मुंबई, 29 जून : हिंदू धर्मात शुभ दिवस आणि शुभ वेळेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. विशेष कामं शुभ दिवशी करण्याकडे अनेकांचा कल असतो. यामुळे कामं यशस्वी होऊन शुभफल मिळतं, असं मानलं जातं. विशिष्ट दिवशीच शुभकार्यं किंवा नवीन कामाला सुरुवात केली जाते. कामात यश मिळावं, त्यातून फायदा व्हावा, असा यामागचा मुख्य उद्देश असतो. शॉपिंगदेखील याला अपवाद नाही. कोणत्या दिवशी काय खरेदी करावं, हेसुद्धा शास्त्रात सांगितलेलं आहे.
आठवड्यातला (Week) प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवदेवतेला समर्पित असतो. त्यामुळे प्रत्येक दिवसाचं खास असं महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे. ज्याप्रमाणे शुभकार्य किंवा नवीन कामाला दिवस बघून सुरुवात केली जाते, तसंच नवीन वस्तू खरेदी करण्यासाठीदेखील तिथी, वार, मुहूर्त पाहिला जातो. हे सूत्र अगदी शॉपिंगसाठीही (Shopping) लागू पडतं. यानुसार योग्य दिवशी योग्य वस्तू खरेदी करणं शुभफलदायी ठरतं. आता कोणत्या दिवशी काय खरेदी करायचं आणि काय नाही ते पाहुयात.
हे वाचा - हे 5 गुण तुमच्यात असतील तर कोणतीच तरुणी तुम्हाला नकार देणार नाही; महिलांना हवा असतो असाच लाइफ पार्टनर
सोमवार (Monday) : सोमवार हा भगवान शंकराचा (Lord Shiva) वार आहे. या दिवशी कम्प्युटर, मोबाइल आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं. या दिवशी धान्य, दुग्धजन्य पदार्थ खरेदी करणं शुभ मानलं जातं.
मंगळवार (Tuesday) : मंगळवार हा श्री हनुमानाचा वार मानला जातो. त्यामुळे मंगळवारी चपला-बूट, लोखंडाच्या वस्तू खरेदी करणं टाळावं.
बुधवार (Wednesday) : उत्तर भारतीय पंचांगानुसार, बुधवार हा श्री गणपती आणि सरस्वती मातेचा दिवस आहे. या दिवशी औषधं, भांडी आणि शोभेचे मासे आणि अॅक्वेरियम खरेदी करू नये. या दिवशी पुस्तकं, वह्या किंवा स्टेशनरीच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गुरुवार (Thursday) : गुरुवार हा भगवान विष्णूंचा वार आहे. या दिवशी भांडी किंवा तीक्ष्ण वस्तू खरेदी करणं टाळावं; मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा प्रॉपर्टीशी निगडित वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.
शुक्रवार (Friday) : शुक्रवार हा लक्ष्मीमातेला समर्पित असतो. या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा प्रॉपर्टी खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही पूजा साहित्य, कपडे आदी गोष्टी खरेदी करू शकता.
शनिवार (Saturday) : या दिवशी मोहरी, तिळाचं तेल किंवा मीठ खरेदी करू नये. या दिवशी मशिनरी आणि फर्निचर खरेदी करणं शुभ मानलं जातं.
रविवार (Sunday) : रविवारी लोखंडाच्या वस्तू कदापि खरेदी करू नयेत. हा दिवस लाल रंगाच्या वस्तू, औषधं आणि गहू खरेदीसाठी उत्तम असतो.
हे वाचा - Numerology: 'या' तारखांना जन्मलेल्या मुली असतात भाग्यवान, करिअरमध्येही जातात खूप पुढे
झी न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर योग्य वार निवडून खरेदी केल्यास निश्चितच शुभफलदायी ठरू शकते, असं मत अभ्यासक व्यक्त करतात.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी घेत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.