Home /News /lifestyle /

CORONA महासाथीचा अंत जवळ, WHO लवकरच देणार गूड न्यूज; भारतीय तज्ज्ञांचा दावा

CORONA महासाथीचा अंत जवळ, WHO लवकरच देणार गूड न्यूज; भारतीय तज्ज्ञांचा दावा

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 17372 एवढी झालीय.

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 17372 एवढी झालीय.

2020 मध्ये थैमान घालणारी कोरोनाव्हायरसची (coronavirus) महासाथ आता फार काळ टिकणार नाही.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : कोरोना लशीचे (corona vaccine) ट्रायलमधून सकारात्मक परिणाम समोर येत असल्यानं आता आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत. कोरोना लशीची प्रतीक्षा संपेल मात्र यानंतर कोरोनाची महासाथ (corona pandemic) कधी जाणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. 2021 सालापर्यंत कोरोना लस उपलब्ध होईल. यानंतर 2023 च्या आधीच जागतिक आरोग्य संघटना कोरोनाव्हायरसबाबत गूड न्यूजही देईल असा विश्वास भारतीय तज्ज्ञानं व्यक्त केला आहे. कोरोना लशीचं काम आता वेगानं सुरू झालं आहे. कोरोना लशीच्या ट्रायलचे चांगले परिणाम समोर आल्यानंतर ही लस बाजारात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. लस उत्पादक कंपनी आणि सरकारनंही त्या दिशेनं पावलं उचलली आहे. या लशीबाबत आणि कोरोना महासाथीबाबत दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria) यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे. न्यूज 18 शी बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, "कोरोना लशीमुळे कमीत कमी 9 महिने ते एक वर्ष सुरक्षा मिळेल. ही लस जास्तीत जास्त लोकांना सुरक्षा प्रदान करेल आणि त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यास मदत होईल. कोव्हिड-19 पूर्णपणे जाणार नाही, तो कायम राहणार. पण तो एक सौम्य आजार होईल. 2023 पर्यंत कोरोनाचं प्रमाण कमी होईल आणि जागतिक आरोग्य संघटनाही त्याआधीच महासाथ संपल्याचं जाहीर करेल" हे वाचा - पहिल्यांदा कोणाला मिळणार लस? मोदींनी केलं स्पष्ट; उद्धव काय म्हणाले? भारतात कमीत कमी पाच लशींकडे लक्ष आहे. यामध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसह सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं तयार केलेली कोव्हिशिल्ड (COVIDSHEILD) ही कोरोना लस सर्वात पुढे आहे. भारतात या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सीरम इन्स्टिट्युटनं या लशीचा आपात्कालीन वापर केला जाऊ शकतो, असं संकेत याआधीच दिले आहेत. भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची कोव्हॅक्सिन COVAXIN लस पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये 60  टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. हे वाचा - जानेवारीपर्यंत भारतात उपलब्ध होणार 'ही' लस, 250 रुपये असणार किंमतझायडूस कॅडिलाची (Zydus Cadila) ZYCOV D  रशियाच्या Sputnik V लशीचं डॉ. रेड्डीज कंपनीमार्फत भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. हैदराबादमधील बायोलॉजिकल ई कंपनीच्या लशीचं पहिल्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Corona virus in india

    पुढील बातम्या