तणावात आहात... मग संत्र सोलत बसा!

तणावात आहात... मग संत्र सोलत बसा!

जॉब फ्रस्टेशन, कामाचा ताण, घरची जबाबदारी या सगळ्यांमुळे तुम्ही अजून तणावग्रस्त आणि निराश होतात.

  • Share this:

सध्याचं आयुष्य इतकं वेगवान झालं आहे की दिवसाच्या सुरुवातीपासून ते दिवस संपेपर्यंत संपूर्ण दिवस फक्त तणावात जातो. हे कमी की काय जॉब फ्रस्टेशन, कामाचा ताण, घरची जबाबदारी या सगळ्यांमुळे तुम्ही अजून तणावग्रस्त आणि निराश होतात. आता या सर्व गोष्टी सोडून राहूही शकत नाही. पण आता तणावातून स्वतःला दूर करण्यासाठी काही 10 सोपे टीप्स आहेत. या टीप्सचा वापर करून अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

तणावमुक्त होण्यासाठी चॉकलेट हा एक उत्तम पर्याय आहे. चॉकलेट खात तुम्ही तुमच्या मनातील विचार शांत करण्याचा विचार करा आणि पाच मिनिटांसाठी का होईना मेडिटेशन करा.

डायरी लिहा. दररोज डायरी लिहिल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकतात.

हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण तणावग्रस्त असाल तर संत्र सोला. याच्यामागे एक शास्त्र आहे. संत्र्यात सिट्रसचा सुगंध असतो. याच्या सुगंधाने तुम्ही तणावमुक्त होण्यास मदत होते.

सहा मिनिटांसाठी एखादं पुस्तक वाचा.

एवोकाडो खा. यात असलेल्या फॅट आणि पोटॅशियममुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. पर्यायाने तुम्ही तणावमुक्त होता.

हिरव्यागार जागेत फेर फटका मारायला जा.

प्रेयसी किंवा प्रियकरासोबत कुठे तरी फिरायला जा.

काही वेळेसाठी मोकळ्या जागेत दीर्घ श्वास घ्या.

पाच मिनिटांचा पॉवर नॅप घ्या.

घरातील एखाद्या पाळीव प्राण्यासोबत वेळ घालवा.

अ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम!

दारू- सिगरेटपासून तुम्ही मुलांना असं ठेवू शकता दूर

Ex ला सोशल मीडियावर स्टॉक करणं सामान्य गोष्ट आहे?

7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट

SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

Published by: Madhura Nerurkar
First published: August 26, 2019, 7:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading