मुंबई, 26 मार्च : शरीराला तंदुरुस्त ठेवण्यापासून ते त्वचेची काळजी घेण्यापर्यंत मधाचे अनेक फायदे आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात मध आरोग्यासाठी ढाल म्हणून काम करतो. मधामुळं आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहते, ज्यामुळे शरीराला उष्णता सहन करण्याची शक्ती मिळते. मधात अँटीबॅक्टीरियल, अँटीऑक्सिडंट आणि एंटिफंगल सारखे अनेक आरोग्यास फायदेशीर घटक आहेत. मध आधीपासून आयुर्वेदिक औषध (Ayurvedic Medicine) म्हणून वापरला जात आहे. मधात लोह, कॅल्शियम, फॉस्फेट, सोडियम, क्लोरीन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. याव्यतिरिक्त, जीवनसत्त्वे बी 1 आणि बी 6 देखील त्यात भरपूर प्रमाणात आढळतात. पण, खरा आणि भेसळयुक्त मध आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. मध खरेदी काही गोष्टी लक्षात ठेवल्या (Fake Or Real Honey) पाहिजेत.
पाण्यात विरघळणारा मध -
खरा मध पाण्यात सहज विरघळत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही पाण्यात मधाचा थेंब घालता तेव्हा तो सरळ खाली जातो आणि तळाशी स्थिर होतो. त्याला पाण्यात मिसळण्यासाठी तुम्हाला बराच वेळ चमच्याने हलवावे लागते. जर मध बनावट असल्यास तो पाण्याने सहज विरघळतो.
मधामुळे कागद ओला होत नाही -
कागदाच्या तुकड्यावर मधाचे एक दोन थेंब ठेवा आणि काही काळ तसेच राहू द्या. जर मध खरा असेल तर तो कागद ओला होणार नाही, कारण त्यात पाण्याचे प्रमाण अजिबात नसते. दुसरीकडे, बनावट किंवा भेसळयुक्त मधाचे थेंब काही वेळात पेपर ओला करतात.
हे वाचा -
घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही या गोष्टी ठेवू नका; सगळ्या कामांची होते वाताहात
मध कधी खराब होतो?
मधाबद्दल असे म्हटले जाते की, मध कधीही खराब होत नाही. याबाबत तज्ज्ञ म्हणतात की हे तांत्रिकदृष्ट्या देखील खरे आहे. पण जर तो व्यवस्थित राखला गेला नाही तर ती त्याचा वास आणि चव दोन्ही वेगळ्या वाटतात. यानंतर, जर तुम्ही त्याचा वापर केलात, तर तो तुमच्या जिभेला चव देणार नाही किंवा तुमच्या आरोग्याला लाभ मिळणार नाहीत. जास्त दिवस ठेवल्यानंतर मधाचा रंग गडद होतो. त्यामुळे त्याचा वापर वेळेवर झाला तरच तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
हे वाचा -
तगडा बँक बॅलन्स, पैसा-गाडी सगळं होत्याचं नव्हतं होतं; या 3 चुका कंगाल बनवतात
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.