Home /News /lifestyle /

व्हाईट ब्रेड खाण्याची सवय आजच सोडा ! या घटकामुळे वाढतो ब्रेन डॅमेजचा धोका

व्हाईट ब्रेड खाण्याची सवय आजच सोडा ! या घटकामुळे वाढतो ब्रेन डॅमेजचा धोका

लाखो ब्रिटिश नागरिक व्हाइट ब्रेड (White Bread) खातात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विचित्र परिणाम होत आहेत. हजारो वर्षांपासून जगभरातील मुख्य अन्न असलेल्या ब्रेडबद्दल कोणीही असा विचार केला नाही.

    मुंबई, 01 डिसेंबर: व्हाईट ब्रेडसारखे जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकतं आणि डायबेटिस, हृदयरोग अशा आजारांचा धोका वाढू शकतो असा सल्ला आपण अनेक अभ्यासात वाचला असेल. परंतु, एका नवीन अभ्यासानुसार, व्हाइट ब्रेड खाल्ल्यामुळे चक्कर येणं, बरळणं, शरीराचं संतुलन ढासळणं आणि  तोल जाऊन पडण हे आजारही होण्याचा धोका असतो. लाखो ब्रिटिश नागरिक व्हाइट ब्रेड खातात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर असे परिणाम होत आहेत. हजारो वर्षांपासून जगभरातील मुख्य अन्न असलेल्या ब्रेडबद्दल कोणीही असा विचार केला नाही.  चवीसह पोषण देणारा, सोयीचा आणि सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणून जगभर ब्रेड खाल्ला जातो. याचे उत्तर आहाराशी संबंधित असू शकतं कारण डॉक्टरांच्या अनेक गटांनी असा निष्कर्ष काढला आहे की अशा अडचणी ग्लूटेनच्या कॉमन रिऍक्शनमुळे निर्माण होऊ शकतात. ग्लुटेन हे प्रोटिन ब्रेड, पास्ता आणि डाळींमध्ये आढळतं. जेव्हा अन्नातील ग्लुटेनच्या रिऍक्शनमुळे इम्युन सिस्टमवर परिणाम होतो तेव्हा पॅनिक अटॅक किंवा मनात भीती निर्माण होते याला ज्याला 'ग्लुटेन ॲटेक्सिया' असं म्हणतात. बहुतेक प्रकरणांमध्ये रूग्णांना स्ट्रोकसारखी लक्षणं दिसू शकतात ज्यामुळे त्यांना बोलणं, चालणं यासारखी दैनंदिन कामं करणं अवघड होतं. काही प्रकरणांमध्ये पॅरेलिसीसदेखील होऊ शकते. इतर परिस्थितींमध्ये चुकीचा विचार केला जाऊ शकतो, परंतु अशा वेळी ग्लूटेन फ्री डाएटचा प्रभावी उपचार बर्‍याचदा कामी येतो, परंतु, उपचार न केल्यास मुलभूत समस्या मेंदूला कायमस्वरुपी नुकसान देऊ शकते आणि यामुळे कायमचं अपंगत्व येऊ शकतं. यादरम्यान, शेफिल्ड एनएचएस टिचिंग हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्टनी लक्षणं ओळखण्यासाठी एक प्रभावी टेक्निक विकसित केलं आहे. त्यांनी एक सोपी रक्त चाचणी तयार केली आहे जी काही मिनिटांतच रिपोर्ट देऊ शकते. ग्लूटेनयुक्त आहार घेतल्यानंतर पीडित व्यक्तीच्या रोगप्रतिकारक यंत्रणेने बाहेर सोडलेल्या रक्तात कोणती प्रोटिन आहेत हे या चाचणीतून कळू शकतं. टीजी 6 नावाची ही नवीन चाचणी शेफिल्ड अटाक्सिया सेंटरमध्ये मागील एका वर्षापासून ट्रायल्समध्ये वापरली जात होती आणि लवकरच ती एनएसएच नेटवर्कमध्ये आणली जाऊ शकते. त्यानंतर प्रभावित व्यक्ती ग्लूटेन-मुक्त आहाराकडे वळू शकते. ज्यामुळे ही लक्षणं दिसणं कमी होतं आणि बहुतेक प्रकरणांमध्ये मेंदूचं झालेलं नुकसान भरून निघून तो पूर्वपदावर येतो. ग्लुटेन ॲटेक्सिया सेलिॲक रोगाशी संबंधित आहे, असं संशोधकांच्या लक्षात आलं असून, यूकेतील कमीतकमी 600,000 लोकांना या आजाराचा त्रास होतो. ज्यांना आतड्यात वेदनादायक जळजळ होते त्यांना ग्लूटेन अ‍ॅटाक्सिया होण्याची शक्यता निरोगी व्यक्तींपेक्षा 16 पट जास्त आहे. परंतु आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की जे लोक ग्लूटेन अ‍ॅटेक्सियाग्रस्त असतात त्यांना आतड्यांशी संबंधित कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की ग्लूटेन अ‍ॅटाक्सियाग्रस्त रूग्णांनी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यांच्या आहारातून ग्लूटेन काढून टाकू नये. कारण यामुळे ग्लुटेनचा त्रास नसल्याचं आरोग्य तपासणी दिसू शकतं पण ते योग्यच असेल असं नाही.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Brain, Health, Lifestyle

    पुढील बातम्या