कुठला बर्गर इमोजी अचूक, गुगलचा की अॅपलचा? रंगतेय चर्चा

कुठला बर्गर इमोजी अचूक, गुगलचा की अॅपलचा? रंगतेय चर्चा

व्यवसायाने लेखक असणारे थॉमस बक्कल यांनी एक ट्विट केले . त्यात गुगल आणि अॅपलवर वापरण्यात येणाऱ्या एका इमोजीवर चर्चा सुरू केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

30 आॅक्टोबर : दिवस-रात्र आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खूप सारे इमोजी वापरत असतो. सध्या गुगलच्या अशाच एका इमोजीवरून ट्विटरवर चांगलीच चर्चा रंगली आहे. व्यवसायाने लेखक असणारे थॉमस बक्कल यांनी एक ट्विट केले . त्यात गुगल आणि अॅपलवर वापरण्यात येणाऱ्या एका इमोजीवर चर्चा सुरू केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

यात त्यांनी गुगलचा बर्गर इमोजी आणि अॅप्पलचा बर्गर इमोजी यावर चर्चा केली आहे. त्यांनी यात विचारलं आहे की कोणता इमोजी बरोबर आहे. गुगलचा की अॅपलचा. आता चर्चा अशी की अॅपलच्या बर्गर इमोजीवर चीजचा तुकडा पॅटीच्या वर ठेवला आहे आणि त्यातच गुगलच्या बर्गर इमोजीवर चीजचा तुकडा पॅटीच्या खाली ठेवला आहे. खरं तर ही चर्चा विनोदी आहे पण मंडळी चर्चा तर हवीच ना !

ट्विटरवर थॉमस यांचं ट्विट 3 हजाराहून जास्त लोकांनी रिट्विट केलं आहे. 6 हजारापेक्षा जास्त लोकांनी त्याला पसंतही केलं आहे. थॉमस यांनी सुरू केलेल्या या चर्चेत अनेक लोकांनी सहभाग घेतला आहे. गमतीचं म्हणजे काहींनी तर या दोन्ही इमोजींना चुकीचं आहे असं म्हटलं, तर काहींनी या भांडणात सॅमसंगच्या इमोजीलाही घेतलं आहे.

या भांडणात सहभागी होऊन गुगलचे सीईओ  सुंदर पिचाई म्हणाले की, 'मी माझी बाकीची सगळी कामं सोडून आता शोधून काढणार की शेवटी कोणता इमोजी बरोबर आहे ते ? '

त्यामुळे आता कोणता इमोजी बरोबर आहे ते तर ही दिग्गज मंडळी ठरवतीलच, पण तुम्हीही जरा बर्गर खाण्याआधी इमोजी कुठला योग्य ते ठरवाच.

First published: October 30, 2017, 2:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading