मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पिकलेल्या केसांमुळे चारचौघांत जायला लाज वाटतेय; मग आजच ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

पिकलेल्या केसांमुळे चारचौघांत जायला लाज वाटतेय; मग आजच ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

पिकलेले केस

पिकलेले केस

शरीरातील मेलॅनिन कमी झाल्यावर केस पांढरे किंवा पिकायला सुरूवात होते. कॅरोटिन हे केसांसाठी उपयुक्त प्रोटिन आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 नोव्हेंबर :    शरीरासाठी हानीकारक ठरणार्‍या सवयींमुळे तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात. अवेळी जेवण, अस्वच्छ ठिकाणी पदार्थांचं सेवन, व्यायामाचा अभाव आदि गोष्टींमुळे लहानवयात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. परिणामी, औषध घेणं अनिवार्य ठरतं. अनेकांना लहानवयातच ब्लडप्रेशर, डायबेटिस, हृदयविकारासारखे आजार होतात. हे झालं गंभीर आजारांविषयी. पण सध्या तरुणवयातच केस पिकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे. वयाच्या पंचविशीतही काहींचे केस पिकतात. केस काळे करण्यासाठी मार्केटमध्ये मिळणारी कॉस्मेटिक्स, हेअर कलर याचा वापर केला जातो. परंतु, या केमिकलयुक्त उत्पादनांचा केसांवर दुष्परिणाम होतो. खरं तर, या गोष्टी टाळणं अगदीच शक्य आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत. हे छोटे-छोटे उपाय नक्कीच गुणकारी आहेत. तसंच या नैसर्गिक उपायांमुळे शरीरावर कुठलेही दुष्परिणाम(साईड इफेक्ट) होत नाहीत. जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती.

शरीरातील मेलॅनिन कमी झाल्यावर केस पांढरे किंवा पिकायला सुरूवात होते. कॅरोटिन हे केसांसाठी उपयुक्त प्रोटिन आहे. या प्रोटिनमधील मेलॅनिनचं प्रमाण ज्यावेळेस घटतं, तेव्हा केस पिकायला लागतात. मेलॅनिन प्रमाण हे काहीवेळा अनुवंशिक, तर काहीवेळा हॉर्मोन्सच्या बदलांमुळेही कमी होतं. तसंच वाढत्या वयोमानानुसार शरीरातील मेलॅनिनचं प्रमाण कमी होतं. जाणून घेऊयात काही नैसर्गिक उपाय ज्यामुळे तुमचे केस नक्कीच काळे राहतील.

नारळाचं तेल आणि लिंबाचा रस

नारळाचं तेल आणि लिंबाचा रस हे दोन्हीही केसांसाठी उपकारकच ठरतात. त्वचेवरील रंध्रांतून अर्थात केसांच्या मुळाशी असलेल्या वर्णपेशींचं संरक्षण करण्यास नारळाचं तेल आणि लिंबाचा रस उपयुक्त ठरतो. यामुळे केस पिकण्याचं प्रमाण कमी होतं. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही नारळाचं तेल आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्यास गुणकारी ठरतो.

हेही वाचा - Winter Tips : केसगळतीची समस्या मुळापासून संपेल; आहारात सामील करा हे पदार्थ

आवळा

आवळा हा खूप गुणकारी आहे. केस पिकण्याच्या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही आवळ्याची पेस्ट हेअर डाय म्हणून वापरल्यास फायदेशीर ठरते. तसंच आवळ्याचा रस काढून त्यात मेंदी मिसळून केसाला लावावी. यामुळे केस मजबूत होतात. तसंच स्कॅल्प अर्थात केसांच्या खालची त्वचा कोरडी होत नाही. आवळ्यामुळे त्वचेचा मऊपणा टिकून राहतो. मेंदीमध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल तत्त्व असल्याने तुमच्या स्कॅल्पच्या पीएच लेव्हलचा स्तर संतुलित राहतो. आवळा आणि मेंदीचं मिश्रण हे महिन्यातून एकदातरी केसांना लावावं. ज्यामुळे केस पिकण्याच्या समस्येला आळा बसेल.

