मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

World Bamboo Day 2022: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? बांबू लागवडीचे फायदे जाणून घ्या

World Bamboo Day 2022: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? बांबू लागवडीचे फायदे जाणून घ्या

World Bamboo Day 2022: जागतिक बांबू दिनानिमित्त लोकांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्वात वेगाने वाढणाऱ्या गवत वनस्पतींमध्ये बांबूचे नाव अग्रस्थानी आहे.

World Bamboo Day 2022: जागतिक बांबू दिनानिमित्त लोकांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्वात वेगाने वाढणाऱ्या गवत वनस्पतींमध्ये बांबूचे नाव अग्रस्थानी आहे.

World Bamboo Day 2022: जागतिक बांबू दिनानिमित्त लोकांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्वात वेगाने वाढणाऱ्या गवत वनस्पतींमध्ये बांबूचे नाव अग्रस्थानी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : जागतिक बांबू दिन दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा विशेष दिवस बांबूशी संबंधित फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि दैनंदिन उत्पादनांमध्ये त्याचा वापर वाढवण्यासाठी साजरा केला जातो. बांबू आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. बऱ्याच काळापासून बांबू कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरला जात आहे. जसे फर्निचर किंवा पिशव्या, कपडे इ.

बांबूविषयी अनेक रंजक गोष्टी आहेत. बांबूची काठी किती ठणक असली तरी बांबू ही गवतवर्गीय वनस्पती आहे. बाबूंचा गवत वर्गामध्ये समावेश होतो. बांबू ही एक प्रकारची नैसर्गिक वनस्पती असून त्याचे वैज्ञानिक नाव Bambusidae आहे. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

जागतिक बांबू दिनानिमित्त लोकांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्वात वेगाने वाढणाऱ्या गवत वनस्पतींमध्ये बांबूचे नाव अग्रस्थानी आहे. ज्याचा उपयोग फर्निचर, खाद्यपदार्थ, इंधन, कपडे अशा अनेक गोष्टींमध्ये होतो. मानवाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी बांबूची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. दक्षिण पूर्व आशियाई, पूर्व आशियाई देश आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये बांबूचा सर्वाधिक वापर केला जातो.

त्याच्याशी संबंधित इतिहास -

18 सप्टेंबर 2009 रोजी, जागतिक बांबू संघटनेने बँकॉकमध्ये पहिला जागतिक बांबू दिन घोषित केला. हा दिवस साजरा करण्यामागील कारण म्हणजे बांबूला जास्तीत जास्त विस्तार करणे. जगभरात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे नवीन उद्योगांसाठी बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले जाते जेणेकरून या दिशेने आर्थिक विकास करता येईल. यासोबतच बांबूशी संबंधित पारंपरिक उद्योगांना चालना मिळते.

हे वाचा - तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे?

बांबूशी संबंधित काही खास गोष्टी -

बांबूला गरीब लोकांचे लाकूड किंवा हिरवे सोने असेही म्हणतात.

बांबू वनस्पती नैसर्गिकरित्या कुठेही वाढू शकते.

ईशान्य भारतात बांबूच्या सुमारे 110 जाती आहेत.

मृदा संवर्धनात बांबू महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण तो पुराच्या वेळी माती धरून ठेवतो.

बांबूचे झाड नापीक जमीन किंवा खराब जमीन सुधारक म्हणून देखील कार्य करते.

हे वाचा - डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर

जागतिक बांबू दिन दरवर्षी कोणत्या ना कोणत्या थीमच्या आधारे साजरा केला जातो. नैसर्गिक वस्तूंचे जतन करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. जागतिक बांबू संघटनाही अधिकाधिक बांबू रोपे लावण्यावर भर देते. या वर्षीची थीम देखील या थीमवर आधारित असू शकते, जेणेकरून लोक बांबू लागवडीबद्दल जागरूक होतील.

First published:

Tags: Agriculture