोन्समध्ये आहेत आकर्षक फीचर्स

  या सर्वांना एकमेकांसोबत ब्लाइंड डेटवर (Blind Date) पाठवण्यात आलं. डेटिंग केबिनमध्ये आय ट्रॅकिंग ग्लास, हार्ट रेट मॉनिटर्स, तसंच घाम मोजण्याचं यंत्र बसवण्यात आलं होतं. या माध्यमातून पहिल्या भेटीत काहींमध्ये केमिस्ट्री (Chemistry) कशी डेव्हलप होत जाते, हे जाणून घेण्याचा संशोधकांचा उद्देश होता. यानुसार अनेक व्यक्तींमध्ये पहिल्या भेटीत तयार झालेल्या केमिस्ट्रीमधून काही आश्चर्यकारक बाबी समोर आल्या, या संशोधनाबाबतचं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.

  भन्नाट! गुजरातमधील फायर पाणीपुरी ट्राय केली का? पाणीपुरीने खवय्यांना लावलं वेड

  ही एक मानसिक प्रक्रिया (Psychological Process) असल्याचं या संशोधनातून समोर आलं. ही प्रक्रिया शारीरिक लक्षणांपासून सुरू होते. यातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन व्यक्तींचे ठोके एकाच सुरात वाजू लागतात. संशोधनात सहभागी व्यक्तींपैकी 17 जोड्या अशा होत्या, की ज्यांना पहिल्या नजरेतच प्रेमाची जाणीव झाली. या जोड्यांच्या हृदयाचे ठोके एका सुरात वाजत होते. संशोधकांनी याला 'फिजिओलॉजिकल सिंक्रोनी' (Physiological Synchrony) असं नाव दिलं. अशा वेळी तुम्ही एक प्रकारच्या बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखं वागता. आपण काय करतोय याचं भान अशा वेळी राहत नाही. जेव्हा पहिल्या नजरेत प्रेम होतं, तेव्हा हाताच्या तळव्यांना काहीसा घाम येतो, असं संशोधकांना दिसून आलं. त्यामुळे पहिलं प्रेम किंवा पहिल्या नजरेत प्रेमात पडण्यामागे शास्त्रीय कारण असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं.

  First published:
  top videos

   Tags: Love