मुंबई, 06 जानेवारी : शाळेत आपण प्रत्येकानं हृदयाचा (heart) अभ्यास केला आहे. हृदयाचे भाग, हृदयाचं कार्य. हे सर्व आपल्याला माहिती असलं तरी आपल्यासाठी हृदय म्हणजे फक्त एक अवयव नाही. तर प्रेमाचं प्रतीक, भावनांचा भांडार मानलं जातं. प्रत्येक लव्ह साँग, रोमँटिक शायरीत दिल हा असतोच आणि प्रत्येकाच्या मनातील या अशाच नाजूक हृदयाला हात घातला आहे तो एका शिक्षिकेनं. हार्टबाबत शिकवता शिकवता ही शिक्षिका प्रेमाच्या विषयात भरकटली हा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) झाला आहे.
मेडिकल स्टुडंट डायरिज (medical student diaries) या युट्युब चॅनलनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक शिक्षका हृदय, त्याचे भाग आणि त्याची कार्ये याबाबत शिकवते आहे. पण मूळ मुद्द सोडून ती भलत्याच विषयाला हात घालते आणि हा विषय म्हणजे प्रेम.
प्रेमाला नेहमी हृदयाशी जोडलं जातं आणि या व्हिडीओत शिक्षिकेनं हेच नाकारलं आहे. प्रेम, भावना हे हृदयाचं काम नाही. बिचाऱ्या हृदयाला बदनाम केलं जातं आहे.
हे वाचा - भारीच! स्मार्टकार्डची गरज नाही; फक्त रिकामी कॅन टाकून मशीनमधून मिळतात पैसे
शिक्षिका व्हिडीओत सांगते, "हृदयाचं मुख्य काम ऑक्सिजन आणि कार्बनडायॉक्साइड एक्सचेंज करणं आहे. याशिवाय हृदयाचं दुसरं काहीच काम नाही. आपण फालतूमध्ये हृदयाला बदनाम करून ठेवलं आहे. गाण्यात दिल धडक रहा हे, असं होतं, तसं होतं. असं काहीच नसतं. भावना कधी हृदयात नसतात. हृदयापासून प्रेम करणं असं काही नसतं. राग, प्रेम हे सर्व आपले हार्मोन्स करतात. जर तुम्ही कुणावर प्रेम करत आहात किंवा कुणाचा तिरस्कार करत आहात तर हे हार्मोन्सचं काम आहे"
हे वाचा - घोडेस्वारी गेली उडत; गारठलेल्या घोड्यानं पांघरूण ओढून मारला Chill; पाहा VIDEO
मॅडमचा हा व्हिडीओ पाहताच सोशल मीडियावर प्रतिक्रियाच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही जणांकडे तर शब्दच उरले नाहीत. काहींनी किती चुकीची माहिती दिली जात असल्याचं सांगत आश्चर्य व्यक्त केलं आहे. काहींनी तर विचित्र विचित्र कमेंट केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral, Viral videos