बटाटा

बटाट्याचा वापर हादेखील केस पिकण्यास अटकाव करतो. यासाठी तुम्ही बटाटे इतके उकडवा की त्यातून स्टार्च निघेल. नंतर तो स्टार्च गाळण्याने गाळून घ्या म्हणजे सालं वेगळी होतील. हा स्टार्च केसांना लावा. काहीवेळाने केस धुवा. अशाप्रकारे बटाट्याची पेस्ट केसांसाठी गुणकारी ठरते.

हेही वाचा - कोरड्या डोळ्यांसाठी शिल्पा शेट्टीने सुचवली बेस्ट एक्सरसाइज, 'कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम'पासून होईल बचाव

दोडका

दोडक्याचा रसही केसांसाठी उपयुक्त ठरतो. यामुळे केसांच्या मुळाशी असलेल्या वर्णपेशी किंवा रंगद्रव्याच्या पेशी सक्षम राहतात. यामुळे तुमचे पांढरे केस काळे होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही दोडके शिजवून घ्या. त्याची पेस्ट करा. या पेस्टमध्ये नारळाचं तेल घाला. हे मिश्रण थंड करून केसांवर लावा. यामुळे तुमच्या केसांची मुळं मजबूत होतील. अशाप्रकारे, तुम्ही हे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावावं.

ओट्स

तुमच्या केसांची निगा राखण्यासाठी ओट्स फार उपकारक ठरतात. ओट्सची पेस्ट आणि बदाम तेल असं मिश्रण डोक्याला लावता येतं. ओट्समधील बायोटिनमुळे केसांचं पिकणं थांबत. बायोटिन हे केसांना काळं ठेवण्यात आणि मजबूत होण्यास हितावह ठरतं. ओट्सच्या पेस्टचा वापर नॅचरल कंडिशनर म्हणूनही करता येतो.

कांद्याचा रस

कांद्याच्या रसामध्ये कॅटेलेज असतं, जे केसांसाठी पोषक असतं. कांद्याच्या रसात विविध पोषक घटक असतात. यात मॅग्नेशियम, बायोटिन, तांबं, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, सल्फर, व्हिटॅमिन बी1 आणि बी6 आणि फोलेट यासारखे घटक विपुल प्रमाणात असतात. या घटकांमुळे केसगळती आणि केस पिकणं या दोन्ही समस्यांवर उपकारक ठरतं. कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावा. 40 मिनिटांनी केस धुवा. आठवड्यतून दोनदा तुम्ही कांद्याचा रस केसांची निगा राखण्यासाठी लावू शकता.

हेही वाचा - हिवाळ्यातही हवीये कोरडी, मुलायम त्वचा? तर 'हे' आहेत घरगुती स्वस्तात मस्त उपाय

काळा चहा

तुमचे केस काळे होण्यासाठी काळ्या चहाचा वापर उपयुक्त ठरतो. यामुळे केस वाढण्यास मदत होते. तसंच तुमचे केस हे तजेलदार दिसण्यासही मदत होते. आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु, त्यानंतर केसांना शॅम्पू लावणं टाळा.

आपले केस नेहमी काळेच राहावेत असं अनेकजणांना वाटतं. परंतु, अनेकांना मार्केटमधल्या ब्युटी प्रॉडक्टसबद्दल पुरेशी माहिती नसते. त्यामुळे केसांवर उपचार करताना त्या उत्पादनांचा त्वचेवर तर कधी-कधी तुमच्या दृष्टिवरही परिणाम होतो. यासाठी या घरगुती टिप्स हितावह ठरतील. परंतु, या पूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

First published:

Tags: Home remedies, Lifestyle, Woman hair