मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त सुगंधाला भुलू नका; Deodorant खरेदी करताना या गोष्टींची खात्री करा अन् मगच पैसे द्या

फक्त सुगंधाला भुलू नका; Deodorant खरेदी करताना या गोष्टींची खात्री करा अन् मगच पैसे द्या

How to test deodorant : खरंतर नवीन डिओ विकत घेताना वासापेक्षाही अनेक गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याविषयी जाणून घेऊया.

How to test deodorant : खरंतर नवीन डिओ विकत घेताना वासापेक्षाही अनेक गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याविषयी जाणून घेऊया.

How to test deodorant : खरंतर नवीन डिओ विकत घेताना वासापेक्षाही अनेक गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 29 डिसेंबर : शरीराची दुर्गंधी, घामाचा वास घालवण्यासाठी तसेच आपल्या कपड्यांना चांगला वास येण्यासाठी अनेकांना डिओ (deodorant) लावायला आवडतो. मात्र, डिओ खरेदी करताना अनेकजण फक्त त्याचा सुगंध तपासतात. खरंतर नवीन डिओ विकत घेताना वासापेक्षाही अनेक गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कार्यालये किंवा महाविद्यालयांमध्ये जाणारे बहुतेक लोक डिओचा वापर करतात. काहींना कुठेही बाहेर जायचे नसले तरी घरी असताना डिओ लावण्याची सवय झालेली असते. म्हणूनच डीओ खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, हे जाणून घेणे तुमच्यासाठी (how to test deodorant) महत्त्वाचे आहे.

अनेक वेळा आपण फक्त सुगंध पाहून डीओ खरेदी करतो. कदाचित ते अंगावर लावल्यानंतर पित्ती, खाज सुटणे, त्वचा लाल होणे, अशा त्वचेच्या समस्या होऊ शकतात. या समस्यांपासून शरीराला वाचवण्यासाठी आणि पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी तुम्ही टेस्ट करण्याची सोय असलेल्या दुकानातून डीओ खरेदी करा. खरेदी करण्यापूर्वी, डिओ तुमच्या शरीरावर आणि तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांवर फवारणी करून घ्या. त्यानंतर दोन दिवस त्याचा परिणाम पाहिल्यानंतरच डिओ विकत घ्यायचा की नाही याचा निर्णय घ्या.

विषारी घटक असलेले डिओ खरेदी करणे टाळा

डीओच्या बहुतेक पॅकमध्ये त्यांच्यामध्ये असलेल्या घटकांबद्दल माहिती असते, जी काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. ट्रायक्लोसन, सल्फेट, पीईजी, सिलिकॉन किंवा पॅराबेन्स सारखी विषारी द्रव्ये असलेली डीओ खरेदी करणे टाळा. जेणेकरून तुम्हाला स्कीन अ‌ॅलर्जीसारख्या समस्या होणार नाहीत आणि त्वचा विकारांवर होणारा तुमचा खर्च वाचेल.

हे वाचा - Health Tips : Vitamin B6 शरीराला यासाठी आहे गरजेचं; कॅन्सरपासून चार हात लांबच रहाल

नैसर्गिक घटक असलेले डीओ निवडा

तुमच्या शरीराच्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी कोरफड, टी ट्री ऑइल यांसारखे नैसर्गिक घटक असलेले डीओ निवडा. तसेच, अशा ब्रँडचा डीओ निवडा ज्याला टॉक्सिन फ्री, मेड सेफ आणि एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली असे टॅग किंवा प्रमाणपत्रे आहेत. याबाबत तुम्ही गुगलची मदत घेऊ शकता.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

कपड्यांवर डाग

जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरावर डीओची चाचणी कराल, तेव्हा त्यादरम्यान तुमच्या कपड्यांवरही डीओची फवारणी करा. हे कपडे दोन-तीन दिवसांनी न धुता एकदा पाहुन घ्या आणि डीओ कपड्यांवर डाग तर सोडत नाहीत ना ते पहा. यामुळे तुमचे महागडे कपडे खराब होण्यापासून वाचतील.

First published:

Tags: Beauty tips, Lifestyle