Summer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Summer Super Food: वाचा उन्हाळ्यात पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

न्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने हे कांदे आपल्याला अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी उपयुक्त ठरतात. सॅलेड स्वरुपात या कांद्याचा वापर केला तर तो अधिक गुणकारी ठरतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : दैनंदिन आहारात कांद्याचा समावेश केला जातो. भारतीय स्वयंपाक घरांमध्ये कांदा हे प्रमुख अन्न आहे. देशातील अनेक भागांमध्ये गुलाबी रंगाचे कांदे मिळतात. पांढऱ्या कांद्याचा (White Onion) विचार करायचा झाला तर उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने हे कांदे आपल्याला अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी उपयुक्त ठरतात. सॅलेड स्वरुपात या कांद्याचा वापर केला तर तो अधिक गुणकारी ठरतो. या व्यक्तरिक्त उकडलेल्या भाज्यांमध्ये हा कांदा घालून देखील खाऊ शकतो. या कांद्याचा वापर जगभरात सुमारे इ.स.पूर्व 5000 वर्षांपासून केला जातो. 16 व्या शतकात फर्टीलिटी वाढवण्यासाठी महिलांना हा कांदा खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असत. पल्सच्या माहितीनुसार, अन्य उपायांच्या तुलनेत ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) चांगल्या तऱ्हेनं बॅलन्स ठेवण्यासाठी पांढरा कांदा उपयुक्त ठरतो.

पचनासाठी उत्तम -

पांढऱ्या कांद्यात प्रीबायोटिक आणि भरपूर प्रमाणात तंतुमय घटकांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. यातील प्रीबायोटिकमध्ये इन्सुलीन आणि फ्रॅक्टोलिगोसाकॅरिडसचे प्रमाण मुबलक असतं. यामुळे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाचे (Bacteria) प्रमाण संतुलित राहतं.

रक्त पातळ करणारे घटक -

पांढऱ्या कांद्यात रक्त पातळ करणारे घटक असतात. यातील सल्फरसारखी तत्व रक्त पातळ राहण्यास मदत करतात. यामुळे रक्त वाहिन्यांमधील रक्त प्रवाह चांगला राहतो. पांढरा कांदा रोज सेवन केल्यानं ब्लड क्लॉटिंग (Blood Clotting) म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा त्रास उद्भवत नाही.

हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं -

पांढऱ्या कांद्यात मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात. तसंच यात जळजळ कमी करणारे घटकह देखील असतात. यामुळे कॉलेस्ट्रॉल लेव्हल कमी होऊन हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. ज्या लोकांना उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लडप्रेशरचा (Blood Pressure) त्रास आहे, त्यांच्यासाठी पांढरा कांदा अधिक गुणकारी ठरतो. पांढऱ्या कांद्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं आणि ब्लड क्लॉटिंग होत नाही.

(वाचा - Corona काळात गुळण्या करण्याचे फायदे आणि तोटे; ऐका डॉक्टरांचा सल्ला)

झोपेसाठी आहे चांगला -

एका संशोधनानुसार, पांढऱ्या कांद्यात एल ट्राईप्टोफेन हा घटक असतो. हा घटक झोपेच्या समस्येवर गुणकारी असतो. त्यामुळे पांढऱ्या कांद्याच्या सेवनाने झोपेची समस्या सुटू शकते आणि स्ट्रेस कमी होतो. जर तुम्ही दररोज आहारात पांढऱ्या कांद्याचा समावेश केला, तर तुम्हाला स्ट्रेस फ्री होऊन चांगली झोप लागेल आणि यामुळे मेंटल हेल्थ चांगली राहिल.

ब्लोटिंगच्या समस्येपासून होतं संरक्षण -

ज्या लोकांना ब्लोटिंगची (Blotting) म्हणजेच पोटात गॅस साठण्याची समस्या आहे, त्यांनी आपल्या दैनंदिन आहारात पांढऱ्या कांद्याचा समावेश करणं आवश्यक आहे. कच्चा किंवा शिजवून हा कांदा खाऊ शकता.

First published: May 14, 2021, 9:09 AM IST
Tags: onion

ताज्या बातम्या