मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मासिक पाळीत Swimming करताना चिंता सोडा; फक्त छोटीशी काळजी घेऊन बिनधास्त पोहा

मासिक पाळीत Swimming करताना चिंता सोडा; फक्त छोटीशी काळजी घेऊन बिनधास्त पोहा

अनेक महिला किंवा मुली मासिक पाळीच्या (menstrual period) कालावधीत स्विमिंग (swimming) करणं टाळतात. मात्र खरंतर पोहोण्याने मासिक पाळीतील अनेक समस्या दूर होतात असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

  • myupchar
  • Last Updated :

मासिक पाळी (menstrual period) म्हटलं की तरुणी आणि महिला काही गोष्टी या दिवसात करणं टाळतात. त्यापैकीच एक म्हणजे पोहोणं (swimming). मासिक पाळीच्या काळात पोहायला हवं की नाही, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात निर्माण होतो. तुम्हालाही पोहोयला आवडत असेल किंवा तुम्ही स्विमिंग क्लासेस लावले असतील आणि मासिक पाळीच्या कालावधीत तुमच्या मनातही असाच विचार येत असेल, तर याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात पाहुयात.

तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीत पोहायला हरकत नाही. मासिक पाळीच्या कालावधीतही तुम्ही पोहू शकता. फक्त त्यावेळी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, पोहोताना फक्त मेंस्ट्रुअल कप किंवा टॅम्पॉनचा वापर केला पाहिजे कारण पॅड्स पाणी शोषून घेतात जे पोहताना त्या कालावधी रक्त थांबवण्यास उपयुक्त ठरणार नाहीत. पाण्याच्या दबावामुळे पोहोण्याच्या दरम्यान रक्त प्रवाह कमी होतो. मात्र खोकला, हसणं किंवा शिंकणं यामुळे रक्तप्रवाह वाढू शकतो. त्यामुळे अशा वेळी पोहोताना टॅम्पॉन किंवा मेंस्ट्रुअल कप वापरण्यास काहीच हरकत नाही.

हे वाचा - बाळाच्या डायपरचे रॅशेस कमी करायचे आहेत? करा 'या' ऑईलने मसाज

इतकंच नव्हे तर, ज्या लोकांना हे वाटते की पोहोण्यामुळे संक्रमण होऊ शकते तर पोहायला कुठे जात आहात, तिथं पाणी कसं आहे याचीही खात्री करून घेणं आवश्यक आहे. पोहोण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता जाणून घ्या. पोहोण्याच्या पाण्यात क्लोरीन असतं. म्हणून पोहोल्यानंतर क्लोरीन नसलेल्या स्वच्छ पाण्याने आंघोळ करा.

याशिवाय अनेक महिलांना भीती असते की पोहोताना पोटात जास्त वेदना तर होणार नाहीत का? किंवा ताण तर येणार नाही ना? मात्र तज्ज्ञांच्या मते पोहोण्यामुळे उलट या वेदनांपासून मुक्ती मिळते. पोहोणे आणि इतर उच्च तीव्रतेचे व्यायाम केल्यानं मेंदूतून एंडोर्फिन नावाचं एक केमिकल सोडलं जातं जे नैसर्गिकरित्या वेदना कमी करतं.

हे वाचा - मूळव्याधावर उपयुक्त सुरण; अशा पद्धतीने वापरला तर होईल अधिक फायदा

या कालावधीत मूड स्विंग्स देखील होतं. अशा परिस्थितीत तणावमुक्त राहण्यासाठी पोहोणं उत्तम आहे. myupchar.com च्या डॉ. मेधवी अग्रवाल यांनी सांगितलं, पोहोण्यामुळे ताणतणावातून आराम मिळतो आणि मेंदूचं कार्य चांगलं होतं. एका संशोधनानुसार पोहोण्यामुळे हिप्पोकॅम्पल न्युरोजेनेसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे मेंदूच्या तणावास प्रतिबंध होतो.

First published:

Tags: Health, Lifestyle