नवी दिल्ली, 07 डिसेंबर : खाण्यापिण्याच्या काही वाईट सवयी, बदललेली लाईफस्टाईल, एकाच जागेवर तासंतास बसून काम करणं किंवा एखाद्या आजारामुळे वजन वाढायला लागतं. वजन थोडं वाढलं तर ते त्याकडे फारसं लक्ष जात नाही. पण, जेव्हा वजन जास्त वाढतं तेव्हा मात्र, वाटत की आता प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे वजन वाढण्याआधीच त्याकडे लक्ष द्यायला हवं.
वजन नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाय असतात. जीम, योगा, नियमित चालणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेणं, आयुर्वेदीक उपाय, घरगुती उपाय असे बरेच पर्याय आहेत. मात्र, हे उपाय करतानां काही चुका केल्या तर, वजन कमी होत नाही. त्यामुळे सडपातळ शरीरासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी आहारातल्या काही चुका आवर्जून टाळायला हव्यात.
डायटींग आणि एक्ससाईज हा वजन कमी करण्यासाठी चांगला पर्याय आहे. एक्ससाईज करणाऱ्यांच्या कॅलरीज बर्न होतात, शरीरावरची चरबी कमी होते, शरीर सुडौल होतं. त्यासोबत हेल्दी, लो कॅलरी डाएट घ्यायला हवा. रोजच्या आहारामधून साखर कमी करण्याचाही उपयोग होतो. काहीजण एक्ससाईज करतात पण, योग्य आहार घेत नाहीत. उलट तळलेले पदार्थ, जंक फूड खातात. त्यामुळे फायदा होण्याऐवजी तोटा होतो.
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी वर्काउटनंतर काही गोष्टी खाणं टाळायला हवं. आंबा, नारळ, खजूर, अंजीर, मनुका वर्कआउटनंतर खाऊ नयेत असा सल्ला तज्ज्ञ देतात.
खजूर – खजुरात भरपूर प्रमाणात लोह असतं. त्यामुळे रक्त कमी असलेल्यांनी खजूर (Dates) खावेत. पण, जे लोक वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट करतात. त्यांनी खजूर खाणं टाळावं. खजूरामधून एनर्जी मिळते पण, त्यात कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे वर्कआऊट नंतर खजूर खाऊ नयेत.
केळं - केळी (Bananas) एक हेल्दी सुपरफूड आहे. वर्कआउट करण्याआधी केळं खाणं फायद्याचं आहेत. पण, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी वर्कआउट नंतर केळी खाऊ नयेत. त्यात जास्त प्रमाणात कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे वर्कआऊट नंतर केळं खाल्ल्यास फॅट बर्न होत नाही, त्यामुळे वर्कआउटचा फायदा होत नाही.
हे वाचा - झटका आळस! लवकर उठाल तर राहाल स्ट्रेस फ्री; पहा काय सांगतं संशोधन?
मनुका - मनुका एक ड्रायफ्रूट आहे. त्यात भरपूर कॅलरी आणि पोषक तत्व असतात. त्यामुळे वर्कआऊटनंतर त्याचं सेवन टाळावं.
ओलं खोबरं - वर्कआऊट करणाऱ्यांनी नारळपाणी पिणं चांगलं पण, ओलं खोबरं खाणं टाळावं. त्यात भरपूर पौष्टिक तत्व असतात. यात कर्बोहायड्रेड आणि कॅलरीचं प्रमाण जास्त असतं. म्हणून, वर्कआउट्सनंतर ओलं खोबरं खाऊ नये.
हे वाचा - लॉन्ग ड्राइव्हची तयारी करताय, कारमध्ये या 10 वस्तू आवर्जून ठेवा!
अंजीर - अंजीरमध्ये कमी कॅलरी असतात, पण सुकं अंजीर खाणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नाही. अंजीर आरोग्यासाठी चांगलं असलं तरी, वेटलॉससाठी त्याचा फायदा होत नाही. याशिवाय लवकर वजन कमी करण्यासाठी आहारात साखर कमी करावी. त्यामुळे लवकर वजन कमी होतं, असं तज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Weight loss tips